Agriculture news in marathi Seed treatment of micro nutrients is beneficial | Agrowon

सूक्ष्म अन्नद्रव्यांची बीजप्रक्रिया फायदेशीर

डॉ. हरिहर कौसडीकर
मंगळवार, 16 जून 2020

मोलाब्द हे सूक्ष्म अन्नद्रव्य कडधान्य पिकामध्ये नत्र स्थिरीकरणासाठी आणि इतर पिकात जमिनीतील नायट्रेट वापरासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. मोलाब्द घन किंवा द्रवरूप रायझोबीयम किंवा पी.एस.बी. या जैविक खतासोबत दिल्यास अतिरिक्त वाढीव परिणाम दिसून येतो.
 

मोलाब्द हे सूक्ष्म अन्नद्रव्य कडधान्य पिकामध्ये नत्र स्थिरीकरणासाठी आणि इतर पिकात जमिनीतील नायट्रेट वापरासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. मोलाब्द घन किंवा द्रवरूप रायझोबीयम किंवा पी.एस.बी. या जैविक खतासोबत दिल्यास अतिरिक्त वाढीव परिणाम दिसून येतो.

मोलाब्द हे सूक्ष्म अन्नद्रव्य कडधान्य पिकामध्ये नत्र स्थिरीकरणासाठी आणि इतर पिकात जमिनीतील नायट्रेट वापरासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. मोलाब्द घन किंवा द्रवरूप रायझोबीयम किंवा पी.एस.बी. या जैविक खतासोबत दिल्यास अतिरिक्त वाढीव परिणाम दिसून येतो.  राज्यासाठी निश्‍चित संशोधन शिफारशी प्राप्त होईपर्यंत विविध ठिकाणच्या संशोधनाच्या आधारेच खालीलप्रमाणे इतर ठिकाणी झालेल्या शिफारशींचा वापर तज्ज्ञांच्या सल्यानुसार शेतकऱ्यांनी प्रयोग स्वरूपात उपाययोजना म्हणून करावयास हरकत नाही. 

पीक पोषणाबाबत अन्नद्रव्यांच्या बीजप्रक्रियेचा पर्याय

  • बियाण्यांतील पोषक द्रव्यांच्या आधारेच सुरुवातीच्या काळात रोपांची वाढ व विकास होत असतो. अन्नद्रव्यांच्या बीजप्रक्रियेमुळे बियाण्यांतील अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढून त्यांची उगवण क्षमता व पीक वाढीची गती वाढते.
  • विविध अजैविक ताण जसे, तापमानातील चढ-उतार, पाण्याचा ताण किंवा अतिवृष्टीमुळे जमिनीतील जास्तीचा ओलावा, उगवताना पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढू शकते. 
  • जमिनीचा जास्त सामू, जास्त क्षारता, विविध अन्नद्रव्यांची कमतरता यामुळे बियाण्यांच्या उगवण क्षमतेवर अनिष्ट परिणाम होतात. तसेच सुरुवातीच्या काळात रोपांची योग्य प्रमाणात वाढ होत नाही. यासाठी अन्नद्रव्यांची बीजप्रक्रिया फायदेशीर ठरते.

बीज प्रक्रियेद्वारे केलेल्या प्रयोगाच्या शिफारशी 

  • तूर पिकामध्ये प्रति किलो बियाणास ४ ग्रॅम बोरॉनची बीजप्रक्रिया केल्यामुळे उत्पादनात १०.५३ टक्के तर जमिनीद्वारे वापरामुळे ५.२६ टक्के वाढ दिसून आली. 
  • प्रयोगावरून असे दिसून येते की, २ ते २.५ किलो मोलाब्द खताचा जमिनीद्वारे वापर करण्याऐवजी २०० ग्रॅम सूक्ष्म अन्नद्रव्ये रसायन खतांचा वापर बीज प्रक्रियेच्या माध्यमातून केल्यास  अधिकचा फायदा होऊन खर्चातदेखील बचत होते.

जमिनीद्वारे व बीज प्रक्रियेद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या वापराची तुलना

अन्नद्रव्ये पीक जमिनीद्वारे वापर  बीज प्रक्रियेद्वारे वापर
    प्रमाण  उत्पादनात वाढ (टक्के) प्रमाण प्रति किलो बियाणे उत्पादनात वाढ 
बोरॉन तूर हेक्टरी १० किलो बोरॉन  ५.२६ टक्के ४ ग्रॅम बोरॉन 

१०.५३ टक्के

बीज प्रक्रियेचे प्रकार 
द्रावण तयार करून वापरणे 

यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याचे ठरावीक तीव्रतेचे द्रावण तयार करून ठरावीक काळासाठी बियाणे भिजवून ठेवले जाते. त्यानंतर सावलीत सुकवून पेरणी केली जाते.

