agriculture news in Marathi seed shortage in Khandesh Maharashtra | Page 2 ||| Agrowon

सरळ कापूस वाण बियाण्यांचा खानदेशात तुटवडा 

टीम अॅग्रोवन
रविवार, 13 जून 2021

खानदेशात केळी पट्ट्यात सरळ वाणांची पूर्वहंगामी (बागायती) लागवड केली जात आहे. पण या वाणांचा तुटवडा आहे. काळ्या बाजारास खतपाणी मिळत आहे.

जळगाव : खानदेशात केळी पट्ट्यात सरळ वाणांची पूर्वहंगामी (बागायती) लागवड केली जात आहे. पण या वाणांचा तुटवडा आहे. काळ्या बाजारास खतपाणी मिळत आहे. मागणी सुमारे तीन ते साडेतीन लाख पाकिटांची आहे, पण फक्त २५ हजार पाकिटांचा पुरवठा झाल्याची माहिती आहे. 

केळी पट्ट्यात म्हणजेच जळगावमधील रावेर, यावल, चोपडा, जामनेर, पाचोरा, नंदुरबारमधील शहादा, तळोदा, धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा आदी भागात अनेक शेतकरी केळी व इतर पिकांसाठी बेवड म्हणून सरळ किंवा देशी कापूस वाणांची लागवड करतात. ही लागवड पूर्वहंगामी अधिक असते. कारण केळी पट्ट्यात जलसाठे मुबलक आहेत. बऱ्यापैकी उत्पादन व बेवड मिळत असल्याने केळी पट्ट्यात या वाणांची अनेक वर्षे मागणी आहे. पण त्यांचा काळाबाजारदेखील अनेक वर्षे सुरू आहे. कंपन्याच कमी पुरवठा करतात, असा दावा कृषी विभाग करीत आहे. 

खानदेशात एकट्या जळगाव जिल्ह्यात सुमारे २६ लाख ५२ हजार कापूस बियाणे पाकिटांचा पुरवठा यंदा होणार आहे. यात ९५ ते ९७ टक्के बियाणे बीटी कापसाचे आहे. धुळे व नंदुरबारातही अशीच स्थिती आहे. बीटी कापूस वाणांचा पुरवठा खानदेशात पुरेसा व वेगात झाला आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे २२ लाख पाकिटे दाखल झाली आहेत. पण त्यात सरळ कापूस वाणांचा अत्यल्प पुरवठा झाला आहे. हेक्टरी किमान अडीच पाकिटे सरळ वाणांची लागवडीसाठी आवश्यक आहेत. खानदेशात किमान एक ते सव्वा लाख हेक्टरवर या वाणांची लागवड अपेक्षित असते. पण बियाणे पुरवठा दरवर्षी ३० ते ३५ हजार पाकिटे एवढाच असतो. यामुळे लागवड हव्या तेवढ्या क्षेत्रात होत नाही, शिवाय काळाबाजार फोफावतो. यंदाही हा काळाबाजार सुरू आहे. 

काळ्या बाजाराची व्यवस्था 
काही शेतकरी मध्य प्रदेश, गुजरातमधून या वाणांची उपलब्धता करून घेत आहेत. त्यासाठी पाकिटामागे १२०० ते १४०० रुपये मोजावे लागत आहेत. बियाण्याचा हा खर्च दुप्पट झाला आहे, त्यास कृषी यंत्रणा व संबंधित जबाबदार असल्याचा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत. काळाबाजार शेतकऱ्याला अपेक्षित नसतो, तो कसा सुरू होईल, याची व्यवस्था, नियोजनच जणू कृषी यंत्रणा व संबंधित हंगामाच्या सुरुवातीला करून ठेवतात. हा प्रकार रोखला जावा, अशी अपेक्षा एका शेतकऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले.  

 
 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात आज हलक्या सरींची शक्यता पुणे : राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली...
पशुचिकित्सा व्यवसायींचा राज्यभर बेमुदत...नगर : पशुचिकित्सा व्यवसायी (डिप्लोमा, पदविकाधारक...
ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सर्वसाधारण पावसाची...पुणे : हवामान विभागाने ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचा...
पीकविमाधारकांना मिळणार २५ टक्के तात्काळ...पुणेः राज्यात प्रतिकूल परिस्थितीमुळे खरीप...
खोटे बोलण्यासाठी नाही, प्रामाणिक...भिलवडी, जि. सांगली : ‘‘मी तत्काळ मदतीबाबत विचार...
'रेडग्लोब’ द्राक्षवाणात मिळवली ओळखपुणे जिल्ह्यातील खोडद येथील सुहास थोरात यांनी...
उत्पन्नाच्या विविध स्त्रोतांमधून मिळवली...बोरगाव खुर्द (ता.. जि.. अकोला) येथील महेश वानखडे...
शेतकऱ्यांनी वापरले ६५० कोटींचे घरचे...पुणेः राज्यात यंदा सोयाबीनच्या पेऱ्यात मोठी वाढ...
कोकणात हलक्या पावसाची शक्यता पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र...
अडीच लाख शेतकऱ्यांच्या जमिनी सावकाराकडे...अमरावती : राष्ट्रीय व खासगी बँकांनी हात आखडता...
धरणक्षेत्रात पावसाची हजेरी पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा...
सर्वदूर हलक्या पावसाची शक्यता पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राच्या...
पीक विम्यात कुचराई केल्यास नोटिसा काढा...नाशिक: पीकविमा योजनांची संबंधित कंपन्यांच्या...
मत्स्यबीज केंद्रामुळे महिला झाल्या...भिगवण (जि. पुणे) येथील पाच उपक्रमशील महिलांनी...
गणपतराव देशमुख यांच्या पार्थिवावर...सोलापूर ः शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि...
चीनची खत निर्यातीवर बंदी बीजिंग ः चीनमध्ये खतांचे घटलेले उत्पादन, विजेच्या...
राज्याची पीकपेरा नोंद आता शेतकरीच करणार पुणेः सातबारा उतारावरील पीकपेऱ्याची नोंद आता...
निसर्गदूतांच्या सहयोगाने ‘झाडांची भिशी...सोलापुरातील उपक्रमशील डॅाक्टर, इंजिनिअर्स,...
खानदेशात मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा...जळगाव : खानदेशात मका पिकाची लागवड यंदा बऱ्यापैकी...
पंधरा दिवस पावसाचा जोर कमी राहणार पुणे : गेल्या पंधरा दिवस कोकण आणि घाटमाथ्यावर...