दिल्लीच्या सीमारेषेवर पाच ठिकाणी गेले ९२ दिवस शेतकऱ्यांचे नवीन तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदो
ताज्या घडामोडी
‘ब्लॅक राइस’ बियाणे निर्मितीचे काम सुरु
तालुक्यातील शिरगाव येथील कृषी संशोधन केंद्रात रानटी वाण म्हणून गणलेल्या ‘ब्लॅक राइस’ बियाणे निर्मितीचे काम सुरु आहे.
रत्नागिरी ः तालुक्यातील शिरगाव येथील कृषी संशोधन केंद्रात रानटी वाण म्हणून गणलेल्या ‘ब्लॅक राइस’ बियाणे निर्मितीचे काम सुरु आहे. या भाताचे टरफल वरुन पांढऱ्या रंगाचे असून आतील तांदूळ काळ्या रंगाचा व बारीक आहे. शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवणारा, चविष्ट असा हा काळा तांदूळ दोन वर्षांत शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, अशी माहिती शिरगाव येथील भात संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. भरत वाघमोडे यांनी दिली.
‘ब्लॅक राइस’ हे रानटी वाण म्हणून दुर्लक्षित होते. आसाममधून हे वाण उपलब्ध करण्यात आले असून ते जाड दाण्याचे व आतून बाहेरून काळ्या रंगाचे आहे. शेतात ते खूप उंच वाढते. त्याचा दाणा लांब असून जमिनीवर लोळणारी जात आहे. कोकणात याचा उपयोग करुन घेण्यासाठी संशोधन केंद्राने प्रक्रिया, प्रयोग करुन वरुन सफेद भातासारखे व आतमध्ये काळ्या रंगाचे बारीक बियाणे तयार करण्यावर भर दिला आहे. त्यामध्ये जेनरेटिक व्हेरिएशन करण्याचे काम सुरू आहे. कोकणात कमी उंची, बारीक तांदूळ असलेल्या भाताला मागणी वाढेल अशी अपेक्षा असल्यामुळे शिरगाव येथील भातसंशोधन केंद्रात प्रयोग सुरु आहे.
लाल-भात बियाणे आणि ब्लॅक राईस यांच्यात तसेच साम्य आहे. न्युट्रीशियन, आर्यन, फायबर, झींग तसेच मानवाच्या शरीरात प्रतिकार शक्ती वाढविण्याची जास्त क्षमता ब्लॅक राईसमध्ये जास्त आहे. प्रथिनामुळे बियाण्यात रंग प्राप्त होतो. गेल्या वर्षभरापासून यावर संशोधन सुरु आहे. केंद्राच्या शेतावर भात लावणीपासून ते त्यांचा जेनरेटीक व्हेरिएशन बदल करण्याचे काम सुरु आहे.
या सर्व कामात संशोधन केंद्राचे तज्ज्ञ व कर्मचारी सक्रिय सहभागी आहेत. बारीक दाण्याचा ब्लॅक राइसचे बियाणे शेतकऱ्यांना दोन वर्षात उपलब्ध होईल. या बियाण्यावर अद्यापही संशोधन सुरु असल्याचे डॉ. वाघमोडे यांनी सांगितले.
- 1 of 1054
- ››