कोल्हापूर विभागात खते, बियाण्यांची पुरेशी उपलब्धता

कोल्हापूर विभागात खते, बियाण्यांची पुरेशी उपलब्धता
कोल्हापूर विभागात खते, बियाण्यांची पुरेशी उपलब्धता

कोल्हापूर : कोल्हापूर विभागात खरीप हंगामासाठी बियाणे व खतांची मुबलक उपलब्धता असून, यंदाच्या खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज झाल्याचे विभागीय कृषी सहसंचालक दशरथ तांभाळे व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी सांगितले.

खरीप हंगामातील प्रमुख पिके भात, ज्वारी, बाजारी, मका, कडधान्ये व सोयाबीन या पिकांचे पुरेसे बियाणे व खते उपलब्ध आहेत. शेतीशाळा व पीक प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोचविण्याचे नियोजन आहे. हुमणीग्रस्त गावांत विभागाचे अधिकारी, कर्मचारी, साखर कारखाने, शेती मित्र, शेतकरी गट कंपन्या, ग्रामीण कृषी कार्यानुभवनचे विद्यार्थी, तरुण मंडळ या सर्वांच्या मदतीने वळवाचा पाऊस पडल्यापासून दहा दिवसांत मोहीम राबविण्यात येणार आहे. 

विभागामध्ये ४८९०० हेक्‍टर मक्याचे क्षेत्र असून मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यासाठी बियाणे प्रक्रिया, कामगंध सापळे यांचा अवलंब करून एकात्मिक कीड नियंत्रणाचे नियोजन केले आहे. ऊस उत्पादकता वाढीसाठी प्रमाणित व पायाभूत बेणे उत्पादन कृषी विद्यापीठ व कारखान्याच्या प्रक्षेत्रावर घेण्याचे नियोजन आहे. भातामध्ये सुधारित बियाणे, श्री पद्धत, चारसूत्री पद्धत व एस.आर.टी. पद्धत या तंत्रज्ञानाचा वापर 

शेतीशाळा व पीक प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून पीक उत्पादनात वाढ करण्याचे नियोजन केले आहे. सोयाबीनमध्ये विभागाची उत्पादकता कमी होऊ लागल्याने कृषी विद्यापीठांच्या मार्फत संशोधन करून तंत्रज्ञानाद्वारे पीक उत्पादनामध्ये वाढीचे नियोजन केले आहे. पौष्टिक तृणधान्यामध्ये नाचणी, राळा व वरई या पिकांचे बिजोत्पादन कार्यक्रम तसेच गटशेतीच्या माध्यमातून नाचणी प्रक्रिया उद्योगास प्रोत्साहन देऊन शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ करण्याचे उद्दिष्ट आहे. 

विभागामध्ये काजू क्षेत्र विस्तार करणे तसेच चंदगड काजूसाठी भौगोलिक मानांकन प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. विभागामध्ये केळी, डाळिंब व सीताफळ या पिकांचा क्षेत्र विस्तार करण्यात येणार आहे. विभागामध्ये मिरज तालुक्‍यातील गाजर पिकाखालील क्षेत्र विस्तार करणे तसेच मिरज तालुक्‍यातील गाजर पिकासाठी भौगोलिक मानांकन प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. 

सुमारे दीड लाख टन खते कोल्हापूर जिल्ह्यात युरियाची ८१४४०, डी.ए.पी १४१४०, एस.एस.पी.२२५१०, एम ओ पी १८०७०, संयुक्त खते २७२५० टनांची उपलब्धता आहे. जिल्ह्यसाठी एकूण १ लाख ४३ लाख मेट्रिक टन खतांचे नियोजन आहे. यंदा शेतकऱ्यांना आवश्‍यक ती खते मिळविण्यासाठी अडचण येणार नाही, असे श्री. वाकुरे यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com