Agriculture news in Marathi, Seeds, fertilizers should be provided free of cost for the Rabi season | Agrowon

रब्बी हंगामाकरिता बियाणे, खते मोफत देण्यात यावीत : शिवसेना
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

बुलडाणा ः परतीच्या पावसाने जिल्ह्यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले असून, शेतकरी कर्जाच्या विवंचनेत अडकलेला आहे. खरीप हातातून गेला असून, रब्बी हंगामात पेरणीसाठी शेतकऱ्यांजवळ काहीच पैसे शिल्लक नाहीत. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता रब्बी हंगामासाठी खते, बियाणे मोफत देण्यासह हेक्टरी ५० हजार रुपयांची तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे केली आहे. जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांच्या नेतृत्वात पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डाॅ. निरुपमा डांगे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चाही केली.    

बुलडाणा ः परतीच्या पावसाने जिल्ह्यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले असून, शेतकरी कर्जाच्या विवंचनेत अडकलेला आहे. खरीप हातातून गेला असून, रब्बी हंगामात पेरणीसाठी शेतकऱ्यांजवळ काहीच पैसे शिल्लक नाहीत. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता रब्बी हंगामासाठी खते, बियाणे मोफत देण्यासह हेक्टरी ५० हजार रुपयांची तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे केली आहे. जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांच्या नेतृत्वात पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डाॅ. निरुपमा डांगे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चाही केली.    

परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात यंदाचा खरीप हंगाम पूर्णत: नेस्तनाबूत झाला आहे. शेतातील संपूर्ण हिरवी पिके कुजली आहेत. शेतकऱ्यांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत रब्बी हंगाम कसा घ्यायचा या विवंचनेत शेतकरी सापडले आहेत. खरीप हंगामातील नुकसानाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, संपूर्ण शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सावरण्याकरिता परिस्थितीची जाण ठेवीत शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे गरजेचे झाले आहे. जोरदार पावसामुळे शेतांमधील विहिरी तुडुंब भरल्या आहेत. अशा परिस्थितीत रब्बी पेरणी दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. यामुळे बी-बियाणे, खताचा तुटवडा पडू शकतो. शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील गहू, हरभऱ्याचे बियाणे व खत मोफत देण्यात यावे. अशा वेळी शेतकऱ्यांना सावरण्यासाठी ५० हजारांची मदत तत्काळ दिली जावी, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली.

मलकापूरमध्येही मागणी
शिवसेनेने मलकापूर उपविभागातही निवेदन देत तातडीने ५० हजारांची शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली आहे. याबाबत निवेदन देण्यात आले. शिवसेना जिल्हा उपप्रमुख वसंतराव भोजने, तालुकाप्रमुख विजय साठे, शहर प्रमुख किशोर नवले, तालुका उपप्रमुख ओंकारसिंग डाबेराव, अनंता गायगोळ, गणेश ठाकूर, विनायक जवरे, गजानन धाडे, विनायक बोरसे, विनोद बोदडे, संजयसिंग राजपूत, संदीप पाटील, मुकेश ललवाणी, उमेश हिरुळकर, राजू सिरसाट, गजानन गायगोळ आदी पदाधिकारी व शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

इतर बातम्या
वाशीम जिल्ह्यात रब्बीत होणार एक लाख...वाशीम : जिल्ह्यात या रब्बी हंगामासाठी एक लाख...
खानदेशातील बाजारांमध्ये ज्वारीची आवक...जळगाव : अतिपावसामुळे खानदेशात ज्वारीचे आतोनात...
कापूस वेचणीला परप्रांतीय मजुरांचा आधारअकोला : अकोट तालुक्यातील ग्राम तरोडा व परिसरात...
अमरावती जिल्ह्यात २४५० कोटींचे नुकसानअमरावती : मॉन्सुनोत्तर पावसामुळे जिल्ह्यात तीन...
जळगाव : किसान सन्मान निधीपासून ७०...जळगाव : केंद्राच्या शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेल्या...
व्यापाऱ्यांनी शेतमाल बाजारातील बदल...पुणे ः बाजार समित्या बरखास्त केल्यास सक्षम...
नाशिक जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्टरवर...नाशिक : ऑक्टोबर महिन्यातील पावसामुळे जिल्ह्यातील...
नांदेड : सोयाबीनचा पेरणीपेक्षा अधिक...नांदेड  ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात...
पंचनाम्यांची ‘अतिवृष्टी’; रातोरात ९३...पुणे ः राज्य शासनाची यंत्रणा पिकाचे पंचनामे...
 बारामती उपविभागात ४३ हजार हेक्टरवरील...पुणे ः मॉन्सूनोत्तर पावसाने बारामती...
मराठवाड्यात ४१ लाख ४९ हजार हेक्टरवरील...औरंगाबाद  : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील ४१...
पुणे बाजार समितीत ‘आंबेमोहर’च्या दरात...पुणे  ः आंबेमोहर तांदळासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी...सोलापूर  ः कोरड्या आणि ओल्या दुष्काळामुळे...
पीकविम्यापासून वंचित राहिल्यास कंपनी...अकोला ः जिल्ह्यात गेल्या महिन्यातील पावसाने...
उसावर आता तांबेरा, तपकिरी ठिबकेकोल्हापूर: सातत्याने पडणारे धुके व जमिनीतील...
नगर : रब्बी ज्वारीचा १ लाख ९१ हजार...नगर  ः मॉन्सूनोत्तर पाऊस जोरात झाला असला तरी...
सातारा जिल्ह्यात रब्बीची १३ टक्के...सातारा  : जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्याने...
राजू शेट्टीं थेट काश्‍मीरात;...कोल्हापूर : काश्मीरमधील सफरचंद, अक्रोड, केशर...
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत...अर्धापूर, जि. नांदेड  : शेतकऱ्यांच्या...
शिवसेनेची गुरुवारी तुरंबे येथे ऊस परिषदकोल्हापूर  : येत्या गळीत हंगामासाठी ऊस दर...