agriculture news in Marathi, seed industry seek permission for HTBT, Maharashtra | Agrowon

एचटी कापूस वाण परवानगीची बियाणे उद्योगाला अपेक्षा

विनोद इंगोले
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

नागपूर ः शेतकऱ्यांकडून अवैधरीत्या तणाला सहनशील (एचटी- हर्बीसाइड टॉलरंट) कपाशी वाण लावले जात असल्याने बियाणे उद्योग क्षेत्रासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. या वर्षी मोठ्या प्रमाणात बियाणे परत आल्याने हतबल झालेल्या बियाणे उद्योगाकडूनच आता एचटी कपाशी वाणाला मान्यता देण्याचा सूर आवळला जात आहे. त्यासाठी सप्टेंबर-ऑक्‍टोबरमध्ये केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची भेटही घेतली जाणार असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. 

नागपूर ः शेतकऱ्यांकडून अवैधरीत्या तणाला सहनशील (एचटी- हर्बीसाइड टॉलरंट) कपाशी वाण लावले जात असल्याने बियाणे उद्योग क्षेत्रासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. या वर्षी मोठ्या प्रमाणात बियाणे परत आल्याने हतबल झालेल्या बियाणे उद्योगाकडूनच आता एचटी कपाशी वाणाला मान्यता देण्याचा सूर आवळला जात आहे. त्यासाठी सप्टेंबर-ऑक्‍टोबरमध्ये केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची भेटही घेतली जाणार असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. 

पर्यावरण व मानवी आरोग्याला असणारा धोका अशा विविध कारणांमुळे देशांतर्गंत घेण्यात आलेल्या चाचण्यानंतरही तणांना सहनशील (एचटी) कपाशी वाणाला केंद्र सरकारकडून परवानगी देण्यात आली नाही. त्यातच सरकारकडून सध्या लागवडीस मान्यता असलेल्या बीटी कपाशी वाणांवरील प्रति पाकीट शुल्कही सातत्याने कमी करण्यावर भर दिला गेला. या वर्षी २० रुपयांप्रमाणे प्रति पाकीट (ट्रेट) आकारणी होत आहे. गेल्या वर्षी ७४० रुपये बीजी-२ वाणासाठी आकारले जात होते. त्यातून ३९ रुपये प्रति पाकीट शुल्क मोन्सॅटो कंपनीला मिळत होते.

एचटी वाणाच्या बाबतीही प्रति पाकीट शुल्क कमी केले जाईल या भीतीतून मोन्सॅन्टोकडून देखील भारतात तंत्रज्ञान देण्यास नकार आल्याचे सूत्र सांगतात. बियाणे उद्योग क्षेत्रातील जबाबदार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या बीटी कपाशी वाणाची महाराष्ट्रात १ कोटी ५५ ते ६० लाख पाकिटे दरवर्षी विकली जातात. गेल्या काही वर्षांपासून राज्यात अवैध एचटी कापूस वाणाचा पेरा वाढीस लागला. त्याचा फटका बियाणे उद्योगाला बसत आहे. विशेष म्हणजे देशात ३५ ते ४० टक्‍के क्षेत्रावर एचटी वाणांची अवैध लागवड झाल्याचे खुद्द शासकीय आकडेवारी सांगते. महाराष्ट्रातही या वर्षी हे क्षेत्र वाढले आहे. साहजिकच एचटी बियाण्यांबाबत बियाणे उद्योगातून सूर आळवला जात आहे. 

केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे करणार पाठपुरावा
नॅशनल सीड असोसिएशन ऑफ इंडियाने तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांच्याकडे या संदर्भाने पाठपुरावा केला. परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी, आता विद्यमान केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडून बियाणे उद्योगाला अपेक्षा आहेत. सप्टेंबर, ऑक्‍टोबरमध्ये केंद्रीय कृषिमंत्र्यांची भेट घेत सीड असोसिएशन हा मुद्दा रेटणार आहे. परवानगी मिळाल्यास बीजोत्पादन सुरू होऊन लवकरच बियाणे उपलब्धतेचा आशावाद उद्योग क्षेत्रातील जाणकार व्यक्‍त करीत आहेत.


इतर अॅग्रोमनी
थकीत खत अनुदान ३३ हजार कोटींवरखत उत्पादन उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या...
कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्थिती...कापसाचा नवीन हंगाम (२०१९-२०) सुरू होऊन जवळपास दोन...
मध ठरू पाहतेय साखरेला पर्याय...खरंच ‘...नागपूर : साखरेमुळे वाढत चाललेल्या आरोग्याच्या...
कापसाची ४९०० ते ५००० रुपये दरात खेडा...जळगाव  ः राज्यात कापूस पट्ट्यात कापसाचे दर...
पपईला जागेवरच १८ रुपये प्रतिकिलो दरजळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम सुरू झाला असून,...
गुजरातमधून मागणी मंदावल्याने गूळ दरांत...कोल्हापूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गुजरातला...
वाशीम : त्रुट्यांमुळे ‘किसान सन्मान’...वाशीम  ः पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा...
हळद, गवार बीच्या फ्युचर्स किंमतीत घटया सप्ताहात हरभरा, गवार बी, हळद व गहू यांच्या...
नागपुरी संत्रा चीनच्या 'प्रोटोकॉल'...नागपूर : माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार...
संकेश्‍वरी मिरचीचा ‘ठसका’ यंदा गायबकोल्हापूर : गेल्या महिन्यातील अतिवृष्टीने यंदा...
वायदा बाजारात सोयाबीन, कापसाच्या...या सप्ताहात खरीप मका, हळद, गवार बी यांच्यात घट...
कडधान्यातील स्वयंपूर्णता यंदा ठरणार...नवी दिल्ली ः देशात यंदा मॉन्सूनच्या उशिरा...
देशात रब्बी मूग पेरणीत २९ टक्के घटनवी दिल्ली: देशात रब्बी हंगामाच्या पेरणीला...
सोयाबीनशिवाय सर्व पिकांच्या वायदा...या सप्ताहात गहू व गवार बी वगळता इतर सर्व...
राज्यात कापूस दर हमीभावापेक्षा कमीचजळगाव  ः राज्यात कापसाचे दर हमीभावापेक्षा...
‘कॉन्टॅक्टलेस लेंडिंग’ पद्धतीची...नोव्हेंबर २०१६ मध्ये सरकारने ५०० आणि १०००...
चौदा गुंठ्यांतील वैविध्याने अर्थकारणाला...पाच एकर शेतीचे नियोजन करताना ऊस, आले, केळी अशा...
तीन वर्षांत हळदीच्या दरात दीड हजार...सांगली ः सांगली जिल्ह्यासह अन्य भागांत  ...
मका, हळद, गव्हाच्या किमतीमध्ये वाढरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...
पाडव्याच्या मुहूर्तावर कोल्हापुरात...कोल्हापूर  : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार...