लॉकडाऊनमधून बियाणे उद्योग वगळला

शेतकऱ्यांना बियाण्यांचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी राज्यातील बियाणे उद्योगातील कर्मचाऱ्यांना लॉकडाऊनमधून वगळण्यात आले आहे.
seed
seed

पुणे : शेतकऱ्यांना बियाण्यांचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी राज्यातील बियाणे उद्योगातील कर्मचाऱ्यांना लॉकडाऊनमधून वगळण्यात आले आहे. 

कृषी आयुक्तालयाने बियाणे उद्योगाला दिलासा देणारी पावले टाकली आहेत. संचारबंदी असली तरी अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ मधील तरतुदींचा आधार घेता बियाण्यांची पुरवठा व वाहतूक साखळी सुरळीत ठेवणे बंधनकारक असल्याचे आयुक्तालयाने स्पष्ट केले. 

बियाण्यांचा काढणी कालावधी फेब्रुवारी ते मे या दरम्यान असल्यामुळे लॉकडाऊन काळात बियाणे उद्योगातील कर्मचाऱ्यांना अडचणी येणार नाहीत याची दखल घेतली जात आहे. काढणीची कामे, काढणी पश्चात प्रक्रिया, बियाण्यांची वाहतूक व पॅकिंग ही सर्व कामे राज्यभर सद्या सुरू आहेत. 

बियाणे उद्योगात सध्या सोयाबीन, हायब्रीड मका, ज्वारी, भरड धान्ये, कापूस, कडधान्ये, भात, भुईमुग व भाजीपाला बियाणे उत्पादनाबाबत प्रक्षेत्रांपासून ते प्रोसेसिंग युनिटपर्यंत विविध कामे सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

बियाणे उद्योगातील पुरवठा साखळी सुरळीत ठेवणारी सर्व कामे मार्च ते जून या कालावधीत होतील. प्रक्रिया केलेले बियाण्यांचे साठे स्टॉक पॉईंट तसेच गोदामांमध्ये हलवावे लागतील. त्यासाठी पॅकिंग मटेरियल्स्, रासायनिक बिजप्रक्रिया सामग्री पुरवठादार, वितरक, विक्रेते या घटकांची जबाबदारी मोठी आहे, अस आयुक्तालयाने नमुद केले आहे.  बियाणे कंपन्यांना काय दिल्या सूचना 

  • पाचपेक्षा जादा व्यक्तींना प्रक्रिया युनिट किंवा साठवण स्थळावर एकत्र करू नका
  • तीन फुटाचे सामाजिक अंतर ठेवा
  • पुरेसे मास्क,सॅनिटायझर उपलब्ध करून द्या
  • लॉकडाऊन कालावधीत कोणाचीही मजुरी, वेतन कपात करू नये
  • कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना लॉकडाऊन कालावधीत बाहेरील कामे करण्यास मान्यता  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com