बीज बँक चळवळ देशभर व्हावी ः राहीबाई पोपेरे

पैशाच्या बँका गल्लोगल्ली भेटतील. परंतु माझ्या शेतकरी राजाला भरवशाचे आणि शाश्‍वत बियाणे मिळावे यासाठी गावरान बियाणे वाचवण्याची चळवळ मोठी केली पाहिजे. प्रत्येक राज्यातील गावांमध्ये देशी बियाण्यांच्या बँक निर्माण व्हाव्यात, अशी भावनिक साद बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी आपल्या प्रबोधन पर भाषणात घातली.
Seed bank movement should be spread all over the country: Rahibai Popere
Seed bank movement should be spread all over the country: Rahibai Popere

अकोले, जि. नगर ः पैशाच्या बँका गल्लोगल्ली भेटतील. परंतु माझ्या शेतकरी राजाला भरवशाचे आणि शाश्‍वत बियाणे मिळावे यासाठी गावरान बियाणे वाचवण्याची चळवळ मोठी केली पाहिजे. प्रत्येक राज्यातील गावांमध्ये देशी बियाण्यांच्या बँक निर्माण व्हाव्यात, अशी भावनिक साद बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी आपल्या प्रबोधन पर भाषणात घातली.

पद्मश्री सौ. राहीबाई पोपेरे यांनी गुरुवारी (ता. २१) संसदेतील खासदारांशी संवाद साधला. आपल्या ग्रामीण जनतेकडे भरपूर ज्ञान आणि विद्वत्ता उपलब्ध असून, बायफ संस्थेने जसा माझा शोध घेतला व मला मदत केली. त्याचप्रमाणे शासनाने ग्रामीण भागातील गुणवत्ता शोधून त्यावर काम केले पाहिजे. असे परखड मत या वेळी बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी व्यक्त केले. बायफचे विषय तज्ज्ञ संजय पाटील यांनी बायफ संस्थेतर्फे होत असलेले बायोडायव्हर्सिटी कंजर्वेशन संदर्भातील काम व त्याची व्याप्ती उपस्थितांसमोर मांडली.

राहीबाई म्हणाल्या...

  • शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत व त्यासाठी मी माझे जीवन समर्पित केलेले आहे.
  • मी माझ्या जीवनात एकमेव ध्येय ठेवलेले आहे आणि ते म्हणजे गावरान बियाणे संवर्धन व आपल्या मातीशी इमान राखणे होय.
  • गावोगावी जाऊन तरुण विद्यार्थ्यांची भेट घेणे व त्यांना जैवविविधतेची माहिती देणे, तसेच पुढील पिढीला हा मौलिक ठेवा काय आहे व त्याचे जतन कसे करायचे याबद्दल मी माहिती देत आहे.
  • मी शाळेत जाऊ शकले नाही, परंतु शाळा माझ्याकडे येते याचा अभिमान आहे.
  • आपला भारत देश सशक्त करण्यासाठी गावठी आणि पारंपरिक बियाण्यांपासून तयार केलेल्या भाज्यांचे उत्पादन वाढवण्यावर भर दिला पाहिजे. तरच येणारी पिढी सक्षम आणि सुदृढ निर्माण होईल. - पद्मश्री राहिबाई पोपेरे

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com