रब्बी हंगामाकरिता बियाणे, खते मोफत देण्यात यावीत : शिवसेना

रब्बी हंगामाकरिता बियाणे, खते मोफत देण्यात यावीत : शिवसेना
रब्बी हंगामाकरिता बियाणे, खते मोफत देण्यात यावीत : शिवसेना

बुलडाणा ः परतीच्या पावसाने जिल्ह्यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले असून, शेतकरी कर्जाच्या विवंचनेत अडकलेला आहे. खरीप हातातून गेला असून, रब्बी हंगामात पेरणीसाठी शेतकऱ्यांजवळ काहीच पैसे शिल्लक नाहीत. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता रब्बी हंगामासाठी खते, बियाणे मोफत देण्यासह हेक्टरी ५० हजार रुपयांची तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे केली आहे. जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांच्या नेतृत्वात पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डाॅ. निरुपमा डांगे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चाही केली.    

परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात यंदाचा खरीप हंगाम पूर्णत: नेस्तनाबूत झाला आहे. शेतातील संपूर्ण हिरवी पिके कुजली आहेत. शेतकऱ्यांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत रब्बी हंगाम कसा घ्यायचा या विवंचनेत शेतकरी सापडले आहेत. खरीप हंगामातील नुकसानाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, संपूर्ण शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सावरण्याकरिता परिस्थितीची जाण ठेवीत शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे गरजेचे झाले आहे. जोरदार पावसामुळे शेतांमधील विहिरी तुडुंब भरल्या आहेत. अशा परिस्थितीत रब्बी पेरणी दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. यामुळे बी-बियाणे, खताचा तुटवडा पडू शकतो. शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील गहू, हरभऱ्याचे बियाणे व खत मोफत देण्यात यावे. अशा वेळी शेतकऱ्यांना सावरण्यासाठी ५० हजारांची मदत तत्काळ दिली जावी, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली.

मलकापूरमध्येही मागणी शिवसेनेने मलकापूर उपविभागातही निवेदन देत तातडीने ५० हजारांची शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली आहे. याबाबत निवेदन देण्यात आले. शिवसेना जिल्हा उपप्रमुख वसंतराव भोजने, तालुकाप्रमुख विजय साठे, शहर प्रमुख किशोर नवले, तालुका उपप्रमुख ओंकारसिंग डाबेराव, अनंता गायगोळ, गणेश ठाकूर, विनायक जवरे, गजानन धाडे, विनायक बोरसे, विनोद बोदडे, संजयसिंग राजपूत, संदीप पाटील, मुकेश ललवाणी, उमेश हिरुळकर, राजू सिरसाट, गजानन गायगोळ आदी पदाधिकारी व शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com