कृषी परिषदेचे उपाध्यक्ष जावळे यांच्यासह २८ सदस्यांच्या नियुक्त्या रद्द

कृषी परिषदेचे उपाध्यक्ष जावळे यांच्यासह २८ सदस्यांच्या नियुक्त्या रद्द
कृषी परिषदेचे उपाध्यक्ष जावळे यांच्यासह २८ सदस्यांच्या नियुक्त्या रद्द

पुणे ः युती सरकारच्या काळातील अनेक निर्णय रद्द केल्यानंतर महाआघाडी सरकारने कृषी संलग्न असलेल्या कृषी व शिक्षण संशोधन परिषद, चारही कृषी विद्यापीठे व कृषी विद्यापीठ सेवा प्रवेश मंडळांवरील सदस्यांना दणका देण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांच्यासह २८ सदस्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत. राज्यात महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम १९८३ मधील तरतुदीनुसार कृषी शिक्षण व संशोधन परिषद, कृषी विद्यापीठाची कार्यकारी परिषद आणि महाराष्ट्र कृषी विद्यापीठे सेवा प्रवेश मंडळ यांची निर्मिती करण्यात आली आहे. मागील सरकारने महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेवर उपाध्यक्ष (कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा) या पदावर हरिभाऊ जावळे यांची नियुक्ती केली होती. तर परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी), पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (अकोला), डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (दापोली) यावर २२ अशासकीय सदस्यांची नियुक्ती केली होती. सरकारने सर्व सदस्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत.   पुण्यातील महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेवर कृषी विद्यापीठ स्तरावरील एका अशासकीय सदस्याची नियुक्ती करण्यात आली होती. परिषदेवरील एकूण पाच सदस्यांची नियुक्ती रद्द केली आहे. याशिवाय महाराष्ट्र कृषी विद्यापीठे सेवा प्रवेश मंडळावर अध्यक्ष असलेले डॉ. विजय मेहता यांचीही नियुक्त रद्द करण्याचे आदेश अवर सचिव उमेश चांदिवडे यांनी दिले आहेत. या सर्व पदावर मागील सरकारने आपल्या मर्जीतील विविध सदस्यांची अशासकीय नेमणूक केली होती. मात्र, आघाडी सरकार या नियुक्त रद्द केल्या आहेत. त्यातच महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेसमोर कृषी पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांनी विविध मागण्यासाठी गेल्या दहा दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. त्याचाही फटका अशासकीय सदस्यांना बसला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.   महाआघाडी सरकारने रद्द केलेल्या नियुक्त्या

  • महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे ः हरिभाऊ जावळे, उपाध्यक्ष (कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा)
  • वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी ः लिंबाजी भोसले, अजय गव्हाणे, बालाजी देसाई, शरद हिवाळे, पवित्राबाई सुरवसे, डॉ. अदिती सारडा.
  • महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी ः तुषार पवार, नाथाजी चौगुले, पंकजकुमार महाले, डॉ. विजयप्रकाश ठोंबरे, सुनीता पाटील, दत्तात्रय पानसरे.
  • डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोल ः जैनुद्दीन जव्हेरी, गणेश कंडारकर, विनायक सरनाईक, मोरेश्वर वानखेडे, स्नेहा हरडे, डॉ. अर्चना बारब्दे.
  • डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली ः प्रवीण देशमुख, डॉ. उदयसिंह पाटील, राजेश वानखेडे, अर्चना पानसरे.
  • महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे ः तुषार पवार, मोरेश्‍वर वानखेडे, अर्चना पानसरे, अजय गव्हाणे, सुरेश थोरात (कृषी शास्त्रज्ञ).
  • महाराष्ट्र कृषी विद्यापीठ सेवा प्रवेश मंडळ, पुणे ः डॉ. विजय मेहता, अध्यक्ष.  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com