शेतकऱ्यांना बांधावरच बी-बियाणे देण्याचा प्रयत्न 

शेतकऱ्यांना बांधावरच बी-बियाणे देण्याचा प्रयत्न आहे. ७५ ते ८० टक्के कापूस खरेदी आहे. त्यावरून राजकारण करू नका. तुम्ही सुरु केलं तरी आम्ही करणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
Uddhav thakarey
Uddhav thakarey

मुंबईः राज्यात  ५० हजार उद्योग सुरु झाले. त्यात सहा लाख कामगार रुजू झाले आहेत. शेतकऱ्यांना बांधावरच बी-बियाणे देण्याचा प्रयत्न आहे. ७५ ते ८० टक्के कापूस खरेदी आहे. त्यावरून राजकारण करू नका. तुम्ही सुरु केलं तरी आम्ही करणार नाही. महाराष्ट्राची आमच्यावर जबाबदारी आणि विश्वास आहे. आमचं मंत्रिमंडळ त्याला तडा जाऊ देणार नाही. राज्यातील जनतेलाही आपल्या घरी जाता येणार आहे. आम्हाला सर्व सुरळीत करायचं आहे, पण कोरोनाला टाळून करायचं आहे, महाराष्ट्राचं अर्थचक्र कसं चालणार यावर लक्ष, असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केले.  मुख्यमंत्री ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेशी संबाद साधला. ते म्हणाले की, मार्च-एप्रिलपासून कोरोना संकट सुरु झालं. आता अचानक या रुग्णांची संख्या वाढली. मी आपल्याला याबाबत अगोदरच कल्पना दिलेली आहे. हा विषाणू गुणाकार करत जातो. या गुणाकाराला मर्यादा नाही. मे महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रात सव्वा ते दीड लाख कोरोना रुग्ण असतील, असा इशारा दिल्लीने दिला होता. परंतु सध्या ३३ हजार ७८६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. ४७ हजार हा एकूण आकडा आहे. जवळपास १३ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ``महाराष्ट्रात आजपर्यंत १५७७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. कोरोनाग्रस्त गर्भवतींची बालके कोरोनामुक्त झाली हा निसर्गाचा चमत्कार आहे. मुंबईत नव्वदीच्या आजी कोरोनाला हरवून घरी गेल्या. कोरोना रुग्णांची आबाळ होत आहे, हे सत्य आहे. पण कोणाच्याही ध्यानीमनी नसताना हे संकट आलं आहे. सध्या सात हजार तर मेअखेरपर्यंत १३ ते १४ हजार बेड्स उपलब्ध असतील. जास्तीत जास्त रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे. फिल्ड हॉस्पिटलमध्ये तशी सोय केली आहे. राज्यात आता पुन्हा रक्तदानाची गरज, पुढील आठ ते दहा दिवस पुरेसा रक्तसाठा, इच्छुक रक्तदात्यांनी पुढे यावे,`` असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. ``पावसाळ्यात विनाकारण भिजणे शक्यतो टाळा. रोगराई आणि साथी आपल्याला टाळायला हव्या. सर्दी, खोकला, ताप याशिवाय थकवा, तोंडाची चव जाणे, वास न येणे अशी नवे लक्षणे अंगावर न काढता वेळीच डॉक्टरांना दाखवा.बांद्रा-कुर्ला कॉम्पलेक्स, गोरेगाव येथे फिल्ड हॉस्पिटल सुरु केली आहेत. आपल्याकडे जवळपास ७ हजार बेड्स उपलब्ध आहेत. पुढच्या महिन्यात १३ ते १४ हजार बेड्स उपलब्ध राहतील.मराठवाडा, विदर्भ याच्यासह उत्तर महाराष्ट्र, कोकण अशा ग्रामीण भागातील जनतेनेही चांगले सहकार्य केले आणि कोविडचा प्रादुर्भाव आटोक्यात ठेवला,`` असे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री पुढेल म्हणाले की, राज्य सरकारने स्थलांतरित मजुरांसाठी ४८१ ट्रेन सोडल्या. त्याने सहा ते सात लाख मजूर गावी गेले. त्यावर ८५ कोटी रुपये खर्च झाला. तीन लाख ८० हजार जणांना एसटीने आपापल्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवल. त्यासाठी ७५ कोटी रुपये खर्च आला. पुढच्या १५ दिवसात देशात चित्र स्पष्ट होईल. कारण स्थलांतर मोठ्या प्रमाणात झालं आहे, असं मी सोनिया गांधी यांच्यासह झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये बोललो. ईद घरीच साजरी करावी मुस्लिम समाजातील बांधवांना ईदच्या शुभेच्छा. ईद घरात बसून साजरी करावी. सर्व सण समारंभ आपण घरीच साजरे केले. मुस्लीम बांधव सहकार्य करत आहेतच मात्र, कुठे गर्दी न करता, रस्त्यावर न येत घरी प्रार्थना करुन ईद साजरी करा. कोरोना संकट दूर होण्यासाठी दुआ करा, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले. पॅकेजपेक्षा थेट मदत केली पॅकेज का नाही दिलं असा प्रश्न विरोधक विचारतात. लाखो कोटींची पॅकेज वाटली पण हाती आलं काय? आरोग्य सुविधा निर्माण करणे महत्त्वाचे आहे. अन्न धान्य आणि उपचार हे पॅकेजपेक्षा महत्त्वाच आहे. महात्मा ज्योतीराव फुले योजनेअंतर्गत शंभर टक्के लोकांना मदत केली. पॅकेज घोषित कशाला करत बसायचं लोकांना थेट मदत केली, असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com