agriculture news in Marathi seed and fertilizer will be provided to farmers on farm Maharashtra | Page 2 ||| Agrowon

शेतकऱ्यांना बांधावरच बी-बियाणे देण्याचा प्रयत्न 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 मे 2020

शेतकऱ्यांना बांधावरच बी-बियाणे देण्याचा प्रयत्न आहे. ७५ ते ८० टक्के कापूस खरेदी आहे. त्यावरून राजकारण करू नका. तुम्ही सुरु केलं तरी आम्ही करणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

मुंबईः राज्यात  ५० हजार उद्योग सुरु झाले. त्यात सहा लाख कामगार रुजू झाले आहेत. शेतकऱ्यांना बांधावरच बी-बियाणे देण्याचा प्रयत्न आहे. ७५ ते ८० टक्के कापूस खरेदी आहे. त्यावरून राजकारण करू नका. तुम्ही सुरु केलं तरी आम्ही करणार नाही. महाराष्ट्राची आमच्यावर जबाबदारी आणि विश्वास आहे. आमचं मंत्रिमंडळ त्याला तडा जाऊ देणार नाही. राज्यातील जनतेलाही आपल्या घरी जाता येणार आहे. आम्हाला सर्व सुरळीत करायचं आहे, पण कोरोनाला टाळून करायचं आहे, महाराष्ट्राचं अर्थचक्र कसं चालणार यावर लक्ष, असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केले. 

मुख्यमंत्री ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेशी संबाद साधला. ते म्हणाले की, मार्च-एप्रिलपासून कोरोना संकट सुरु झालं. आता अचानक या रुग्णांची संख्या वाढली. मी आपल्याला याबाबत अगोदरच कल्पना दिलेली आहे. हा विषाणू गुणाकार करत जातो. या गुणाकाराला मर्यादा नाही. मे महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रात सव्वा ते दीड लाख कोरोना रुग्ण असतील, असा इशारा दिल्लीने दिला होता. परंतु सध्या ३३ हजार ७८६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. ४७ हजार हा एकूण आकडा आहे. जवळपास १३ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

``महाराष्ट्रात आजपर्यंत १५७७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. कोरोनाग्रस्त गर्भवतींची बालके कोरोनामुक्त झाली हा निसर्गाचा चमत्कार आहे. मुंबईत नव्वदीच्या आजी कोरोनाला हरवून घरी गेल्या. कोरोना रुग्णांची आबाळ होत आहे, हे सत्य आहे. पण कोणाच्याही ध्यानीमनी नसताना हे संकट आलं आहे. सध्या सात हजार तर मेअखेरपर्यंत १३ ते १४ हजार बेड्स उपलब्ध असतील. जास्तीत जास्त रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे. फिल्ड हॉस्पिटलमध्ये तशी सोय केली आहे. राज्यात आता पुन्हा रक्तदानाची गरज, पुढील आठ ते दहा दिवस पुरेसा रक्तसाठा, इच्छुक रक्तदात्यांनी पुढे यावे,`` असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

``पावसाळ्यात विनाकारण भिजणे शक्यतो टाळा. रोगराई आणि साथी आपल्याला टाळायला हव्या. सर्दी, खोकला, ताप याशिवाय थकवा, तोंडाची चव जाणे, वास न येणे अशी नवे लक्षणे अंगावर न काढता वेळीच डॉक्टरांना दाखवा.बांद्रा-कुर्ला कॉम्पलेक्स, गोरेगाव येथे फिल्ड हॉस्पिटल सुरु केली आहेत. आपल्याकडे जवळपास ७ हजार बेड्स उपलब्ध आहेत. पुढच्या महिन्यात १३ ते १४ हजार बेड्स उपलब्ध राहतील.मराठवाडा, विदर्भ याच्यासह उत्तर महाराष्ट्र, कोकण अशा ग्रामीण भागातील जनतेनेही चांगले सहकार्य केले आणि कोविडचा प्रादुर्भाव आटोक्यात ठेवला,`` असे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री पुढेल म्हणाले की, राज्य सरकारने स्थलांतरित मजुरांसाठी ४८१ ट्रेन सोडल्या. त्याने सहा ते सात लाख मजूर गावी गेले. त्यावर ८५ कोटी रुपये खर्च झाला. तीन लाख ८० हजार जणांना एसटीने आपापल्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवल. त्यासाठी ७५ कोटी रुपये खर्च आला. पुढच्या १५ दिवसात देशात चित्र स्पष्ट होईल. कारण स्थलांतर मोठ्या प्रमाणात झालं आहे, असं मी सोनिया गांधी यांच्यासह झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये बोललो.

