आंतरपिकात लवकर आणि उशिरा परिपक्व होणाऱ्या पिकांची निवड करा : डॉ. देवसरकर

परभणी ः ‘‘येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी आंतरपीक पध्दतीचा अवलंब करताना एका लवकर, तर एका उशिरा परिपक्व होणाऱ्या पिकांची निवड करावी,’’ असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. डि. बी. देवसरकर यांनी केले.
Select early and late maturing crops in intercropping: Dr. Devasarkar
Select early and late maturing crops in intercropping: Dr. Devasarkar

परभणी  ः ‘‘येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी आंतरपीक पध्दतीचा अवलंब करताना एका लवकर, तर एका उशिरा परिपक्व होणाऱ्या पिकांची निवड करावी,’’ असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. डि. बी. देवसरकर यांनी केले. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि रिलायन्स फाउंडेशनतर्फे बुधवारी (ता.६) ध्वनी परिषदेव्दारे (ऑडिओ कॉन्फरन्स) शेतकरी-शास्‍त्रज्ञ संवादाचे आयोजन करण्‍यात आले. विस्तार शिक्षण संचालक डॉ. डि. बी. देवसरकर, जेष्ठ कृषी विद्यावेत्ता डॉ. यु. एन. आळसे, उद्यान विद्यावेत्ता डॉ. एस. जी. शिंदे, किटकशास्त्रज्ञ प्रा. डि. डि. पटाईत आदीसह ४२ गावांतील ५० शेतकरी सहभागी झाले होते. 

डॉ. देवसरकर म्हणाले, ‘‘खरीप हंगामात उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांनी आंतरपीक पद्धतीचा अवलंब करताना एकाच कुळातील दोन किंवा त्यापेक्षा जास्त पिके एका क्षेत्रावर घेऊ नयेत. एकाच प्रकाराच्या मुळ असणाऱ्या पिकांची निवड करू नये. लवकर पक्व होणारी तसेच उशिरा पक्व होणारी पिके एकत्रितपणे निवडावी.’’ 

आंतरपीक पद्धतीतील मिश्र पीक पद्धती, जोड ओळ पद्धत, पट्टा पद्धत आदींचे फायदे त्यांनी सांगितले. एक पीक पद्धतीपेक्षा जास्त उत्पन्न मिळते. दोनपैकी किमान एका पिकाच्या उत्पन्नाची शाश्वती अधिक असते. आंतरपीक पध्दतीमुळे जमिनीचा मगदूर टिकून राहण्यास मदत होते, असे डॉ. देवसरकर यांनी सांगितले. 

डॉ. आळसे यांनी बीज प्रक्रिया, बियाणे निवड, ऊस खत व्यवस्थापन या बाबत माहिती दिली. डॉ. शिंदे यांनी आंबा, पेरु, सिताफळ आदी फळबाग लागवड, हळद लागवड यावर मार्गदर्शन केले. 

प्रा पटाईत यांनी कीड-रोग व्यवस्थापनावर माहिती दिली. शेतकऱ्यांनी आपल्या घरातच बसून फोनद्वारे फळबाग व्यवस्थापन, खरीपपूर्व नियोजन, जमीन मशागत आदीवर प्रश्न विचारले. आयोजन फाउंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक विलास सवाणे, कार्यक्रम सहाय्यक रामाजी राऊत यांनी केले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com