सोलापूर बाजार समितीच्या सभापतीची १० जूनला निवड

सोलापूर बाजार समितीच्या सभापतीची १० जूनला निवड
सोलापूर बाजार समितीच्या सभापतीची १० जूनला निवड

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी राजीनामा दिल्यानंतर बाजार समितीचा नवीन सभापती कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे ही उत्सुकता आणखीच ताणली गेली आहे. दरम्यान, येत्या १० जूनला नव्या सभापतीची निवड होणार आहे. प्रातांधिकारी शिवाजी जगताप यांची निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. 

गतवर्षी झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी कॉंग्रेसला साथ देत दिलीप माने यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलमधून स्वतः निवडणूक लढवत  भाजपचेच नेते, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या पॅनेलला आव्हान दिले. त्यातून ही निवडणूक जिंकली होती. त्यात सहकारमंत्र्यांना केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले होते. परंतु सध्या राज्य आणि देशस्तरावरील भाजपच्या बाजूने दिसत असलेला कौल आणि बदलत्या राजकीय परिस्थितीचा विचार करता पालकमंत्री देशमुख यांची भूमिका काय असणार, यालाही या निवडीत महत्त्व आहे.

आगामी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून माने कॉंग्रेसकडून निवडणूक लढवतील. त्यांचे प्रतिस्पर्धी सहकारमंत्री सुभाष देशमुख असणार आहेत. त्यामुळेही या सर्व घडामोडी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून माने यांनी बेरजेचे गणित म्हणून हा राजीनामा दिला, हे लपून राहिलेले नाही. त्यांच्या जागी आता कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब शेळके यांचे नाव चर्चेत आहे. पण शेळके की अन्य कोणाचे नाव येणार, याकडेही सर्वांचे लक्ष आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वीपासूनच या निवडणुकीकडे लक्ष लागले होते. पण संपूर्ण प्रशासन निवडणुकीच्या कामांत गुंतल्याने ही प्रक्रिया थांबली होती. लोकसभेच्या निवडणुका पार पडल्याने आता ही प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यानुसार येत्या १० जूनला प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com