agriculture news in Marathi seed change of four crops in state Maharashtra | Page 2 ||| Agrowon

चार पिकांमध्ये पूर्ण बियाणे बदल 

टीम अॅग्रोवन
रविवार, 20 जून 2021

चांगले उत्पादन घ्यायचे तर नवी सुधारित बियाणे पेरा, असे आवाहन कृषी विद्यापीठ, कृषी विभाग सतत करत असते. मात्र तरिही खरिपात बियाणे बदलाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे.

नगर ः चांगले उत्पादन घ्यायचे तर नवी सुधारित बियाणे पेरा, असे आवाहन कृषी विद्यापीठ, कृषी विभाग सतत करत असते. मात्र तरिही खरिपात बियाणे बदलाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे. ‘‘बाजरी, कापूस, तीळ, मका या पिकांचे खरिपात बियाणे बदलाचे प्रमाण शंभर टक्के आहे. इतर पिकांमधील बियाणे बदलून पेरण्याचे प्रमाण कमीच असून जुने आणि घरी उपलब्ध असलेलेच बियाणे पेरली जातात,’’ अशी माहिती कृषी विभागाने दिली. 

खरिपात भात, ज्वारी, तूर, बाजरी, कापूस, तीळ, सूर्यफूल, मका, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. खरीप अथवा रब्बीत पेरणी करताना शेतकरी उपलब्ध असलेले जुने बियाणे वापरतात. मात्र त्यामुळे उगवण क्षमता आणि उत्पादनावरही परिणाम होत असल्याचा अनुभव आहे. कृषी विद्यापीठाने अलीकडच्या काळात खरीप आणि रब्बीत पेरल्या जाणाऱ्या पिकांची सुधारित बियाणे संशोधित केलेली असून ती पेरावीत, असे सातत्याने आवाहन केले जात आहे. असे असूनही बियाणे बदलाचे प्रमाण फारसे वाढताना दिसत नाही. 

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बाजरी, कापूस, तीळ, मका या पिकांची पेरणी करताना खरिपात बियाणे बदलाचे प्रमाण शंभर टक्के आहे. गेल्या वर्षी भातात २२ टक्के, ज्वारीत ७६ टक्के, तूर १४, मूग ८ टक्के, उडीद ५० टक्के, भुईमुगात ३ टक्के, सूर्यफुलात ३८ टक्के, सोयाबीनमध्ये २७ टक्के बियाणे बदल झाला होता. यंदाच्या खरिपात भातात ३० टक्के, ज्वारीत ८० टक्के, तूर २०, मूग २० टक्के, उडीद ७० टक्के, भुईमुगात ५० टक्के, सूर्यफुलात १०० टक्के, सोयाबीनमध्ये ३० टक्के बियाणे बदल गृहीत धरून कृषी विभागाने नियोजन केले असल्याचे सांगण्यात आले 

कृषी विभागाचे प्रयत्न अपुरे 
खरिपात घेतल्या जाणाऱ्या भात, ज्वारी, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन या पिकांच्या बियाणे बदलाचे प्रमाण कमी आहे. मुळात राज्यातील कृषी विद्यापीठांनी चांगली उत्पादन देणारे वेगवेगळी वाण उपलब्ध करुन दिले आहे. ती शेतकऱ्यांनी पेरावी यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे. शेतीशाळा, अभ्यास दौऱ्यावर मोठा खर्च होत असताना बियाणे बदलून पेरण्याविषयी आणि त्याबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्याबाबत कृषी विभागाचे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे दिसत आहे. 


इतर अॅग्रो विशेष
‘जंतर-मंतर’वर आजपासून होणार ‘किसान... नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेल्या...
पपईचा हंगाम बहरात; फुलधारणा सुरू जळगाव : खानदेशात पपई पिकाची लागवड यंदा किंचित...
जातीवंत खिल्लार जनावरांच्या किंमतीत घट कोल्हापूर : चपळ असणाऱ्या खिलार बैलांचे संगोपन...
शेतीमालाची सड शोधणाऱ्या उपकरणाची...नाशिक : कांदे, बटाटे, आंबा यांसह विविध फळे व...
कोकणात रविवारपर्यंत जोरदार पाऊस पुणे : कोकणात जवळपास दहा ते बारा दिवसांपासून...
राज्यात सर्वदूर हलक्या सरी पुणे : कोकणातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस कोसळत...
मत्स्योत्पादन सव्वा लाख टनांवररत्नागिरी ः राज्यात गोड्या पाण्यातील...
राज्यात हंगामावर यंदा जादा साखरेचे ओझेकोल्हापूर : यंदाच्या हंगामापूर्वी देशात गेल्या...
राज्यात खरिपाच्या पेरण्या ८३ टक्क्यांवरपुणे  : कोकणाच्या काही भागांत...
जिद्द, चिकाटी, प्रयोगशीलतेतून...नाशिक जिल्ह्यातील सातमाने (ता. मालेगाव) येथील...
राज्यात ठिकठिकाणी मुसळधारेचा इशारा पुणे : महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी ते कर्नाटक...
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये...पुणे : कोकणात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे धुवाधार...
अकोला कृषी विद्यापीठात ६० टक्के पदे...अकोला ः या जिल्ह्यात कृषी खात्यात कर्मचाऱ्यांची...
पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तिसागर भरू दे...पंढरपूर, जि. सोलापूर : पंढरपुरात पुन्हा एकदा...
निधीअभावी सिंचन विहीर योजनेला खीळ नागपूर : विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये १३ हजार...
दूध भेसळीची चर्चा डेअरी उद्योगावर संकट...पुणे ः शेतकऱ्यांच्या दुधाला कमी भाव मिळत असल्याची...
पेरा अंतिम टप्प्यात; कर्जाची प्रतीक्षा...पुणे ः राज्यात खरीप पेरा शेवटच्या टप्प्यात...
वैशिष्ट्यपूर्ण वाणांसह तंत्रज्ञान...वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सोयाबीनचे...
विदर्भात जोर वाढणार पुणे : मुंबईसह, कोकणातील बहुतांश भागात मुसळधार...
कोकण, मध्य महाराष्ट्रात संततधारपुणे : कोकणातील बहुतांश भागांत पावसाचा कहर सुरू...