agriculture news in marathi Seeds, fertilizers, pesticides District level cell for control | Agrowon

बियाणे, खते, कीटकनाशक नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय कक्ष

टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 एप्रिल 2021

नाशिक : निविष्ठांचा काळाबाजार व साठेबाजी रोखण्यासह गुणवत्ता व पुरवठ्याच्या दृष्टीने अडचणींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला.

नाशिक : खरीप हंगामात बियाणे पेरणीचा कालावधी अत्यंत अल्प आहे. त्यामुळे शेतकरी, कंपनी प्रतिनिधी, बियाणे, खते व कीटकनाशके विक्रेत्यांच्या अडचणी व तक्रारीचे वेळेत निराकरण व्हावे. निविष्ठांचा काळाबाजार व साठेबाजी रोखण्यासह गुणवत्ता व पुरवठ्याच्या दृष्टीने अडचणींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी दृष्टीने बियाणे, खते व कीटकनाशकांचे उत्पादन, प्रक्रिया, वाहतूक, वितरण व विक्री करताना अडचणी निर्माण होऊ शकतात. खरीप हंगामात बियाणे, खते व किटकनाशकांबाबत शेतकरी, कंपनी प्रतिनिधी व बियाणे, खते व कीटकनाशके विक्रेत्यांना क्षेत्रीय स्तरावर वेगवेगळ्या अडचणी येतात. यासाठी नियंत्रण कक्षाच्या कामी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली.

दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत संपर्क साधण्यासाठी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक किरण वीरकर व जिल्हा परिषदेच्या मोहीम अधिकारी माधुरी गायकवाड यांना तसेच कार्यालय दूरध्वनी क्रमांक ०२५३-२५०४०४२ तसेच टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० या क्रमांकावर सुध्दा संपर्क करता येईल. dqcinashik@gmail.com वर सुद्धा मेलव्दारे तक्रार करता येईल. 

तक्रार सुविधा केंद्रावर १६ एप्रिल ते ३० जून २०२१ दरम्यान जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी किरण वीरकर, जिल्हा मोहीम अधिकारी माधुरी गायकवाड, कृषी अधिकारी लितेश येळवे व तंत्र अधिकारी अतुल कुलकर्णी यांच्यासह सहाय्यकांची नियुक्ती करण्यात आली.

बियाणे, खते व कीटकनाशके यांच्या गुणवत्ता व पुरवठयासंबंधी आलेल्या अडचणीची तक्रारींची विहित प्रपत्रात माहिती नोंदविणे,प्राप्त तक्रार ज्या कार्यालयाशी संबंधित आहे त्या कार्यालयास तक्रारदाराचे नाव, पत्ता, भ्रमणध्वणी क्रमांक व तक्रारीचा तपशील उचित कार्यवाहीसाठी तत्काळ पाठवणे, तक्रारदारांच्या अडचणीच्या निराकरणासाठी संबंधितांशी भ्रमणध्वणी/दूरध्वनी/ ईमेल/ व्हॉटसअॅप अशा संपर्क माध्यमाचा वापर करावा.     

कसूर केल्यास कारवाई

नियुक्तीच्या कालावधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून कसूर केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सेवा व शर्तीच्या नियमानुसार  कडक कारवाई करण्याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने नियुक्ती पत्रात स्पष्ट केले आहे.


इतर ताज्या घडामोडी
सोयाबीन पेंडची आयात शुल्काविना करावीनागपूर : भारतात सोयाबीन पेंडचे दर गगनाला...
दूधदरात पुन्हा दोन रुपयांची कपातनगर ः कोरोना संसर्ग वरचेवर वाढत असल्याने लॉकडाउन...
देशातील पहिले कृषी निर्यात मार्गदर्शन...पुणे ः राज्यातील शेतकरी व उदयोन्मुख...
उत्तर भारतातील कापूस लागवड पूर्णत्वाकडेजळगाव ः देशात उत्तर भारतातील कापूस लागवडीने वेग...
कृषी खात्यातील बदल्या लांबणीवरपुणे ः ऐन कोरोना कालावधीत बदल्यांचा घाट रचलेल्या...
खाद्यतेल दरात गतवर्षीपेक्षा ८० टक्के वाढनागपूर : शेंगदाण्याची निर्यात तसेच पाम तेलावरील...
पूर्व विदर्भात ४५ लाख क्विंटल धान खराब...गोंदिया : भात उत्पादक पूर्व विदर्भातील पाच...
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...