बियाणे उद्योग पाच वर्षांत दुप्पट होणार

वाढती लोकसंख्या आणि पोषक आहाराकडे लोकांचा वाढतो आहे. त्यामुळे भारतात वाढत्या लोकसंख्येची भाजीपाल्याची मागणी भागविण्यासाठी पुढील पाच वर्षांत भाजीपाल्याचे उत्पादन ३५ टक्क्यांनी वाढवावे लागणार आहे. - सचिन सचदेवा, सहयोगी अध्यक्ष, ‘इक्रा’
बियाणे उद्योग पाच वर्षांत दुप्पट होणार

नवी दिल्ली ः देशाची वाढती लोकसंख्या विचारात घेता येणाऱ्या काळात भाजीपाल्याला मोठी मागणी वाढणार आहे. ही वाढलेली मागणी पूर्ण करताना भाजीपाला बियाण्यालाही मागणी वाढणार आहे. त्यामुळे येणाऱ्या पाच वर्षांत देशातील भाजीपाला बियाणे उद्योग दुप्पटीने वाढून सध्याच्या ४ हजार कोटींवरून ८ कोटींवर जाईल, अशी माहीत ‘इक्रा’ या नामांकन संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून दिली आहे.  भाजीपाला बियाणे उद्योग पाच वर्षांत दुप्पट होणार असून त्यात जास्त वाव हा हायब्रीड बियाण्याला राहील, असेही अहवालात म्हटले आहे. ‘‘सध्या लोकांमध्ये आरोग्यविषयक जागृती होत आहे. लोक पोषक आणि पौष्टीक खाण्याकडे वळत आहेत. त्यातच लोकसंख्येचा वाढता दर यामुळे भाजीपाला खाण्याकडे लोकांचा वाढतो आहे. भारतात वाढत्या लोकसंख्येची भाजीपाल्याची मागणी भागविण्यासाठी पुढील पाच वर्षांत भाजीपाल्याचे उत्पादन ३५ टक्क्यांनी वाढवावे लागणार आहे. उत्पादन वाढविण्यासाठी लागवड वाढवावी लागेल. त्यासाठी मोठ्या प्रमाणात बियाण्याला मागणी वाढले. तसेच शेतकरी जास्त उत्पादनासाठी हायब्रीड बियाण्याचीही मागणी वाढवतील. त्यामुळे हायब्रीड बियाणे उद्योगही वाढेल. त्यामुळे येणाऱ्या पाच वर्षांत बियाणे उद्योगाची उलाढाल सध्याच्या ४ हजार कोटींवरून ८ हजार कोटींवर जाईल. ही वाढ दुप्पट आहे’’. जागतिक सरासरीपेक्षा कमी उत्पादकता भारतात मागील अडीच दशकापासून भाजीपाल्याच्या उत्पादनात खूपच धीमी वाढ झाली आहे. वर्ष १९९२ मध्ये भाजीपाला उत्पादन ५९ दशलक्ष टन होते, तर २०१८ मध्ये १८१ दशलक्ष टन उत्पादन होण्याचा अंदाज आहे. ही वाढ देशात वाढलेली भाजीपाला लागवड आणि उत्पादकतेतील वाढीमुळे झाली आहे. तसेच केंद्र आणि राज्य सरकारांनीही भाजीपाला उत्पादन वाढीसाठी अनेक उपाय केले आहेत. उत्पादन वाढीच्या धिम्या गतीनेही भारतातील उत्पादकताही अनेक देशांच्या उत्पादकतेपेक्षा जास्त आहे. मात्र जागतिक सरासरी उत्पादकतेपेक्षा कमी आहे.   हायब्रीड बियाणे उपयुक्त ‘‘शेतकऱ्यांमध्ये हायब्रीड बियाण्याबद्दल जागृती केल्यास आणि त्यांना अावश्यक ते तंत्रज्ञान उपलब्ध करून दिल्यास या बियाण्याचा मोठा फायदा होणार आहे. भाजीपाला पीक उत्पादन वाढीसाठी हायब्रीड बियाण्याचा वापर उपयुक्त ठरेल. तसेच देशातील विविध भागांत त्या त्या ठिकाणच्या बदलत्या वातावरणात तग धरणाऱ्या हायब्रीड बियाण्याचा विकास करणे गरजेचे आहे. त्यासाठी या बियाण्याच्या संशोधन आणि विकासासाठी पर्याप्त निधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे,’’ असे ‘इक्रा’चे सहयोगी अध्यक्ष सचिन सचदेवा म्हणाले.  विपणनातील नियोजनाअभावी तुटवडा     पोषणविषक मार्गदर्शक तत्त्वांनुसार देशात प्रतिव्यक्ती ११० किलो भाजीपाल्याची आवश्यकता आहे. तर भारतात सध्या प्रतिव्यक्ती १४० किलो भाजीपाला उपलब्ध आहे. तरीही भाजीपाला वितरण साखळीतील नियोजनाअभावी भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण होतो. त्यामुळे लोकांना पोषणविषयक गरज भागविता येत नाही. तसेच भाजीपाला नाशवंत असल्याने त्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होते. भाजीपाल्याची काढणी, साठवण, प्रतवारी, वाहतूक, पॅकिंग आणि वितरण या काळात जवळपास ३० टक्के नासाडी होते.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com