शेती अवजारांसाठी लाभार्थी शेतकऱ्यांची सोडतीने निवड 

शेती अवजारांसाठी लाभार्थी शेतकऱ्यांची सोडतीने निवड 
शेती अवजारांसाठी लाभार्थी शेतकऱ्यांची सोडतीने निवड 

नगर ः ‘उन्नत शेती - समृद्ध शेतकरी’ अभियानांतर्गत यांत्रिकीकरण घटकाचा ट्रॅक्टर व शेती अवजारासाठी नगर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. १६०५ ट्रॅक्टरसाठी व १३०० अवजारांसाठी असे एकूण शेतकऱ्यांचे २९६५ अर्ज तालुका कृषी कार्यालयास प्राप्त झाले आहे. उन्नत शेती-समृद्ध शेतकरी अभियानांतर्गत नगर कृषी कार्यालय येथे यांत्रिकीकरण घटकाचा सोडत पद्धतीने प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विलास नलगे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. 

या वेळी तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब नितनवरे, तंत्र अधिकारी रवींद्र माळी, मंडळ कृषी अधिकारी नारायण करांडे, सूर्यकांत शेकडे, सचिन भोसले, अमिन पठाण, संजय मेहेत्रे, राहुल गांगुर्डे, उमेश शेळके, बाळासाहेब काकडे, रमेश गोसावी, आशुतोष ढुमणे, गणेश पाचपुते, बाळासाहेब भोसले, प्रतिभा ढवळे, प्राणंदा ठोंबरे व शेतकरी उपस्थित होते.

या वेळी विलास नलगे म्हणाले, की लकी ड्रॉमध्ये सोडत निघालेल्या शेतकऱ्यांचा ज्येष्ठता क्रम निश्‍चित करून कृषी विभागाची पूर्व संमती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना यंत्र अवजारे खरेदी करावीत. त्याची मोफत तपासणी करून त्याचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाइन जमा करण्यात येणार आहे. शासकीय योजना आता सर्व ऑनलाइन झाल्या आहेत. 

शेतकऱ्यांनी आता काळानुसार बदलले पाहिजे. शासकीय योजनांचा लाभ घेतला पाहिजे. शेतीत चढउतार हे चालूच असतात. ७ वर्षांत ५ वेळा दुष्काळाला सामोरे जावे लागले आहे. शेतकऱ्यांने पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकांचे नियोजन करावे. ठिबक सिंचनाचा वापर करून गादी वाफा पद्धतीने व सरी ओरंबा पद्धतीने शेती करावी, असे नलगे म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com