विक्रेत्यांना बियाणे परवाना आता पाच वर्षांसाठी

राज्यात सध्या २२०० रुपये शुल्क भरून परवाना ऑनलाइन दिला जातो. परवान्याचा कालावधी पाच वर्षांचा झाल्याचे पत्र आमच्याकडे आलेले नाही. मात्र, तसा निर्णय झाला असल्यास विक्रेत्यांचा त्रास कमी होईल. - विजयकुमार घावटे, प्रभारी गुणनियंत्रण संचालक
विक्रेत्यांना बियाणे परवाना आता पाच वर्षांसाठी
विक्रेत्यांना बियाणे परवाना आता पाच वर्षांसाठी

पुणे:  देशातील सर्व बियाणे विक्रेत्यांना मिळणाऱ्या परवान्याची मुदत आता पाच वर्षांची करण्यात आली आहे. यामुळे दर तीन वर्षांनी परवाना देण्याची पध्दत बंद होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.  राष्ट्रीय बियाणे नियंत्रण आदेश १९८३ नुसार परवाना असल्याशिवाय बियाणे विक्री करता येत नाही. मात्र, परवान्याची मुदत केवळ तीन वर्षांची ठेवण्यात आली होती. यामुळे विक्रेत्यांची गैरसोय होत होती. ऑनलाइन कामकाजाअभावी दर तीन वर्षांनी कार्यालयांमध्ये हेलपाटे तसेच त्यातून आर्थिक देवघेव, यामुळे विक्रेते हैराण झाले होते.   केंद्रीय कृषी मंत्रालयाचे सह सचिव अश्विनीकुमार यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. “बियाणे नियंत्रण सुधारित आदेश २०१९ अनुसार आता परवाना कालावधी तीन ऐवजी पाच वर्षांचा राहील.” असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. ऑल इंडिया ॲग्रो इनपुट डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष मनमोहन कलंत्री म्हणाले, की बियाणे आणि खत विक्रीची परवाना मुदत पाच वर्षांची करण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. त्यापैकी बियाणे परवाना कालावधी दोन वर्षांनी वाढविण्याचा केंद्र सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. यामुळे डिलर व कृषी विभागावर येणारा ताण कमी होईल. राज्याच्या कृषी विभागाकडे या निर्णयाची प्रत अद्याप पोचलेली नाही. अर्थात, मूळ परवान्यात काही अतिरिक्त बाबी जोडणे किंवा सुधारणा असल्यास विक्रेत्याला पाच वर्षांची वाट न बघता मधल्या काळात पुन्हा अर्ज करावा लागेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com