खामगाव बाजार समितीच्या प्रभारी सचिवांना निलंबित करण्याचे जिल्हा उपनिबंधकांचे निर्देश
खामगाव बाजार समितीच्या प्रभारी सचिवांना निलंबित करण्याचे जिल्हा उपनिबंधकांचे निर्देश

खामगाव बाजार समितीच्या प्रभारी सचिवांना निलंबित करण्याचे निर्देश

अकोला :खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत इलेक्ट्रॉनिक वजनकाटे गैरव्यवहारप्रकरणी दोषी अाढळलेले, सलग ४८ तास पोलिस कोठडीत राहलेले प्रभारी सचिव दिलीप देशमुख यांना तत्काळ निलंबित करून त्यांच्याविरुद्ध खातेनिहाय चौकशी सुरू करावी, असे अादेश बुलडाणा जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी दिले. शिवाय या रिक्त होणाऱ्या पदाचा प्रभार बाजार समितीत सेवाज्येष्ठता यादीमधील पात्र कर्मचाऱ्याकडे सोपविण्याचे आदेशही त्यांनी दिले.   

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, देशमुख यांना इलेक्ट्रॉनिक वजनकाटे अपहाराप्रकरणी ६ मे २०१७ रोजी अटक करण्यात अाली. न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यांना पोलिस कोठडी देण्यात अाली. सलग ४८ तासांपेक्षा अधिक काळ ते कोठडीत होते. परिणामी त्यांना कर्मचारी सेवानियमातील तरतुदीनुसार बाजार समितीने सेवेतून निलंबित करणे गरजेचे होते. मात्र समितीने कोणतीच कारवाई केली नाही. याबाबत नंदलाल भट्टड यांनी पणन संचालकांकडे तक्रार केली. त्यानुसार पणन संचालकांनी दिलेल्या अादेशानंतर बाजार समितीला कारवाई करून अहवाल सादर करण्याबाबत कळविण्यात अाले. मात्र समितीने कारवाई न करता त्यांना पाठीशी घातल्याचा अारोप संचालक प्र. भ. टिकार यांनी तक्रारीद्वारे केला.

या बाजार समितीत सेवा ज्येष्ठता यादीनुसार सचिव पदासाठी सेवाज्येष्ठ कर्मचारी म्हणून मु. शा. भिसे हे पात्र होते. तरीही त्यांना डावलून कनिष्ठ कर्मचारी असलेल्या देशमुख यांना प्रभारी सचिवाचा पदभार देण्यात अाला होता. दरम्यान, त्यांनी समितीमधील इलेक्ट्रॉनिक वजनकाटे खरेदीप्रकरणात भ्रष्टाचार करून गैरवर्तन केले. तरीही समितीने कारवाई न करता वर्षभरापासून गैरवर्तनास संरक्षण देण्याचे काम केले, असे चव्हाण यांनी आदेशात स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com