agriculture news in marathi Seed Mother BeejMata Rahibai Popere will address the Lok Sabha members | Agrowon

बीजमाता राहीबाई पोपेरे करणार लोकसभा सदस्यांना उद्या संबोधित 

शांताराम काळे 
सोमवार, 18 जानेवारी 2021

पारंपरिक बियाण्यांची जोपासना करणाऱ्या बीजमाता राहीबाई सोमा पोपेरे या लोकसभा सदस्यांना उद्या (ता.१९) ऑनलाइन संबोधित करणार आहेत. 

अकोले, जि. नगर : पारंपरिक बियाण्यांची जोपासना करणाऱ्या बीजमाता राहीबाई सोमा पोपेरे या लोकसभा सदस्यांना ऑनलाइन संबोधित करणार आहेत. आपल्या गावरान बियाणे संवर्धन व बीज बँक उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती उद्या (ता.१९) दुपारी १२.४५ वाजता सांगणार आहेत. 

लोकसभा पोर्टल व चॅनेलवर हे संबोधन दाखवले जाणार आहे, अशी माहिती डॉक्टर सीमा कौल सिंह यांनी दिली आहे. आजपर्यंत यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केलेल्या व जगभर बीजमाता म्हणून प्रसिद्ध असलेल्या अकोले तालुक्यातील कोंभाळणे या आदिवासी गावातील राहीबाई यांनी शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रातील पहिली बीज बँक आपल्या छोट्याशा झोपडीत बायफ संस्थेच्या मार्गदर्शनाने सुरू केली होती. 

राहीबाई यांचा प्रवास सातत्याने गरीब शेतकऱ्यांसाठी बीजनिर्मिती व वितरण करून सुरू आहे. त्यासाठी बायफ संस्थेच्या मदतीने कळसूबाई परिसर स्थानिक बियाणे संवर्धन संस्था स्थापन करून त्यामार्फत राज्य आणि देश पातळीवरील बीजसंवर्धनाचे कार्य हाती घेण्यात आले आहे. आजपर्यंत विविध पुरस्कारांनी सन्मानित राहीबाई यांनी आपले जीवन देशी बियाणे संवर्धन करण्यासाठी समर्पित केलेले आहे. त्यांना राष्ट्रीय पातळीवरील मानाचा आणि महत्त्वाचा मानला जाणारा नारीशक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. पद्मश्री पुरस्काराचे वितरण लवकरच होणार आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभा सदस्यांना त्या काय मार्गदर्शन करणार आहेत हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

बायफ संस्थेने सुरू केलेल्या देशी बीजसंवर्धन उपक्रमाची दखल देश आणि विदेशातही घेण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक राज्यात देशी बियाण्यांच्या बँका शेतकऱ्यांसाठी निर्माण करण्यासाठी केंद्र शासन विशेष प्रयत्न करत आहे. या मार्गदर्शन सत्रामध्ये बायफ संस्थेच्या वतीने विषय तज्ज्ञ संजय पाटील व विभागीय अधिकारी जितीन साठे हे सौ. पोपेरे यांच्यासोबत सहभागी होणार आहेत. 
 


इतर अॅग्रो विशेष
एकत्र या अन् ठरवा भावसातारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला कोबीला...
अद्ययावत ‘मंडी’चे स्वप्न!दिल्लीच्या सीमारेषेवर पाच ठिकाणी गेले ९२ दिवस...
राज्यात ७ कोटी ९७ लाख क्विंटल साखरेचे...नगर ः राज्यात यंदाही उसाचे जोरदार गाळप सुरू आहे....
‘लम्पी स्कीन’मुळे दूध उत्पादनाला...नगर ः ‘लम्पी स्कीन’ आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या...
राज्यात चार नवे कृषी संशोधन प्रकल्पपुणे : राज्यातील कृषी शिक्षण व संशोधनाला चालना...
वंचित शेतकऱ्यांसाठी राज्यांनी पुढाकार...पुणे : ‘‘आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देशातील...
राज्यात थंडीत किंचित वाढपुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात आकाश निरभ्र...
रत्नागिरी हापूस पोहोचला लंडनलारत्नागिरी ः लंडनस्थित भोसले एंटरप्रायझेस यूके आणि...
रब्बी ज्वारीचा हुरडा वाण विकसितपरभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
डोंगरगावात फळपीक केंद्रित प्रयोगशील...नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथील...
आगाप नियोजनातून आंब्याला उच्चांकी दरकोकणातील काही आंबा बागायतदार आगाप (हंगामपूर्व)...
५० वर्षांच्या वृक्षाचे पर्यावरणीय मूल्य...साधारणतः आपण कुठल्याही वस्तूचे मूल्यमापन विविध...
कोकणात ढगाळ वातावरण पुणे ः अरबी समुद्राच्या आग्नेय भागात चक्रिय...
उन्हाळ कांद्याची बाजारात ‘एन्ट्री’ नाशिक : जिल्ह्यात रब्बी हंगामातील आगाप उन्हाळ...
‘पीएम-किसान’मध्ये महाराष्ट्राचा डंका पुणे : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत (पीएम-...
‘ई-नाम’द्वारे १०० कोटी पेमेंट झाल्याचा...पुणे ः गेल्या चार वर्षांत ‘ई-नाम’ अंतर्गत ४ हजार...
खानदेशात पपईची ६.४० रुपये किलोने होणार...जळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे....
'क्यूआर कोड'द्वारे वृक्ष, पिकांची २१०...कोल्हापूर : अलीकडच्या काळात क्यूआर कोडचे महत्त्व...
कडक जमिनींसाठी ठरतोय ‘व्हायब्रेटिंग...खोल जमिनीत तयार झालेला कडक थर फोडण्यासाठी तसेच...
प्रगतिशील शेतीची खरी ‘वाट’कोरडवाहू जमिनी ओलिताखाली यायला लागल्या पासून...