विक्रेत्यांनी लावले फलक...मका लागवड करा पण चाऱ्यासाठीच !

विक्रेत्यांनी लावले फलक...मका लागवड करा पण चाऱ्यासाठीच !
विक्रेत्यांनी लावले फलक...मका लागवड करा पण चाऱ्यासाठीच !

संग्रामपूर, जि. बुलडाणा ः खरिपासोबतच यंदा प्रथमच रब्बीतही मक्याची लागवड वाढत आहे. शेत खाली झाल्यानंतर शेतकरी टप्प्याटप्प्याने ही लागवड करीत आहेत. मात्र, लागवडीस उशीर होत आहे. हे लक्षात घेता कृषी केंद्रचालकांनी कंपनीकडून दिलेल्या कालावधीनंतर मका लागवड झाल्यास केवळ चारा उत्पादन होण्याचा इशारा दिला आहे.  कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना आवाहन करताना यापुढे मका लागवड फक्त चाऱ्याच्या दृष्टीने करावी. कारण उशिरा लागवडीमुळे कणीस भरताना उष्णतेचे प्रमाण असणार आहे. त्यामुळे कणीस भरेलच याची शाश्वती नसते, असे म्हटले आहे. भविष्यात मक्याचे कणीस न भरल्यास शेतकरी कंपनी आणि विक्रेत्याविरुद्ध तक्रारी करू शकतात. म्हणून खबरदारी म्हणून अगोदरच कृषी केंद्रचालकांनी विक्री करताना शेतकऱ्यांना तशी सूचना म्हणून दुकानात फलक लावल्याचे बोलले जात.  यंदा प्रथमच खारपान पट्ट्यात सद्यातरी रब्बीत खरिपाची कसर काढण्याच्या उद्देशाने बागायती क्षेत्र वाढल्याचे दिसत आहे. यात गहू, हरभरा, मका आणि कांदा लागवड झाली आहे. मका पिकाला लष्करी अळीचे संकट असल्याने आतापासूनच उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना फवारणीचा खर्च झेलावा लागत आहे. उत्पादन काय येईल याची चिंता आता वाटत नसली तरी उशिरा होणारी पेरणी उत्पादनात घट निर्माण करणारी ठरणार असे जाणकारांचे मत आहे. लागवडीबाबत कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विभागाकडून पाहिजे त्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये जागृती होताना दिसत नाही हेही समोर आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com