agriculture news in marathi, Seena- Madha water dispute meeting on Tuesday | Agrowon

सीना माढा पाणीप्रश्नी मंगळवारी बैठक
टीम अॅग्रोवन
रविवार, 6 जानेवारी 2019

सोलापूर : सीना-माढा सिंचन योजनेच्या पाण्यासाठी कालव्याची मागणी आहे. त्यासंबंधी जलसंपदामंत्र्यांशी बोलणे झाले असून, येत्या ८ जानेवारीला संबंधित अधिकाऱ्यांची बैठक होईल. त्यामुळे लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल, अशी माहिती खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी दिली. 

कुर्डू येथे सीना-माढा योजनेचे पिंपळखुंटे, अंबाड, शिराळ व कुर्डूला पाणी मिळावे, यासाठी चक्री उपोषण सुरू आहे. मोहिते पाटील यांनी या आंदोलकांची भेट घेतली. या वेळी आमदार नारायण पाटील, भारत पाटील, रवींद्र ननवरे, अतुल खुपसे, दादा टोणपे, पवन पाटील, शहाजी भोगे, विनय भगत आदी उपस्थित होते.

मोहिते पाटील म्हणाले, ``कृष्णा-भीमा स्थिरीकरणाच्या योजनेसाठी सर्वांनी मिळून आवाज उठविण्याची गरज आहे. या योजनेमुळे कायमचा पाणी प्रश्न मिटणार आहे. सीना-माढा योजनेचे पाणी आणण्यासाठी प्रयत्न करू. सर्वांना सोबत घेऊन पाणी प्रश्न मार्गी लावणार आहे. आंदोलनातील ३०० शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल आहेत. ते मागे घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे आंदोलन मागे घ्यावे.`` 

पण पाणी संघर्ष समितीतर्फे जोपर्यंत सिंचन योजनेच्या खोदकामाला सुरवात होत नाही, तोपर्यंत उठणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली. लोकसभेला शिराळ, पिंपळखुंटे, अंबाड व कुर्डू गावांमध्ये मतदानाला बहिष्कार घालण्यात येईल, असा इशाराही दिला.

इतर ताज्या घडामोडी
साताऱ्यातील प्रमुख धरणांत ९९ टक्‍क्‍...सातारा ः जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी; तसेत...
परभणी जिल्ह्यातील २० मंडळांमध्ये...परभणी ः दोन वर्षांच्या खंडानंतर परभणी जिल्ह्यात...
‘स्वाभिमानी’चे ठिय्या आंदोलन सुरू  सातारा ः जिल्ह्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना...
परभणी जिल्ह्यात रब्बीचे सव्वापाच टक्के...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदाच्या (२०१९-२०) रब्बी...
पुणे ः नऊ हजार हेक्टरवरील भाजीपाल्याचे...पुणे ः गेल्या आठ दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी...
जालना : निर्यातक्षम द्राक्षांच्या...जालना : निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी...
लडाखला उभारणार सेंद्रिय शेती संशोधन...पुणे ः विविध शैक्षणिक क्षेत्रातील संशोधनावर...
नगर जिल्ह्यामध्ये २४१ वैयक्तिक पाणी...नगर ः वीस दिवस सतत पाऊस पडल्याने पाणीपातळी वाढली...
शेतकऱ्यामुळे टळला रेल्वे अपघात ! नगर : मनमाड-दौंड रेल्वेरुळाला विळद-देहरे गावच्या...
अतिपावसाने नगरमधील शेतजमिनी चिबडल्यानगर  : अतिपावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले...
नांदेड जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्टरवरील...नांदेड : नांदेड जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या...
वर्धा जिल्ह्यातील ६०० हेक्‍टरवरील ...वर्धा  ः जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पावसामुळे...
दक्षिण महाराष्ट्रातील साखर...कोल्हापूर  : दक्षिण महाराष्ट्रात पावसाने...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे उन्हाळ...नाशिक  : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या...
ऊसतोड कामगारांच्या रोजगारावर होणार...नगर ः गतवर्षी दुष्काळामुळे उसाचे क्षेत्र घटले....
वऱ्हाडातील प्रकल्प तुडुंबअकोला  ः गेल्या महिन्यात सतत झालेल्या...
नाशिक जिल्ह्यात कांदा व्यापाऱ्यांवर धाडीनाशिक  : देशभरात कांद्याचा साठा संपुष्टात...
पीक व्यवस्थापन सल्ला सध्या मोठ्या प्रमाणात झालेल्या परतीच्या पावसामुळे...
कळमणा बाजारात सोयाबीनची आवक आणि दरातही...नागपूर ः येथील कळमणा बाजार समितीत नव्या सोयाबीनची...
जळगाव बाजारात केळीची आवक रखडतजळगाव ः जिल्ह्यात केळीची आवक रखडतच सुरू असून,...