agriculture news in Marathi seeds of IIHR now available online Maharashtra | Agrowon

‘आयआयएचआर’चे बियाणे आता ऑनलाइन 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या बंगळुरू येथील भारतीय फलोत्पादन संशोधन संस्थेने (आयआयएचआर) फळे, भाजीपाला व फुलांच्या नवीन जातींचे विकसित केलेले बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध होण्यासाठी ऑनलाइन विक्री पोर्टल सुरू केले आहे.

नाशिक : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या बंगळुरू येथील भारतीय फलोत्पादन संशोधन संस्थेने (आयआयएचआर)  फळे, भाजीपाला व फुलांच्या नवीन जातींचे विकसित केलेले बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध होण्यासाठी ऑनलाइन  विक्री पोर्टल सुरू केले आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना पीकनिहाय जाती निवडून बियाणे खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

‘आयआयएचआर’ ही संस्था प्रामुख्याने फळे, भाजीपाला व फूल पिकांवर संशोधन करूनअधिक उत्पादनक्षम जाती विकसित करत असते. संस्थेने विकसित केलेल्या जातींमुळे पिकांची गुणवत्ता व उत्पादकतेमध्ये वाढ दिसून आली आहे. संस्थेने शेतकऱ्यांसाठी पोर्टलवर बाराहून अधिक पिकांचे बियाणे उपलब्ध करून दिले आहे. 

शेतकऱ्यांना थेट संस्थेकडून बियाणे उपलब्ध करून देणे हा पोर्टलचा मुख्य उद्देश आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या या कामात विलंब होऊ शकतो, असे अगोदर सूचित करण्यात आले असून बियाणे खरेदीत अडचण आल्यास पैसे परताव्याचे धोरण स्पष्ट करण्यात आले आहे.

अशी करा ऑनलाइन बियाणे खरेदी

  • seed.iihr.res.in या पोर्टलवर भेट द्या.
  • मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून नोंदणी करा.
  • पोर्टलवर पीकनिहाय जातींच्या वैशिष्ट्यांसहित माहिती.
  • खरेदी करताना वजन व त्यानुसार किंमती विषयी माहिती.
  • पिकांच्या जातीनिहाय बियाणे उपलब्ध असेपर्यंत पुरवठा.
  • जातींची राज्यनिहाय शिफारस.
पीक उपलब्ध जाती
टोमॅटो अर्का सम्राट, अर्का रक्षक, अर्का अपेक्षा
भेंडी  अर्का निकिता
वांगी अर्का केशव
मिरची  अर्का अभीर
संकरित मिरची अर्का ख्याती, अर्का मेघना, अर्का श्वेता, अर्का हरिता
ढोबळी मिरची  अर्का मोहिनी, अर्का गौरव, अर्का अतुल्य
कलिंगड   अर्का माणिक
चवळी    अर्का मंगला 
कुयरी शेंग   अर्का मुकुणा
खरबूज     अर्का जीत, अर्का सिरी
पालक अर्का अनुपमा
कोथिंबीर   अर्का इशा
झेंडू   अर्का परी
पपई   अर्का सूर्या, अर्का प्रभात
सिड कीट भाजीपाला बियाणे, फुलांचे बियाणे, परसबाग कीट

इतर ताज्या घडामोडी
परतीचा मॉन्सून उद्या राजस्थान,...पुणे : परतीच्या मॉन्सूनसाठी माघारी सरकण्यासाठी...
सेवाग्राम विकास आराखड्यातील कामाचे आज ई...वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या...
राज्यात कांदा २०० ते ४३५२ रुपये सोलापुरात सरासरी २००० रुपये सोलापूर  ः...
हॉटेल, रेस्‍टॉरंट, बार ५ ऑक्‍टोबरपासून...मुंबई : कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून बंद...
पुणे विभागात खरीप कांद्याची ४० हजार...पुणे ः खरिपात अति पावसामुळे कांद्याचे नुकसान...
सोलापूर जिल्ह्यात पीक विमा नुकसान...सोलापूर : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
नुकसान भरपाई देण्यास सरकार कटिबद्ध :...औरंगाबाद  : ‘‘आता झालेल्या पावसाने...
कांदा बियाणे मिळवण्यासाठी अकोल्यात...अकोला ः रब्बी कांदा लागवडीची लगबग सुरु झाली...
लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा...लातूर ः या वर्षी सुरवतीपासून चांगला पाऊस होत...
जळगाव जिल्ह्यात मक्याची ९० हजार...जळगाव  ः खानदेशात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा...
आजरा तालुक्‍यात भात कापणी सुरूआजरा, जि. कोल्हापूर ः आजरा तालुक्‍यात भात...
कारखानदारांना वाढत्या साखर साठ्याची...मुंबई  : राज्यात गेल्या गाळप हंगामातील ७२...
धानावरील तुडतुड्यांचे वेळीच व्यवस्थापन...नागपूर  : ‘‘सद्यास्थितीत पूर्व विदर्भात...
‘बाभळी’तील पाणी अडविण्यासाठी प्रयत्न...नांदेड : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीकविम्यासाठी कंपनीकडे...नांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पुराच्या...
जायकवाडी प्रकल्पातून ५५ टीएमसी पाण्याचा...औरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून गत २५...
सांगली जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन...सांगली ः जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा...
आता खुल्या मिठाईवरही ‘वापर कालावधी’...नागपूर  : मिठाईच्या दुकानातील ‘ट्रे’ वर...
कुलगुरू निवड निकषांबाबत प्र-कुलपतींच्या...पुणे : कुलगुरू निवड निकषांच्या बदलाबाबत कुलपती...
मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्तांना...मुंबई : विदर्भातील पुरापाठोपाठ मराठवाड्यातील...