पोपटरावांच्या कन्येच्या विवाहात आहेरातून स्वीकारल्या बिया, रोपटे

नगर ः पोपटराव पवार यांच्या कन्येच्या विवाह समारंभात झाडांची रोपे आहेर म्हणून स्वीकारताना वधू आणि वर.
नगर ः पोपटराव पवार यांच्या कन्येच्या विवाह समारंभात झाडांची रोपे आहेर म्हणून स्वीकारताना वधू आणि वर.

नगर : विवाह संस्था व कुटुंब व्यवस्था पुन्हा एकदा नव्या विचाराने उभ्या राहण्यासाठी मानवी कल्याणासाठी लोकसहभाग हवा, असा संदेश आदर्श गाव संकल्प व प्रकल्प कृती समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी आपल्या कन्येच्या विवाह समारंभात देऊन आगळावेगळा पायंडा पाडला. हिवरेबाजार परिवाराने आहेरातून स्वीकारल्या झाडांच्या बिया, रोपटे स्वीकारले, सुमारे तीन हजार हजारांच्या वर बिया तर दोनशेच्या वर झाडे आली आहेत. त्या वन खात्याच्या रोपवाटिकांना दिले जाणार असल्याचे या वेळी जाहीर केले. आदर्श गाव हिवरेबाजारचे सरपंच व आदर्श गाव संकल्प व प्रकल्प कृती समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांची कन्या प्राजक्ता व येथील व्यावसायिक दीपक रामचंद्र दरे यांचे चिरंजीव श्रेयस यांचा विवाह रविवारी (ता. २७) येथे झाला. त्याला नगरसह राज्यातील राजकीय नेतेमंडळींसह ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा, तेलंगणाचे जलसंधारणमंत्री व्ही. प्रकाश राव, अर्थतज्ज्ञ एच. एम. देसर्डा, "वनराई''चे राजेंद्र धारिया, व्याख्याते नितीन बानगुडे, माधवराव पाटील शेळगावकर, भास्कर पाटील पेहेरे, डॉ. गिरीश कुलकर्णी या राज्य व राष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणारी मंडळी उपस्थित होती. बच्चू कडू, हर्षवर्धन सपकाळ, राहुले बोंद्रे यांच्यासारख्या प्रयोगशील आमदारांबरोबरच राज्यातील ५० सनदी अधिकारी व विविध क्षेत्रांतील मंडळींनी पूर्ण वेळ दिला. विवाहात कोणत्याही प्रकारचे आहेर, भेटवस्तू व पुष्पगुच्छ यांना तिलांजली देण्यात आली. त्याऐवजी वृक्ष व बियाण्यांचे आहेर स्वीकारण्यात आले. यशवंत प्रतिष्ठानाचे अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख व त्यांच्या पत्नी गौरी, माजी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी, कॅप्टन अशोक खरात यांनी उपक्रमाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर अनेकांनी वृक्ष व बियाण्यांचा आहेर केला. जमलेले वृक्ष व बियाणे आता वन खात्याच्या रोपवाटिकांना देण्यात येणार असून, जूनमध्ये विविध शाळांना त्याचे वाटप होईल, असे पवार यांनी सांगितले. रूढी व परंपरांना फाटा देत पार पडलेल्या या समारंभासाठी सनई, पिपाणी अशी पारंपरिक वाद्ये होती. समारंभासाठी हिवरेबाजार व पंचक्रोशीतील २० ते २५ गावांमधील सर्व घटकांमधील मंडळी राबली. भाऊबंदकी, गाव व समाज जपण्याचा वस्तुपाठ घालून देत, कटुता कमी करून पर्यावरण, पाणी व सामाजिक प्रश्‍नांसाठी लोकसहभागाचा संदेशही या विवाहातून मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com