चार पिकांमध्ये पूर्ण बियाणे बदल 

चांगले उत्पादन घ्यायचे तर नवी सुधारित बियाणे पेरा, असे आवाहन कृषी विद्यापीठ, कृषी विभाग सतत करत असते. मात्र तरिही खरिपात बियाणे बदलाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे.
पेरणी
पेरणी

नगर ः चांगले उत्पादन घ्यायचे तर नवी सुधारित बियाणे पेरा, असे आवाहन कृषी विद्यापीठ, कृषी विभाग सतत करत असते. मात्र तरिही खरिपात बियाणे बदलाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे. ‘‘बाजरी, कापूस, तीळ, मका या पिकांचे खरिपात बियाणे बदलाचे प्रमाण शंभर टक्के आहे. इतर पिकांमधील बियाणे बदलून पेरण्याचे प्रमाण कमीच असून जुने आणि घरी उपलब्ध असलेलेच बियाणे पेरली जातात,’’ अशी माहिती कृषी विभागाने दिली. 

खरिपात भात, ज्वारी, तूर, बाजरी, कापूस, तीळ, सूर्यफूल, मका, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. खरीप अथवा रब्बीत पेरणी करताना शेतकरी उपलब्ध असलेले जुने बियाणे वापरतात. मात्र त्यामुळे उगवण क्षमता आणि उत्पादनावरही परिणाम होत असल्याचा अनुभव आहे. कृषी विद्यापीठाने अलीकडच्या काळात खरीप आणि रब्बीत पेरल्या जाणाऱ्या पिकांची सुधारित बियाणे संशोधित केलेली असून ती पेरावीत, असे सातत्याने आवाहन केले जात आहे. असे असूनही बियाणे बदलाचे प्रमाण फारसे वाढताना दिसत नाही. 

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बाजरी, कापूस, तीळ, मका या पिकांची पेरणी करताना खरिपात बियाणे बदलाचे प्रमाण शंभर टक्के आहे. गेल्या वर्षी भातात २२ टक्के, ज्वारीत ७६ टक्के, तूर १४, मूग ८ टक्के, उडीद ५० टक्के, भुईमुगात ३ टक्के, सूर्यफुलात ३८ टक्के, सोयाबीनमध्ये २७ टक्के बियाणे बदल झाला होता. यंदाच्या खरिपात भातात ३० टक्के, ज्वारीत ८० टक्के, तूर २०, मूग २० टक्के, उडीद ७० टक्के, भुईमुगात ५० टक्के, सूर्यफुलात १०० टक्के, सोयाबीनमध्ये ३० टक्के बियाणे बदल गृहीत धरून कृषी विभागाने नियोजन केले असल्याचे सांगण्यात आले  कृषी विभागाचे प्रयत्न अपुरे  खरिपात घेतल्या जाणाऱ्या भात, ज्वारी, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन या पिकांच्या बियाणे बदलाचे प्रमाण कमी आहे. मुळात राज्यातील कृषी विद्यापीठांनी चांगली उत्पादन देणारे वेगवेगळी वाण उपलब्ध करुन दिले आहे. ती शेतकऱ्यांनी पेरावी यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे. शेतीशाळा, अभ्यास दौऱ्यावर मोठा खर्च होत असताना बियाणे बदलून पेरण्याविषयी आणि त्याबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्याबाबत कृषी विभागाचे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे दिसत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com