agriculture news in marathi, seed production, islampur, sangli | Agrowon

‘जय शिवराय’ गटाची बीजोत्पादनातील कंपनी, वार्षिक ३४० टन विक्रीपर्यंत मजल
शामराव गावडे 
बुधवार, 8 मे 2019

सांगली जिल्ह्यातील उरुण इस्लामपूर येथील जय शिवराय स्वयंसहायता बचत गटाने परिसरातील शेतकऱ्यांना बीजोत्पादनाचा धवल मार्ग दाखवला आहे. यंदा शेतकरी कंपनीची स्थापना करून गटाने पुढील पाऊल टाकले आहे. तीन वर्षांत दीडशे टनांपासून ते ३४० टनांपर्यंत असा सोयाबीन व हरभरा बियाणे उत्पादन, विक्री व उलाढालीचा आलेख उंचावता ठेवला आहे. 

सांगली जिल्ह्यातील उरुण इस्लामपूर येथील जय शिवराय स्वयंसहायता बचत गटाने परिसरातील शेतकऱ्यांना बीजोत्पादनाचा धवल मार्ग दाखवला आहे. यंदा शेतकरी कंपनीची स्थापना करून गटाने पुढील पाऊल टाकले आहे. तीन वर्षांत दीडशे टनांपासून ते ३४० टनांपर्यंत असा सोयाबीन व हरभरा बियाणे उत्पादन, विक्री व उलाढालीचा आलेख उंचावता ठेवला आहे. 

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पेठ नाक्‍यापासून तीन किलोमीटर आत उरुण- इस्लामपूर गाव लागते. ऊस पिकाचा हा हुकमी व समृद्ध पट्टा. सोयाबीन, भुईमूग, ऊस ही या भागांतील मुख्य पिके आहेत. गावातील दिग्‍विजय विलास पाटील हे ‘एमएस्सी ॲग्री’ झालेला तरुण. घरची सहा एकर जमीन. नोकरीच्या मागे न लागता प्रयोगशील शेती करण्याकडेच त्यांचा सुरवातीपासून कल होता. गावातील काही शेतकऱ्यांना एकत्र करून जय शिवराय शेतकरी स्वयंसहायता बचत गटाची स्थापना त्यांच्या पुढाकारातून झाली. ते एका राजकीय पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आहेत. समाजसेवा म्हणून परिसरातील अनेक गरजू व्यक्तींना रूग्णसेवेचा लाभ दिल्याचे त्यांनी सांगितले. 

बीजोत्पादनाचा मार्ग 
बीजोत्पादन ही संकल्पना गटातील सदस्यांच्या चर्चेतून पुढे आली. ती यशस्वी राबवण्यास सुरवात झाली. गटातर्फे सोयाबीन, हरभरा, गहू, भात आदींचे फाउंडेशन, प्रमाणित बियाणे तयार केले जाते. कृषी विद्यापीठ वा संशोधन केंद्रातून पैदासकार (ब्रीडर) बियाणे आणले जाते. विद्यापीठातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली लागवड व्यवस्थापन केले जाते. गटाने यंदा शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून पुढचे पाऊल टाकले आहे. विकास सोसायटी, शेतकरी मेळावे याद्वारे गटाच्या बियाण्याचे मार्केटिंग व विक्री केली जाते. गावातील विविध विक्री केंद्रात बियाणे विक्रीसाठीही ठेवण्यात येते. पूर्वी बीजोत्पादनाचे प्लॉट घेतल्यानंतर क्लिनिंग व ग्रेडिंग बाहेरुन करावे लागायचे. त्यासाठी वाहतूक व अन्य खर्च जादा यायचा. 

स्वतःचे युनिट 
आता कंपनीने महाराष्ट्र शासनाच्या स्पर्धात्मक कृषी विकास योजनेमार्फत क्लिनिंग-ग्रेडिंग युनिट घेतले आहे. सुमारे ५०० टन गोदामाची जागाही भाडेतत्त्वावर घेतली आहे. यासाठी एकूण २० लाख रुपयांपर्यंत खर्च आला. त्यात ५० टक्के अनुदान तर उर्वरित रक्कम गटातील शेतकऱ्यांकडून भागभांडवल स्वरूपात संकलित केली. या युनिटमुळे सुमारे २० व्यक्तींना रोजगार उपलब्ध झाला आहे. गटातील शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २०० रुपये तर अन्य शेतकऱ्यांना २३० रुपये प्रोसेसिंग फी आकारली जाते. 

असे आहे कंपनीचे नेटवर्क 

 • सुमारे १० जणांचे संचालक मंडळ 
 • परिसरातील साखराळे, कापूसखेड, कामेरी आदी गावांतील मिळून सुमारे एकहजार शेतकरी कंपनीशी संलग्न आहेत. 
 • शेतकऱ्याने बीजोत्पादनासाठी प्लॉट निवडल्यानंतर गटातर्फे मार्गदर्शन केले जाते. 
 • सर्व शिफारशी कृषी विद्यापीठांप्रमाणे केल्या जातात. 
 • काही निविष्ठा गटामार्फत शेतकऱ्यांना नाममत्र दरात उपलब्ध करून दिल्या जातात. 
 • सुरवातीच्या काळात बीजोत्पादनासाठी नसिकता तयार करणे फार अवघड काम होते. हळूहळू त्याचे महत्त्व पटू लागल्याने शेतकरी त्याकडे वळू लागले आहेत. 

