परभणी विभागात बिजोत्पादन होणार २७ हजार हेक्टरवर

परभणी : यंदा महाबीजच्या परभणी विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर जिल्ह्यांतील १२ हजार २७ शेतकऱ्यांच्या २७ हजार ६३६ हेक्टर क्षेत्रावर बिजोत्पादन कार्यक्रम घेण्यात येत आहे.
Seed production will be done on 27,000 hectares in Parbhani division
Seed production will be done on 27,000 hectares in Parbhani division

परभणी : यंदा महाबीजच्या परभणी विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर जिल्ह्यांतील १२ हजार २७ शेतकऱ्यांच्या २७ हजार ६३६ हेक्टर क्षेत्रावर बिजोत्पादन कार्यक्रम घेण्यात येत आहे. यात १ हजार ४७३ गावांचा समावेश आहे,अशी माहिती सूत्रांनी दिली.

महाबीजतर्फे दरवर्षी खरीप हंगामात सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ताग आदी पिकांच्या पायाभूत आणि प्रमाणित बियाण्याचा बिजोत्पादन कार्यक्रम घेण्यात येतो. यंदाच्या महाबीजचे ३० हजार ४९४ हेक्टरवर बिजोत्पादन घेऊन ३७ हजार २८० क्विंटल कच्चे बियाण्यांच्या उत्पादनाचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात नोंदणी केलेल्या १२ हजार २७ शेतकऱ्यांनी २७ हजार ६३६ हेक्टरवर बिजोत्पादन कार्यक्रमासाठी पेरणी केली. यंदाच्या एकूण बिजोत्पादन क्षेत्रामध्ये सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक म्हणजे २६ हजार ७२९ हेक्टर आहे.

विभागातील सर्व जिल्ह्यांत सोयाबीनचा बिजोत्पादन कार्यक्रम घेतला जात आहे. तूरीचे एकूण क्षेत्र ३६१ हेक्टर आहे. त्यात परभणी, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तुरीचे क्षेत्र आहे. मुगाचे १४९ हेक्टर क्षेत्र परभणी जिल्ह्यात आहे. उडदाचे परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर जिल्ह्यात एकूण क्षेत्र १८५ हेक्टर आहे. परभणी, लातूर, सोलापूर जिल्ह्यात ज्युट (ताग) चे १०५ हेक्टर क्षेत्र आहे, असे सूत्रांनी सांगितले.

जिल्हानिहाय सोयाबीन बिजोत्पादन क्षेत्र (हेक्टर)

जिल्हा    क्षेत्र
परभणी  ८२२३
हिंगोली ७६६२
नांदेड  १९६६
लातूर  ५८१६
उस्मानाबाद   २७९९
सोलापूर  २६०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com