Agriculture News in Marathi Seed production of ‘Mahabeej’ Heavy rains hit the event | Agrowon

  ‘महाबीज’च्या बीजोत्पादन  कार्यक्रमाला अतिवृष्टीचा फटका 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 18 ऑक्टोबर 2021

‘महाबीज’च्या परभणी विभागातील सहा जिल्ह्यांतील यंदाच्या खरीप हंगामातील बीजोत्पादन कार्यक्रमाला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. परिणामी, एकूण बीजोत्पादनात ९० हजार ८७४ क्विंटलची घट येऊन सुमारे २ लाख १९ हजार ७५६ क्विंटल बियाणे उपलब्ध होईल.

परभणी : ‘महाबीज’च्या परभणी विभागातील सहा जिल्ह्यांतील यंदाच्या खरीप हंगामातील बीजोत्पादन कार्यक्रमाला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. परिणामी, एकूण बीजोत्पादनात ९० हजार ८७४ क्विंटलची घट येऊन सुमारे २ लाख १९ हजार ७५६ क्विंटल बियाणे उपलब्ध होईल. ही माहिती विभागीय व्यवस्थापक ए. एल. सोनोने यांनी दिली. 

महाबीजच्या परभणी विभागांतर्गत परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या सहा जिल्ह्यांमध्ये यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात विविध पिकांच्या प्रमाणित आणि पायाभूत बियाण्यांचा मिळून एकूण २९ हजार ७२१ हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रम प्रस्तावित होता. परंतु प्रत्यक्षात १८ हजार ५६२.३० हेक्टर एवढे क्षेत्र बीजोत्पादन पिकांखाली आहे. त्यापासून ३ लाख १० हजार ६३० क्विंटल बीजोत्पादनाचे उद्दिष्ट होते. परंतु सततच्या पावसात भिजल्यामुळे बियाणे डागील झाले आहे. प्रत खालावली आहे.

त्यामुळे बीजोत्पादनात ९० हजारांवर क्विंटलची घट येऊन २ लाख १९ हजार ७५६ क्विंटल बियाणे उपलब्ध होऊ शकेल. त्यात १६ हजार ७०५ हेक्टरवरील सोयाबीनचे २ लाख ९० क्विंटल प्रमाणित बियाणे आणि १ हजार १८० हेक्टरवरील सोयाबीनपासून १४ हजार ९५९ क्विंटल पायाभूत बियाणे, उपलब्ध होऊ शकेल. ३२४.२० हेक्टरवरील तुरीपासून २ हजार ३०९ क्विंटल, ५३ ६० हेक्टरवरील मुगापासून २५९ क्विंटल आणि २६८.२० हेक्टरवरील उडदापासून १ हजार २४९ क्विंटल, ३०.४० हेक्टर ज्यूटपासून ९० क्विंटल बियाण्याचा समावेश आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

जिल्हानिहाय पीकनिहाय खरीप बिजोत्पादन क्षेत्र (हेक्टरमध्ये) 
 

जिल्हा सोयाबीन तूर मूग उडीद ज्यूट
परभणी ५७३४ १२८.४० ५३.६० ३९.६०. २२.४०
हिंगोली ५५८६ ०० ०० ५३ ०० 
नांदेड १२७६ ०० ०० ५३ ०० 
लातूर ३७०७ ११६. ०० ४४.४० ४ 
उस्मानाबाद १३५१ ४२.८० ०० ३६.८० ४ 
सोलापूर १५० ३६.६० ००. ४८.८० ००

 


इतर बातम्या
कापूस उत्पादकांचा बळी नकोकापसाचे दर वाढल्यामुळे कापूस प्रक्रिया...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात...पुणे : राज्यात सुरू असलेला पाऊस कमी होण्याची...
रब्बी पिकांसह फळबागांना फटकापुणे ः राज्यात मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण...
ढगाळ वातावरणामुळे पिकांवर किडींचा...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत गेल्या काही...
ऊस वाहतूक दरासाठी टप्पा पद्धतीला...पुणे ः उसाची तोडणी व वाहतूक दर ठरवताना आधीची...
आंदोलनातील मृत शेतकऱ्यांची सरकारकडे...नवी दिल्ली : कृषी कायदे रद्द करण्यासाठी झालेल्या...
उन्हाळी कांद्याच्या घसरलेल्या दरामुळे...नाशिक : साठवलेल्या उन्हाळी कांद्याचा हंगाम अंतिम...
जळगाव जिल्ह्यात २५ हजार कृषिपंपांची वीज...जळगाव ः  जिल्ह्यात वीजबिले भरल्याशिवाय...
सोयाबीन वायद्यांत सुधारणापुणे ः बाजारात सोयाबीनचे दर पडल्यानंतर केंद्रीय...
वऱ्हाडावर ढगांचे आच्छादन;  तूर, हरभरा...अकोला ः हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार...
यवतमाळ जिल्ह्यात शाळा  महावितरणच्या ‘...यवतमाळ : वीज महावितरण कंपनीची वाढती थकबाकी वसूल...
शेतकरी संघटनेने केली  चुकीच्या...बुलडाणा : थकीत वीजबिल वसुलीसाठी महावितरणने...
‘फॅसिझमविरोधात लढण्यास  सक्षम पर्याय...मुंबई : देशात सुरू असलेल्या फॅसिझमविरोधात लढण्यास...
आझाद मैदानावर बुधवारपासून  गट सचिवांचे...सांगली ः राज्यातील गट सचिवांचे सेवा व वेतनाचे...
विमा कंपनीच्या कार्यालयात  मुक्काम...जालना : मोसंबीचा विमा संरक्षण कालावधी १५ सप्टेंबर...
पीडीसीसी’च्या निवडणुकीसाठी २९ अर्ज दाखल पुणे : राज्यात अग्रेसर असलेल्या पुणे जिल्हा...
मालेगांव पाटबंधारे विभागात पाटपाणी व...नाशिक : रब्बी हंगाम २०२१-२२ मध्ये पिण्यासाठी व...
मराठवाड्यात ढगांची दाटी; भुरभुर औरंगाबाद : मराठवाड्यातील बहुतांश भागात पुन्हा...
खानदेशात लाल कांद्याचे दर नीचांकी...जळगाव ः खानदेशात लाल कांद्याचे दर नीचांकी स्थितीत...
सोलापूर ः ‘सिद्धेश्‍वर’चे गाळप चार...सोलापूर ः सहवीजप्रकल्प, गाळपक्षमता वाढवणे, बॉयलर...