गटाने उत्पादित केलेले बियाणे 
वाळवा तालुक्‍यात सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. उसात आंतरपीक म्हणून हे पीक घेण्यात येते. केडीएस ३४४, फुले, संगम ७२६, जे एस ३३५ या वाणांचे, हरभऱ्यामध्ये दिग्‍विजय, गव्हात केदार, लोकवन या वाणांचे बीजोत्पादन घेतले जाते. 

मागील तीन वर्षांतील बीजोत्पादन (सोयाबीन व हरभरा) 

 • २०१६-१७ - १५० टन 
 • २०१७-१८- २८० टन 
 • २०१८-१९- ३४० टन 
 • उलाढाल- मागील वर्षी- सुमारे २५ लाख रु. यंदा ६० लाखांची अपेक्षित 
 • बियाणे दर- सोयाबीन- ९० रुपये प्रतिकिलो 
 • हरभरा- ५० रुपये प्रतिकिलो 

प्रतिक्रिया 
बीजोत्पादन कार्यक्रमामुळे सोयाबीन, हरभरा या पिकांना चांगले दर मिळणे शक्य झाले आहे. 
-श्रीकृष्ण हसबनीस 

गट वा कंपनीमार्फत आम्हा शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवून शाश्‍वत बाजारपेठ मिळवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. 
-विश्‍वासराव पाटील 

शेतकऱ्यांची बाजारपेठेतील लूट थांबावी, त्यांच्या गाठीस चार पैसे राहावेत यासाठी त्यांना शेतकरी कंपनीमार्फत खात्रीशीर बियाण्यांचा पुरवठा करतो आहोत. आता भाजीपाला निर्यातदेखील आम्ही सुरू केली आहे. यात केळी व विशिष्ट प्रकारच्या मिरचीचा समावेश आहे. 
-दिग्‍विजय पाटील, अध्यक्ष, 
जय शिवराय शेतकरी उत्पादक कंपनी 
संपर्क- ८९९९३१७५८६ 

कंपनीचे भविष्यातील नियोजन 

 • माती- पाणी परीक्षण प्रयोगशाळेची उभारणी 
 • परदेशी भाजीपाला साठवणुकीसाठी अद्ययावत कोल्ड स्टोरेज 
 • उत्पादक ते ग्राहक विक्री केंद्र इस्लामपुरात उभारणार 
 • कंपनीचा शेतमाल निर्यातीचा परवाना. सदस्यांची केळीची खासगी कंपनीमार्फत निर्यात सुरू 

फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
क्षारयुक्त जमिनीत एकात्मिक शेतीचा आदर्श बारामती तालुक्यातील मळद (जि. पुणे) येथील प्रशांत...
आले पिकाने दिली आर्थिक सक्षमता बुलडाणा जिल्ह्यात खल्याळ गव्हाण येथील दिनकर व...
फळबागेतून शेती केली किफायतशीरकनका बुद्रुक (ता. मेहकर, जि. बुलडाणा) शिवारात...
आवळा प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखजाचकवस्ती (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील सुमन...
युवा शेतकऱ्याने केले यशस्वी ब्रॉयलर...लातूर जिल्ह्यातील हडोळती येथील महेश गोजेवाड या...
कातळावर लिली; तर टायरमध्ये फुलला...रत्नागिरी जिल्ह्यातील मेर्वी येथील प्रगतिशील...
पिंपळगावकरांनी भाजीपाला शेतीतून साधली... बीड जिल्ह्यात अहमदनगर- अहमदपूर राज्य...
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,...‘मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा’ ही ज्येष्ठ...
कमी खर्चातील चवळी झाले नगदी पीक नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव गरुडेश्वर येथील संतोष...
भूमिहीन खवले यांनी करार शेतीतून उंचावले...भूमिहीन कुटुंब. मात्र करार पद्धतीने, प्रयोगशील...
गोशाळेतून गवसली आर्थिक विकासाची वाटबीड शहरालगत सौ. उमा सुनील औटे यांनी मुनोत...
ग्रामविकास, शिक्षण अन् शेतीतील दिशान्तरआर्थिक दुर्बल, भूमिहीन व अल्पभूधारक शेतकरी,...
सिंचन बळकटीकरणासह नगदी पिकांतून उंचावले...हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातील गिरगाव येथील...
प्रतिकूलतेवर मात करीत बटण मशरूमचा...स्पर्धा परीक्षेतून हुलकावणी, त्यानंतर केळी...
विदर्भात यशस्वी खजूरशेती, दहा...नागपूर येथे स्थायिक झालेले सावी थंगावेल यांनी दहा...
दुष्काळी पळशीने मिळवली निर्यातक्षम...सांगली जिल्ह्यात पळशी हे कऱ्हाड-विजापूर मार्गावर...
संकटातही ऐंशीहजार लेअर पक्षी उत्पादनाची...अमरावती जिल्ह्यात खरवाडी येथे सुमारे ३० ते ३५...
प्रयत्नवाद, सातत्यातून शोधला दुष्काळात...शिक्षणानंतर शेतीची कास धरली, पण दुष्काळानं परवड...
फळबाग शेतीसह बारमाही भाजीपाला पिकांचा...धुळे जिल्ह्यातील चौगाव (ता. धुळे) येथील युवा...
संशोधक शेतकऱ्याने बनविला जीवामृत फिल्टर...नाशिक जिल्ह्यातील पिंपरी सय्यद येथील प्रयोगशील...