सूक्ष्म अन्नद्रव्ये द्रावणाचा बीज प्रक्रियेद्वारे केलेल्या वापरावरील काही निष्कर्ष 

सूक्ष्म अन्नद्रव्ये प्रमाण (बियाणे द्रावणात बुडवून व सुकवून पेरणी करावी) पीक उत्पादनात वाढ 
झिंक सल्फेट   ०.४ टक्के (४ ग्रॅम १ लिटर पाण्यात) गहू २१ टक्के 
झिंक सल्फेट  १ टक्के (१० ग्रॅम १ लिटर पाण्यात)   मका   २७ टक्के 
झिंक सल्फेट ०.०५ टक्के (५ ग्रॅम १० लिटर पाण्यात)   हरभर   १९ टक्के

घनरूप सूक्ष्म अन्नद्रव्याची प्रक्रिया
या बीजप्रक्रियेत घनरूप सूक्ष्म अन्नद्रव्ये रसायन जैविक खतांसोबत किंवा बुरशीनाशकांसोबत किंवा स्वतंत्ररीत्या बियाणयांसोबत वापरले जाते. यापैकी घनरूप रसायनांची प्रक्रिया ही सहज व सोपी पद्धत आहे.

घनरूप रसायनांच्या बीजप्रक्रियेबाबतचा आढावा 

सूक्ष्म अन्नद्रव्ये वापर करण्याचे प्रमाण पीक  उत्पादनात वाढ 
झिंक सल्फेट १ ग्रॅम प्रति किलो बियाणे  धान/साळ १४.५७ टक्के
इडीटीए- झिंक १.४ ग्रॅम प्रति किलो बियाणे धान/साळ २०.७३ टक्के
बोरॉक्‍स १ ग्रॅम प्रति १० किलो चवळी  ३७.२५ टक्के

संपर्क- डॉ. हरिहर कौसडीकर, ७५८८०८२०४९
(संचालक (संशोधन), महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे)


इतर कृषी शिक्षण
कृषी विद्यार्थी पोहोचविताहेत नवे तंत्रपुसेगाव (जि.सातारा) ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर...
कृषीकन्या सांगताहेत जमीन सुपिकतेचे फायदेमाळेगाव (जि.पुणे ) ः बारामती कृषी महाविद्यालयातील...
मिथेन उत्सर्जन रोखण्यासाठी गाईतील...दुधासाठी गोपालनातून होणाऱ्या मिथेनच्या...
तापमान वाढीची प्रक्रिया रोखण्यासाठी...ओस्लो (नॉर्वे) येथील ‘सेंटर फॉर इंटरनॅशनल...
आर्क्टिक वनस्पती कर्ब शोषण्यापेक्षा...आर्क्टिक प्रदेशामध्ये वाढणाऱ्या उंच झाडे किंवा...
कोरडवाहू शेतीमध्ये मूलस्थानी जलसंधारणकमी कालावधीमध्ये जास्त पाऊस पडल्यामुळे पावसाचे...
मध्यपूर्व प्रदेशातील पावसात ४० टक्के घटविविध प्रारूपाद्वारे मध्यपूर्वेतील पावसाच्या...
सूक्ष्म अन्नद्रव्यांची बीजप्रक्रिया...मोलाब्द हे सूक्ष्म अन्नद्रव्य कडधान्य पिकामध्ये...
किरकोळ आजारांकडे नको दूर्लक्षमहिलांनी घराकडून शेताकडे जाताना चेहऱ्यावर पदर...
आरोग्यदायी ज्येष्ठमधसमस्त महिलावर्गासाठी ज्येष्ठमध काही नवीन नाही....
कृषी पदवीच्या परीक्षांचा कृती आराखडा...अकोला/नाशिक ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
पीक कर्जावरील व्याज आकारणीवेळेत परतफेड करणाऱ्या अशा शेतकऱ्यांना वर्षाकाठी ३...
आरोग्यदायी हळदस्वयंपाकात तसेच कोणत्याही धार्मिक कार्यात हळद फार...
औषधी, आरोग्यवर्धित द्राक्षद्राक्षाचे आरोग्यदायी दृष्टीने अनेक फायदे आहेत....
आरोग्यदायी लसूणआपल्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक म्हणजेच लसूण...
पीक अवस्थेनुसार जाणून घ्या तापमानमहाराष्ट्र राज्य हे भौगोलिक क्षेत्रानुसार देशात...
पाण्याचे महत्त्व जाणून संवर्धनासाठी...जागतिक हवामान संघटनेने २०२० हे वर्ष ‘जागतिक...
पूर्व विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्रात...महाराष्ट्रासह संपूर्ण भारतावरील हवेचा दाब कमी होत...
दुधापासून व्होडका होतेय अमेरिकेत...दूध हे तुलनेने फारच कमी काळासाठी टिकवून ठेवता...
नत्रयुक्त खतांचा वापर व्हावा अधिक...पर्यावरण आणि हरितगृह वायू म्हटले की आपल्याला...