Agriculture news in Marathi Selection of Deola Agro Producer Company under 'Smart' Scheme | Agrowon

‘स्मार्ट’ योजनेअंतर्गत देवळा ॲग्रो प्रोड्यूसर कंपनीची निवड

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 जुलै 2020

नाशिक : जागतिक बँक अर्थसहाय्यित बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) योजनेअंतर्गत जिल्ह्यातील देवळा ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी लिमिटेडची निवड करण्यात आली आहे. या अंतर्गत १ कोटी ५३ लाख किमतीच्या ‘गो फॉर फ्रेश’ कंपनीसोबत ‘फळे व भाजीपाला उत्पादक भागीदारी’ या उपप्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. या कंपनीमार्फत देश व विदेशात कांदा निर्यात चालू करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष आहेर यांनी दिली.

नाशिक : जागतिक बँक अर्थसहाय्यित बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) योजनेअंतर्गत जिल्ह्यातील देवळा ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी लिमिटेडची निवड करण्यात आली आहे. या अंतर्गत १ कोटी ५३ लाख किमतीच्या ‘गो फॉर फ्रेश’ कंपनीसोबत ‘फळे व भाजीपाला उत्पादक भागीदारी’ या उपप्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. या कंपनीमार्फत देश व विदेशात कांदा निर्यात चालू करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष आहेर यांनी दिली.

‘स्मार्ट’मार्फत निवड करण्यात आलेली देवळा ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी ही नाशिक जिल्ह्यातील एकमेव शेतकरी कंपनी आहे. या कंपनीमार्फत शेतकऱ्यांच्या शेतातील माल थेट ग्राहकाच्या दारात नेण्यासाठी कोल्ड स्टोरेज, पॅक हाउस व त्या आनुषंगिक लागणाऱ्या सोयी-सुविधांसाठी दीड कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आहेर यांनी दिली.

‘स्मार्ट’च्या योजनेअंतर्गत देश-विदेशात भाजीपाला पुरवठा करणारी ‘गो फॉर फ्रेश’ या कंपनीबरोबर देवळा ॲग्रो प्रोड्यूसर कंपनीचा शासन स्तरावर करार झाला आहे. त्या अनुषंगाने सध्या शेतकऱ्यांच्या शेतातील कांदा परराज्याबरोबरच परदेशातही विक्री करण्यास सुरुवात झाली आहे. या निर्यातीतील पहिला कंटेनर आत्माचे प्रकल्प संचालक हेमंत काळे यांच्या उपस्थितीत रवाना करण्यात आला. या वेळी कंपनीचे संचालक प्रवीण मेधने, शुभम निकम, ‘गो फॉर फ्रेश’चे पदाधिकारी प्रवीण निकम, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सागर खैरनार, महेश देवरे, किशोर अहिरे आदी उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापूर बाजार समिती नोकर भरतीविरोधात...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नगर : मक्‍याला हमीभावापेक्षा कमी दर...नगर ः रब्बी हंगामामध्ये शासनाच्या किमान आधारभूत...
सातारा जिल्ह्यात खरिपाच्या ८२.८५ टक्के...सातारा  ः पावसाचा काहीसा जोर वाढल्याने...
पुणे बाजार समितीसह उपबाजार ...पुणे  ः ‘कोरोना’च्या फैलावामुळे शहरातील...
नगर जिल्ह्यात एक लाख १७ हजार हेक्टरवर...नगर  ः जिल्ह्यात यंदा जुलैच्या पहिल्याच...
अमरावतीत बियाणे कंपनीकडून ९०१ बॅग, २२...अमरावती : जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत १...
कोविड-१९ रुग्णांच्या वास, चव संवेदनांवर...कोविड १९ च्या आजारातून बरे झाल्यानंतरही सुमारे ९०...
खानदेशात दुबार पेरणीसाठी ताग, बाजरी,...जळगाव  ः खानदेशात दुबार पेरणी आटोपली आहे....
जळगावमधील सिंचन प्रकल्पांची कामे...जळगाव  ः जिल्ह्यात तापी व गिरणा नदीवर...
निकृष्ट बियाणेप्रकरणी सर्व कंपन्यांवर...नगर: जिल्ह्यात गेल्या एक महिन्याच्या कालावधीत...
बॅंकांनी पीककर्ज प्रकरणे तत्काळ मार्गी...वर्धा  ः जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांपैकी एकही...
गोंदिया जिल्ह्यात युरियाची टंचाईगोंदिया  ः पावसामुळे धान रोवणीला वेग आल्याने...
औरंगाबाद जिल्ह्यात खतांचा पुरवठा सुरळीत...औरंगाबाद : जिल्ह्यात ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
अकोल्यात तूर सरासरी ५८०० रुपये क्विंटलअकोला  ः  येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्ह्यातील तीन केंद्रांवर २०२३...सांगली  ः जिल्ह्यात हमीभावाने मका खरेदीसाठी...
रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी पिकासाठी...रत्नागिरी  : रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी...
आरोग्यदायी दालचिनीमसाल्यांच्या पदार्थांत, घरात मसाला करताना...
कोकण, कोल्हापूर पट्ट्यात मुसळधार...कोकण व कोल्हापूर भागावर १००२ तर महाराष्ट्रावर...
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...