agriculture news in marathi, seeds sale status, parbhani, maharashtra | Agrowon

परभणी कृषी विद्यापीठ उत्पादित अडीच हजार क्विंटल बियाण्यांची विक्री
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 18 जुलै 2019

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर उत्पादित बीज प्रक्रिया केलेल्या विविध खरीप पिकांच्या एकूण २ कोटी ५९ लाख ५५ हजार ६२५ रुपये किमतीच्या २४६५ क्विंटल बियाण्यांची यंदा विक्री झाली आहे.

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर उत्पादित बीज प्रक्रिया केलेल्या विविध खरीप पिकांच्या एकूण २ कोटी ५९ लाख ५५ हजार ६२५ रुपये किमतीच्या २४६५ क्विंटल बियाण्यांची यंदा विक्री झाली आहे.

शेतकऱ्यांना पेरणीसाठी दर्जेदार बियाणे उपलब्ध व्हावे, यासाठी वसंतराव नाईक मराठावाडा कृषी विद्यापीठाने संशोधित केलेल्या सोयाबीन, मूग, उडीद, तूर, ज्वारी या पिकांच्या वाणांचा बीजोत्पादन कार्यक्रम विविध ठिकाणची संशोधन केंद्र, महाविद्यालयांच्या प्रक्षेत्रावर घेण्यात येतो. दरवर्षी १८ मे रोजी विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित खरीप पीक शेतकरी मेळाव्याच्या वेळी परभणी येथील बीज प्रक्रिया केंद्रात बियाणे विक्रीस सुरवात केली जाते.

परंतु, यंदा मराठवाडा विभागातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना विद्यापीठाचे बियाणे उपलब्ध व्हावे, या उद्देशाने कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांच्या संकल्पनेतून संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प आणि बदनापूर कृषी विज्ञान केंद्र (जि. जालना) येथील कडधान्य संशोधन केंद्र, नांदेड येथील कापूस संशोधन केंद्र, लातूर येथील तेलबिया संशोधन केंद्र, तुळजापूर (जि. उस्मानाबाद) येथील कृषी विज्ञान केंद्र, खामगाव (जि. बीड) येथील कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणी खरीप पिकांच्या विविध वाणांचे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. यंदा बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

या वर्षी सोयाबीनच्या एमएयूएस-७१, एमएयूएस-१५८, एमएयूएस-१६२, एमएयूएस-६१२ या वाणांचे मिळून एकूण २५३८ क्विंटल प्रक्रिया केलेले बियाणे उपलब्ध झाले होते. त्यातून २ कोटी ५० हजार रुपये किमतीच्या १९४५ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली. मुगाच्या बीएम २००३-२ वाणाचे ८२ क्विंटल बियाणे उपलब्ध होते. त्यातून ११ लाख ९९ हजार रुपये किमतीच्या ७८ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली.

उडदाच्या टीयू-१ वाणाचे १२ क्विंटल बियाणे उपलब्ध होते. उडदाच्या १ लाख ५६ हजार रुपये किमतीच्या १२ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली. तुरीच्या बीडीएन-७११, बीडीएन-७१६, बीएसएमआर-७३६ या वाणांचे एकूण ३३८ क्विंटल बियाणे उपलब्ध होते. त्यापैकी ४३ लाख ७० हजार रुपये किमतीच्या ३२० क्विंटल बियाण्यांची विक्री झाली. ज्वारीच्या परभणी शक्ती वाणांचे १४० क्विंटल बियाणे उपलब्ध झाले होते. त्यापैकी १ लाख ८० हजार रुपये किमतीच्या ११० क्विंटल बियाण्यांची विक्री झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 

इतर ताज्या घडामोडी
वांग्यावरील शेंडा व फळे पोखरणाऱ्या...वांगी पिकामध्ये येणाऱ्या शेंडा व फळे पोखरणारी...
पूरस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापनसां गली, कोल्हापूर व कर्नाटक शेजारील काही भागांत...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
सांगलीत गूळ ३३०० ते ४४०० रुपये...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...
मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शरद पवार...मुंबई  ः कोल्हापूर, सांगली, सातारा या...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...