agriculture news in Marathi seed and fertilizers problem in sowing Maharashtra | Agrowon

धूळवाफ पेरणीत लॉकडाउनचा खोडा 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 मे 2021

शिराळा तालुक्यात वारंवार झालेल्या पावसाने पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना गती आली. मात्र लॉकडाउनमुळे कृषी दुकाने बंद आहेत. बी-बियाणे मिळत नसल्याने अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर धूळवाफ पेरणीमध्ये अडचणी आल्या आहेत.

सांगली ः शिराळा तालुक्यात वारंवार झालेल्या पावसाने पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना गती आली. मात्र लॉकडाउनमुळे कृषी दुकाने बंद आहेत. बी-बियाणे मिळत नसल्याने अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर धूळवाफ पेरणीमध्ये अडचणी आल्या आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. 

शिराळा तालुक्यात भाताचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या भागामध्ये धूळवाफेवर पेरणी करण्याची परंपरा आहे. तालुक्यात भात पेरणीसाठी शेतकऱ्यांनी पूर्वमशागत करून शेती तयार केली आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर वाफेवरची पेरणी सुरू होते. नंतर सोयीनुसार पेरणी केली जाते. गेल्या वर्षीदेखील कोरोना संकटामुळे पेरणीत अडथळे निर्माण झाले होते. 

या वर्षीही कोरोनाचे संकट वाढले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. लॉकडाउनमुळे कृषी निविष्ठा दुकाने बंद आहेत. दोन टक्के शेतकरी घरातील, ९८ टक्के शेतकरी दुकानातून बियाणे आणून पेरणी करतात. शिराळा तालुका अतिपावसाचा म्हणून ओळखला जातो. धूळवाफ पेरणीला जास्त महत्त्व दिले जाते. खते व बी-बियाणे खरेदी आठ दिवस आधी करावी लागते. मात्र लॉकडाउन असल्याने कृषी निविष्ठा दुकाने बंद आहेत. त्यामुळे अक्षय तृतीयेला भात पेरणीचा मुहूर्त साधता आला नाही. 

प्रतिक्रिया 
अक्षय तृतीयेला धूळवाफ पेरणी केली जाते. त्याआधी आठ-दहा दिवस बियाणे, खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची कृषी निविष्ठा दुकानात गर्दी होते. मात्र लॉकडाउनमुळे दुकाने बंद आहेत. त्याचा परिणाम खरेदीवर झाला आहे. 
- उमेश कुलकर्णी, अध्यक्ष, शिराळा तालुका कृषी निविष्ठा केंद्र संघटना 

तालुक्यात ९८ टक्के धूळवाफ पेरणी होते. दोन टक्के रोप लावणी होते. शेतकऱ्यांना बियाणे मिळण्यास अडचण नाही. बियाण्यांचा पुरेसा साठा आहे. अक्षय तृतीयेला मुहूर्त होतोच. पूर्वमोसमीचा पाऊस झाल्याने २० मेनंतर प्रत्यक्ष पेरणी सुरू होईल. शिथिलता मिळून दुकाने सुरू झाल्यास बियाणे मिळतील. 
- जी. एस. पाटील, तालुका कृषी अधिकारी, शिराळा 
 

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
विदर्भात मुसळधारेची शक्यता पुणे : उत्तरेकडे मॉन्सून गेल्यानंतर राज्यातील...
दूधप्रश्‍नी शेतकरी आक्रमक; राज्यभरात...नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७)...
‘द्राक्ष क्लस्टर’मध्ये नाशिकचा समावेश नाशिक : केंद्र सरकारने देशभरात विविध ५३ पिकांचे...
सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजनेला गती...पुणे ः पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजना...
कोकणसह कोल्हापुरात पावसाने दाणादाण पुणे : कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड,...
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विम्याचे...सोलापूर ः राज्यातील फळबागांसाठी असलेल्या...
सिंधुदुर्ग पूरस्थितीच्या उंबरठ्यावरसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार...
राज्यात कांदा प्रतिक्विंटल ५०० ते २३००...अकोल्यात प्रतिक्विंटल ६०० ते १६०० रुपये अकोला ः...
खानदेशातील आवार प्रगतीवर स्वारआवार (ता.जि. जळगाव) हे कापूस, दादर ज्वारीसाठी...
राज्यात २१८ तालुक्यांमध्ये दमदार पाऊस;...पुणे ः जूनच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यातील २१८...
राज्यात खरीप पेरणी तीन टक्केनगर ः राज्यात यंदा आतापर्यंत खरिपाची सरासरीच्या...
दूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे...नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७)...
विदर्भात पावसाचा जोर वाढणारपुणे : राज्यातील बहुतांशी भागात उन्हासह अंशतः...
अनेक वर्षांपासून जपली आले उत्पादकता अन्...आले पिकातील दरांत दरवर्षी चढउतार होते. मात्र...
भाजीपाला बीजोत्पादनातील ‘मास्टर’जिद्द, हिंमत, अभ्यास, ज्ञान घेण्याची वृत्ती व...
कोकण, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता पुणे : कोकण ते अरबी समुद्राच्या दरम्यान कमी...
पूर्वविदर्भात जोरदार पाऊस पुणे : राज्यातील काही भागांत पावसाचा दणका सुरूच...
जालन्यातील ऊस संशोधन केंद्र उभारणीला...पुणे ः ऊस शेतीच्या विकासासाठी विदर्भ,...
दूध दरांसाठी ग्रामसभांच्या ठरावाची...नगर : राज्यात दुधाला दर दिला जात नसल्याने दूध...
आता शेतकरीच करणार पीकपाहणी पुणे ः तलाठ्याकडून गावशिवारात प्रत्यक्ष पाहणी...