Agriculture news in marathi, Seed production of soybean on 6 thousand 996 hectares in summer season in Parbhani division | Agrowon

परभणी विभागात उन्हाळी हंगामात सोयाबीनचे ६ हजार ९९६ हेक्टरवर बीजोत्पादन

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021

परभणी ः  ‘महाबीज’च्या परभणी विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या सहा जिल्ह्यांमध्ये सुधारित नियोजनानुसार येत्या (२०२२) उन्हाळी हंगामात सोयाबीनचा ६ हजार ९९६ हेक्टरवर बिजोत्पादन कार्यक्रम प्रस्तावित आहे.

परभणी ः  ‘महाबीज’च्या परभणी विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या सहा जिल्ह्यांमध्ये सुधारित नियोजनानुसार येत्या (२०२२) उन्हाळी हंगामात सोयाबीनचा ६ हजार ९९६ हेक्टरवर बिजोत्पादन कार्यक्रम प्रस्तावित आहे. त्यापासून ७१ हजार ५४८ क्विंटल बियाणे उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान आणि बोनस दिला जाणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांकडून अर्ज घेऊन जिल्हानिहाय नोंदणी सुरू झाली आहे. ही माहिती महाबीजचे विभागीय व्यवस्थापक ए. एल. सोनोने यांनी दिली.

यंदाच्या खरीप हंगामात परभणी विभागात १७ हजार ८९२ हेक्टरवर सोयाबीनचा बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यात आला. त्यापासून २ लाख ९९ हजार ६६९ क्विंटल बियोणे उत्पादन अपेक्षित होते. परंतु सततच्या पावसात भिजल्यामुळे बियाण्याच्या दर्जावर परिणाम झाला आहे. त्यामुळे चांगल्या प्रतीचे २ लाख १७ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध होऊ शकते. खरीप बियाणे उत्पादनात घट येणार असल्याने पुढील (२०२२) खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात बियाणे उपलब्ध व्हावे, यासाठी येत्या उन्हाळी हंगामात बीजोत्पादन कार्यक्रमाचे नियोजन करा, असे निर्देश कृषी सचिव एकनाथ डवले यांनी दिले आहेत. 

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना यामध्ये सहभागी करून घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार सोयाबीनच्या बीजोत्पादन क्षेत्रात वाढ करण्यात आली आहे. येत्या उन्हाळी हंगामात सोयाबीनच्या  एमएयूएस ७१, एमएयूएस १६२, एमएयूएस ६१२, फुले किमया, फुले संगम या वाणांचा ६ हजार ९९६ हेक्टरवर बीजोत्पादन प्रस्तावित आहे. गतवर्षीच्या (२०२१) उन्हाळी हंगामात महाबीजच्या परभणी विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, सोलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ३१० हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात आला होता. 

येत्या उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रमात सहभागी शेतकऱ्यांकडून बियाणे खरेदी करतांना यंदाच्या खरिपातील सोयाबीनला डिसेंबर-जानेवारी महिन्यात बाजार समित्यांमध्ये मिळालेले उच्चतम दर अधिक प्रोत्साहन अनुदान (इन्सेटिव्ह) अधिक बोनस (लाभांश) या पद्धतीने दर दिला जाणार आहे. 

अतिवृष्टीमुळे खरीप सोयाबीन बीजोत्पादनात घट आली आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामात मोठ्या क्षेत्रावर बीजोत्पादन कार्यक्रम राबविला जाणार आहे. ऊस खोडव्यामध्ये बीजोत्पादन घेता येईल. शेतकऱ्यांना प्रोत्साहानपर अनुदान तसेच बोनस देण्यात येणार आहे.
- ए. एल. सोनोने, विभागीय व्यवस्थापक, महाबीज, परभणी.
 


इतर बातम्या
...तर विमा कंपन्यांवर  गुन्हे दाखल...पुणे : शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे वेळेत न...
आंदोलन सुरूच राहणार : संयुक्त किसान...नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या मागण्यांसदर्भात...
राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज पुणे : राज्यात सुरू असलेल्या पावसाने उघडीप दिली...
परळी थर्मलमध्ये इंधनासाठी बांबूचा वापर...लातूर ः परळी येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात...
पेप्सिकोच्या बटाटा वाणाचे  मालकी हक्क...नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ः केंद्र सरकारच्या...
मेंढ्यांच्या संरक्षणासाठी लवकरच योजना ...सुपे, जि. पुणे ः पावसाची संततधार, अतिवृष्टी व...
शेतकऱ्यांनी करून दाखवलं : डॉ. गौहर रझा नाशिक : नव्या भारताचे स्वप्न साकारण्यासाठी शेतकरी...
द्राक्ष पीकविमा योजना  विभागनिहाय...नाशिक : दोन दिवसांपासून राज्यात झालेल्या...
सोयाबीन दरातील सुधारणा  आठवड्याच्या...पुणे ः चालू आठवड्यात बुधवारनंतर सोयाबीन दरात...
‘जवाद’ चक्रीवादळाची  तीव्रता कमी होणारपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘जवाद’ चक्रीवादळ...
दर्जेदार कृषी विद्यापीठांत  राज्याला...पुणे ः देशातील पहिल्या २० दर्जेदार कृषी...
पुणे जिल्ह्यात १,२४५ ‘विकेल ते पिकेल’...पुणे : शेतीमालाला केवळ हमीभाव नाही तर हमखास भाव...
पुणे जिल्ह्यात धरणांत एक टीएमसी...पुणे : जिल्ह्यात दोन दिवसांपासून धुमाकूळ...
कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी ३६८...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बॅंकेच्या...
सांगली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पिकांचे...सांगली : जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपूर्वी मुसळधार...
सांगली जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष पदाची...सांगली ः जिल्हा बँकेत अध्यक्षपदी आमदार मानसिंगराव...
नंदुरबार : पशुसंवर्धन विभागाच्या...नंदुरबार : पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०२१-२२ या...
नंदुरबार : रब्बीचे अनुदानित बियाणे...नंदुरबार : कृषी विभागाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा...
खानदेशात मका लागवड घटणार  गहू, बाजरीची...जळगाव ः खानदेशात मका लागवड घटेल, असे संकेत आहेत....
नांदेड जिल्ह्यात नुकसानीच्या मदतीचे...नांदेड : अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी...