agriculture news in Marathi seed now available in Kolhapur district Maharashtra | Agrowon

कोल्हापुरात बियाण्यांची उपलब्धता होण्यास प्रारंभ 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 मे 2020

कोरोनामुळे बियाणे उपलब्धतेवर फारसा परिणाम झाला नाही. शासनाने खते बियाणे वाहतूकीला सुट दिल्याने यंदा बियाणे वेळेवर शेतकऱ्यांना मिळेल याकडे आम्ही लक्ष देत आहोत. महाबीजबरोबर खासगी कंपन्यांचेही बियाणे उपलब्ध होईल परिणामी टंचाई भासणार नाही. 
- चंद्रकांत सुर्यवंशी, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर 

कोल्हापूर: लॉकडाऊनमुळे खतांच्या उपलब्धतेबाबत अडचणी येत असल्या तरी बियाणे मात्र मुबलक प्रमाणात उपलब्ध होइल अशी शक्‍यता आहे. लॉकडाऊनमध्ये खते व बियाणे विक्रेत्यांना मुभा देण्यात आली होती. यामुळे सुरवातीचे काही दिवस वगळता गेल्या पंधरा दिवसांहून अधिक काळ निविष्ठा केंद्रे सुरु आहेत. यामुळे खते व बियाणांची वाहतूक सुरळीत असल्याचे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने स्पष्ट केले. खरीपासाठी काही कंपन्यांचे बियाणे लांबून येत असल्याने थोडी फार अडचण वगळता बियाणे वेळेत मिळण्याची शक्‍यता आहे. 

लॉकडाऊनच्या काळात सरकारने बियाणे निर्मितीला प्रतिबंध न केल्याने ज्या कंपन्यांकडे वाहतूक व्यवस्था चांगली आहे. त्या कंपन्यामार्फत जिल्ह्यात बियाणांची उपलब्धता तात्काळ होवू शकते. बियाणामुळे पेरण्या रखडू नयेत यासाठी कृषी विभागा प्रयत्न करीत आहे. 

जिल्ह्याला सुमारे 37 हजार क्विंटल बियाणांची गरज असते. आतापर्यंत मागणीच्या पंधरा टक्केपर्यंत बियाणे उपलब्ध झाले आहे. येत्या पंधरा दिवसात बियाणे गतीने उपलब्ध होण्याची शक्‍यता असल्याचे कृषी विभागाच्या सुत्रांनी सांगितले. जसा वळवाचा पाऊस होइल व मशागतींना वेग येइल तशी टप्प्याने बियाण्याची मागणी होत असते. सध्या अनेक ठिकाणी वळीव पाऊस झाला आहे. यामुळे मशागतीही सुरु आहेत. परिणामी पंधरा मे पासून बियाणांची मागणी वाढण्याची शक्‍यता आहे. यादृष्टीने नियोजन सुरु असल्याचे कृषी विभागाचय सुत्रांनी सांगितले. 

जिल्ह्यात प्रामुख्याने भात, सोयाबीन आदि पिके खरीप हंगामात जादा प्रमाणात घेतली जातात. शेतकऱ्यांना ज्या जातीचे बियाणे हवे आहे त्याची मागणी कृषी निविष्ठाधारकांनी अगोदरच नोंदविली होती. यानुसार हे बियाणे केंद्रांमध्ये हळूहळू उपलब्ध होत आहे. महाबीज बरोबर खासगी कंपन्यांचे बियाणेही अनेक ठिकाणी शिल्लक असल्याने त्याची टंचाई भासणार नसल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले. 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...