ईद घरीच साजरी करावी
मुस्लिम समाजातील बांधवांना ईदच्या शुभेच्छा. ईद घरात बसून साजरी करावी. सर्व सण समारंभ आपण घरीच साजरे केले. मुस्लीम बांधव सहकार्य करत आहेतच मात्र, कुठे गर्दी न करता, रस्त्यावर न येत घरी प्रार्थना करुन ईद साजरी करा. कोरोना संकट दूर होण्यासाठी दुआ करा, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.

पॅकेजपेक्षा थेट मदत केली
पॅकेज का नाही दिलं असा प्रश्न विरोधक विचारतात. लाखो कोटींची पॅकेज वाटली पण हाती आलं काय? आरोग्य सुविधा निर्माण करणे महत्त्वाचे आहे. अन्न धान्य आणि उपचार हे पॅकेजपेक्षा महत्त्वाच आहे. महात्मा ज्योतीराव फुले योजनेअंतर्गत शंभर टक्के लोकांना मदत केली. पॅकेज घोषित कशाला करत बसायचं लोकांना थेट मदत केली, असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केले.


इतर अॅग्रो विशेष
महाराष्ट्रात केसर आंब्याच्या क्षेत्रात...नगर ः फळपिकांत आंबा महत्त्वाचे पीक आहे. त्यामुळे...
आपले सरकार सेवा केंद्रांची होणार तपासणी पुणे ः पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अनेक...
कृषीमध्ये स्टार्टअप, उद्योजकतेला...नवी दिल्ली: नवीन तंत्रज्ञानाचा विकास आणि...
बागा पुनर्लागवडीसह सफाईसाठी अर्थसाह्य...रत्नागिरी ः निसर्ग चक्रीवादळात मंडणगड, दापोलीसह...
मुंबईसह कोकणात धुवांधार पुणे : कोकण किनारपट्टीवर दोन दिवसांपासून पावसाने...
देशात खरीप पेरणीला वेग नवी दिल्ली: यंदाच्या खरीप हंगामात परेणीने जोर...
सव्वालाख हेक्टरवरून टोळधाडीचे उच्चाटन नवी दिल्ली: सरकारने राजस्थान, मध्य प्रदेश,...
पूरक व्यवसायांची शेतीला जोड देत सावरले...अल्प शेतीला एकात्मिक पद्धतीने पूरक उद्योगाची जोड...
कोकणात जोरदार पावसाची शक्यता पुणे  अरबी समुद्रातून होत असलेला...
मुंबईसह, कोकणात दमदार पाऊसपुणे : कोकण किनारपट्टीलगतच्या समुद्रात...
राज्यातील शिल्लक कापसाविषयी संभ्रम नागपूरः राज्यात कापसाच्या शिल्लक साठ्याविषयी...
पीकविम्याच्या साइटवरून चार गावांची...बुलडाणा ः संग्रामपूर तालुक्यातील काही गावांतील...
पुणे जिल्हा परिषदेची ‘हर घर गोठे- घर घर...पुणे : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी...
पंचनाम्याची प्रक्रिया संशयास्पद :...पुणे: राज्यातील सोयाबीन बियाणे उगवणीबाबत...
टाळेबंदीतही कारखान्यांकडून ९७ टक्के...कोल्हापूर: टाळेबंदीच्या संकटामध्येही यंदा...
थेट भाजीपाला विक्रीतून शेती झाली सक्षमथेट ग्राहकांना शेतीमाल विक्रीसाठी शेतकरी स्वतःहून...
जीएम पिके- भारतात धोरण कोंडी कधी फुटणार?भारतात बीजी थ्री, एचटीबीटी कपाशी, बीटी वांगे या...
सिंधुदुर्ग, रत्नागिरीला पावसाने झोडपलेसिंधुदुर्ग :  सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार...
तेरा बियाणे कंपन्यांवर अखेर फौजदारी...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना निकृष्ट बियाणे...
मुंबईत पावसाची दमदार हजेरी; आज...मुंबई : मुंबईतील अनेक भागांत शुक्रवार (ता.३...