Agriculture news in Marathi Seize fake onion seeds at the edges | Agrowon

कडा येथे कांद्याचे बनावट बियाणे जप्त

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 जून 2021

नगर जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या कडा (ता. आष्टी) येथे शनिवार (ता. १९) एका कृषी केंद्र चालकाकडून कांद्याचे एक लाख रुपये किमतीचे बनावट बियाणे जप्त केले आहे.

नगर ः नगर जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या कडा (ता. आष्टी) येथे शनिवार (ता. १९) एका कृषी केंद्र चालकाकडून कांद्याचे एक लाख रुपये किमतीचे बनावट बियाणे जप्त केले आहे. पंचगंगा कंपनीच्या नावे बनावट बॉक्स करून हे बियाणे विकले जात होते. 

कृषी विभाग, पोलिस व पंचगंगा सिड्सच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. त्यामुळे या परिसरासोबतच नगर जिल्ह्यातील काही भागातही दर्जेदार कंपनीच्या बियाणांच्या नावाखाली कांद्याचे बनावट बियाणे विक्री झाल्याचे शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्यावर्षी नगर जिल्ह्यात बनावट बियाणांच्या विक्रीतून मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सोसावा लागला आहे.

नगर, कर्जत, पाथर्डी, जामखेड, आष्टी (जि. बीड) भागात खरिपात आणि रब्बीतही कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. यंदाही कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी कांदा बियाणांची टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे यंदा कांदा बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. त्याचा फायदा घेऊन पंचगंगा या बियाणे कंपनीच्या नावे बनावट बियाणे विकले जात असल्याची माहिती कंपनीच्या पथकाला मिळाली होती. 

त्यातून पथकातील कारभारी उदागे व इतरांनी शुक्रवारी (ता. १८) बनावट ग्राहक होऊन कांदा बियाणे खरेदी केली. त्यावेळी हे बियाणे बनावट असल्याचे स्पष्ट होताच सहायक पोलिस निरीक्षक भरत मोरे, पोलिस उपनिरीक्षक योगेश कोरडे, कृषी विभागाचे बीड जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी साय्याप्पा गराडे, आष्टी तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, मंडळ अधिकारी गोरख तरटे, कैलास जाधव, कंपनीचे अधिकारी प्रवीण शिंदे यांनी शनिवारी कडा (ता. आष्टी) येथील गजानन कृषी सेवा केंद्रातून पंचगंगा या नावाचे बनावट ५०० ग्रॅम वजनाचे ७८ पाकिटे (किंमत १ लाख ९ हजार रुपये) जप्त केले आहे. 

या दुकानदाराने आतापर्यंत किती बनावट बियाणे विकले याचा पोलिस तपास करत आहेत. या प्रकाराने शेतकऱ्यांत खळबळ उडाली आहे. गेल्यावर्षी कड्याला जोडून असलेल्या नगर जिल्ह्यातील कर्जत, श्रीगोंदा व अन्य भागात पंचगंगाच्या नावे कांद्याचे बनावट बियाणे विकले गेले होते. त्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. अजूनही या भागात बनावट कांदा बियाणे विक्री करणारी टोळी कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान पंचगंगाच्या नावे बनावट बियाणे विकले जात असल्यास कळवावे व ग्राहकांनी चढ्या भावाने विक्री होत असल्याचे कळवावे, असे आवाहन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.


इतर बातम्या
७२ तासांची सक्ती नको ः आयुक्तपुणे ः विमा कंपन्यांनी कामकाजात तातडीने सुधारणा...
पीकविमा योजनेच्या मूळ उद्देशालाच हरताळपुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेच्या माध्यमातून...
अखेर ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखलअमरावती : राज्य शासनाने केलेल्या करारानुसार इफ्को...
पळवाटांमुळे पीकविमा भरपाई दुरापास्तशेतकऱ्यांकडून पीकविम्याचा हप्ता भरतेवेळी...
अमरावतीतील २३ हजार हेक्टर शेती बाधित अमरावती : संततधार पावसाने जिल्ह्यातील ५०० गावे...
विमा कंपन्यांबाबत सरकारची बोटचेपी भूमिकापीकविमा योजनेमुळे शेतकऱ्यांऐवजी पीकविमा कंपन्याच...
खामगाव बाजार समितीच्या  कारभाराविरुद्ध...बुलडाणा : खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
केंद्र स्थापन करणार शेतकरी उत्पादक... नवी दिल्ली ः केंद्र सरकारने देशात सुमारे...
सांगलीत ४१ हजार हेक्टरवरील पिके...सांगली : गेल्या आठवड्यात झालेल्या पाऊस,...
धरणांतील पाण्याच्या विसर्गात घटपुणे : राज्यात पावसाचा जोर ओसरू लागल्याने धरणांत...
पुण्यात पंचनामे गतीने सुरूपुणे : जिल्ह्यात नुकसानीचे पंचनामे करण्यास वेग...
परभणी ः मूग, उडदाच्या पीक स्पर्धेसाठी...परभणी ः कृषी विभागातर्फे खरीप हंगामापासून...
रत्नागिरी ‘झेडपी’चे  ८० कोटींचे नुकसान रत्नागिरी : अतिवृष्टीने चिपळूण, खेड, संगमेश्वरसह...
सांगोल्यातील रोगग्रस्त डाळिंब बागांची...सांगोला, जि. सोलापूर : वातावरणात होणारे बदल आणि...
पशुसंवर्धन विकासासाठी पशुपालक,...नाशिक : ‘‘आत्मनिर्भर भारत अंतर्गत २०२०-२१...
खानदेशात भिज पाऊसजळगाव : खानदेशात गेले दोन दिवस अनेक भागात हलका ते...
पशुचिकित्साकांच्या कामबंद  आंदोलनाचा...रिसोड, जि. वाशीम : पशुचिकित्सा व्यावसायिकांनी १६...
हिंगोलीत विमा कंपनीचा अनागोंदी कारभारहिंगोली ः जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजना...
नाशिक विभागात मिळाल्या १६३१ भूमिहीनांना...नाशिक : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व...
नुकसानभरपाईपोटी मिळाले २७० रुपयेपाचोरा, जि. जळगाव : खडकदेवळा (ता. पाचोरा) येथील...