‘वनामकृवि’ रब्बीत ३६३ हेक्टरवर करणार बीजोत्पादन

‘वनामकृवि’ रब्बीत ३६३ हेक्टरवर करणार बीजोत्पादन
‘वनामकृवि’ रब्बीत ३६३ हेक्टरवर करणार बीजोत्पादन

परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे यंदाच्या (२०१९-२०) रब्बी हंगामात ३६३.८० हेक्टरवर बीजोत्पादन घेण्याचे नियोजन आहे. ज्वारी, गहू, करडई, हरभरा आदी पिकांचे एकूण दोन हजार ८९०.७० क्विंटल बियाणे उत्पादन करण्याचे उद्दिष्ट आहे. या बाबत संबंधित सूत्रांनी माहिती दिली.

शेतकऱ्यांना पेरणीसाठी दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे विविध ठिकाणच्या प्रक्षेत्रावर रब्बी पिकांच्या विविध वाणांचा पैदासकार, पायाभूत, विश्वसनीय, प्रमाणित असे चार प्रकारचा बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यात येतो.

ज्वारीच्या परभणी मोती, सीएसव्ही १८, परभणी शक्ती, एसपीव्ही २४०७, केआर १९६, एपीव्ही ४० एफ या वाणांचे ३४.५० हेक्टरवर बीजोत्पादन घेण्यात येणार असून ४१४ क्विंटल बियाणे उत्पादनाचे उद्दिष्ट आहे.

गव्हाच्या एनआयएडब्लू ३०१, एनआयएडब्लू १४१५, एनआयएडब्लू १९९४ या वाणांचे ७ हेक्टरवर बीजोत्पादनाचे नियोजन असून त्यापासून १४० क्विंटल बियाणे उत्पादन अपेक्षित आहे. करडईच्या पीबीएनएस १२, पीबीएनएस ४०,पीबीएनएस ८६ या वाणांचे मिळून एकूण २०८.८० हेक्टरवर बीजोत्पादन प्रस्तावित आहे. त्यापासून एकूण १ हजार ४६१.६० क्विंटल बियाणे उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. 

जवसाच्या एलएसएल ९३ या वाणाचे ३ हेक्टरवर बीजोत्पादनाचे नियोजन असून त्यापासून ३७.५० क्विटंल बियाणे उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. हरभऱ्याच्या बीडीबीजी ९७, बीडीएनजीके ७९८, फुले विक्रम या वाणाचे १०५ हेक्टरवर बीजोत्पादनाचे नियोजन आहे. त्यापासून ७८७.५० क्विंटल बियाणे अपेक्षित आहे. बाजरीच्या एएचबी १२०० एफई या वाणाचे ३ हेक्टरवर बीजोत्पादनापासून ३० क्विंटल बियाणे उत्पादन अपेक्षित आहे. सूर्यफुलाच्या एलएसएफएच १७१ या वाणाचे १ हेक्टरवर बीजोत्पादनाचे नियोजन असून त्यापासून १० क्विंटल बियाणे उत्पादन अपेक्षित आहे.  

बीजोत्पादन पीकनिहाय क्षेत्र (हेक्टरमध्ये) व उद्दिष्ट (क्विंटलमध्ये) 
पीक क्षेत्र उद्दिष्ट
ज्वारी ७.०० १४०.००
करडई २०८.८० १४६१.६०
हरभरा १०५.०० ७८७.५०
जवस ३.०० ३७.५०
बाजरी ३.०० ३०.००
सूर्यफूल १.०० १०.००
टोमॅटो ०.५० ०.१०
कांदा १.०० १०.००
गहू ७.०० १४०.००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com