सचिव-लेखापालाची वेतनवाढ रोखणार

भूखंड घोटाळ्यामुळे चर्चेत असलेल्या अचलपूर बाजार समितीत वार्षिक अर्थसंकल्प वेळेत सादर न करणाऱ्या सचिव आणि लेखापाल यांची वेतनवाढ रोखण्याचा निर्णय घेण्यात आला.
Secretary-Accountant's salary increase will be stopped
Secretary-Accountant's salary increase will be stopped

अमरावती : भूखंड घोटाळ्यामुळे चर्चेत असलेल्या अचलपूर बाजार समितीत वार्षिक अर्थसंकल्प वेळेत सादर न करणाऱ्या सचिव आणि लेखापाल यांची वेतनवाढ रोखण्याचा निर्णय घेण्यात आला. संचालकांच्या बैठकीत या निर्णयास मान्यता देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.  अचलपूर बाजार समिती या ना त्या कारणामुळे सातत्याने चर्चेत राहते. बाजार समितीतील भूखंड घोटाळा प्रकरण सध्या चांगलाच गाजत आहे. दरम्यान याच श्रृंखलेत नव्या प्रकरणाची भर पडली आहे. बाजार समितीचा वार्षिक लेखाजोखा सादर करणारा अर्थसंकल्प मंजुरीसाठी मार्च महिन्यात पाठवणे आवश्यक असते. त्याकरिता जबाबदार असलेल्या सचिव पवन सार्वे आणि लेखापाल जगन्नाथ गुळदे यांनी वेळेत अर्थसंकल्प सादर केला नाही. त्यामुळे त्यांना मंगळवारी (ता.१) झालेल्या संचालकांच्या बैठकीत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. शुक्रवारी (ता.११) होणाऱ्या बैठकीत त्यांना आपली बाजू मांडण्यासाठी वेळ देण्यात आला होता. त्यानुसार दोघांनी आपली बाजू मांडली. परंतु संचालक मंडळाचे समाधान न झाल्याने त्यांच्यावर कारवाईचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार प्रत्येकी एक वेतनवाढ रोखण्यात आली आहे. तथापि या अर्थसंकल्पा संदर्भात कुठलीही त्रुटी आढळून आल्यास त्यावर या दोघांना जबाबदार धरून कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. याच बैठकीत खासगी कापूस खरेदी करणाऱ्या जिनिंग प्रेसिंग मधून खरेदी आणि सेस संदर्भात माहिती न दिल्याने कारवाई संदर्भात चर्चा करण्यात आली. उपाध्यक्ष गोपाल लहाने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला सभापती अजय पाटील व संचालक सुधीर रहाटे अनुपस्थित होते.     

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com