agriculture news in marathi selection of Ethnic male sheep is important | Agrowon

जातीवंत मेंढ्याची निवड महत्त्वाची

डॉ. सचिन टेकाडे
गुरुवार, 9 जानेवारी 2020

मेंढीपासून मिळणाऱ्या मांस, दूध, लोकर आणि लेंडीखत यासारख्या उत्पादनांना बाजारपेठेत वर्षभर मागणी असते. मेंढी व्यवस्थापनामध्ये प्रामुख्याने पैदास व प्रजननाचे नियोजन, गाभण मेंढ्या व नवजात कोकरांचे व्यवस्थापन, चारा व खाद्याचे नियोजन तसेच रोग प्रतिबंधात्मक उपाययोजना आवश्यक आहेत.

मेंढीपासून मिळणाऱ्या मांस, दूध, लोकर आणि लेंडीखत यासारख्या उत्पादनांना बाजारपेठेत वर्षभर मागणी असते. मेंढी व्यवस्थापनामध्ये प्रामुख्याने पैदास व प्रजननाचे नियोजन, गाभण मेंढ्या व नवजात कोकरांचे व्यवस्थापन, चारा व खाद्याचे नियोजन तसेच रोग प्रतिबंधात्मक उपाययोजना आवश्यक आहेत.

कळपातील मेंढ्या नियमित माजावर येतात का, याची खात्री करावी. मेंढ्या वर्षभर माज दाखवतात, परंतु जुलै ते सप्टेंबर आणि फेब्रुवारी ते एप्रिल या काळात माजावर येण्याचे प्रमाण जास्त असते. मेंढीला आलेला माज १२ ते ७२ तास टिकून राहतो. माज आल्यापासून १२ तासांनंतर नराद्वारे रेतन केल्यास गाभण राहण्याची शक्यता जास्त असते. माज खाली गेल्यास पुन्हा १८ ते २१ दिवसांनी माज येण्याची शक्यता असते.

गाभण मेंढ्यांची काळजी 

 • मेंढ्यांचा गाभण काळ ५ महिन्यांचा असतो. या काळात मेंढ्यांची विशेष काळजी घेणे आवश्‍यक असते.
   
 • गाभण काळातील शेवटच्या दीड महिन्यामध्ये कोकरांची वाढ जलद गतीने होते, यादरम्यान मेंढ्यांना अतिरिक्त पोषणाची आवश्यकता असते. या काळात २५० ते ३५० ग्रॅम अतिरिक्त संतुलित आहार (पेंड) आणि १० ते २० ग्रॅम खनिज मिश्रण, जीवनसत्त्वे द्यावीत.

व्यायलेल्या मेंढ्यांची काळजी 

सुरुवातीचे तीन महिने प्रतिदिन ३०० ते ४०० ग्रॅम संतुलित आहार (पेंड) द्यावी. त्यामुळे त्यांच्या शरीरात पोषक अन्नघटकांची कमतरता भासत नाही, दुधाचे प्रमाण वाढते.

नाळ कापून टिंचर आयोडिन लावणे 

जन्मानंतर कोकराला स्वच्छ कापडाने कोरडे करावे. त्याची नाळ शरीरापासून ३ ते ४ सेंमी अंतरावर बांधून त्याखाली १ सेंमीवर निर्जंतुक शस्त्राने कापावी. त्यावर टिंचर आयोडिनचा बोळा लावावा. असे केल्याने बाहेरील जीवजंतू नाळेवाटे शरीरात जात नाहीत.

जन्मानंतर एक तासामध्ये कोकरांना चिक पाजणे 

नवजात कोकराला ५ ते १० मिनिटांमध्ये मेंढीचे दूध पाजावे. पिलांना चिक पाजण्यास विलंब झाल्यास, त्यांच्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी प्रमाणात तयार होते.

कोकरांचे पोट साफ होण्यासाठी 

नवजात पिल्लांना ५ ते ७ मिलि पॅराफीन पाजावे, त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते.

कोकराचे वजन 

जन्मताच कोकराच्या वजनाची नोंद घ्यावी. त्यानंतर दर १५ दिवसांनी वजनाच्या नोंदी घ्याव्यात. चांगले आहार व्यवस्थापन केल्यास, वजनात प्रतिदिन १५० ते २०० ग्रॅम वाढ होते.

लोकर कातरणी 

 • वर्षामधून दोन वेळेस (फेब्रुवारी-मार्च व सप्टेंबर-ऑक्टोबर) लोकर कातरणी करावी. कातरणी आधी मेंढ्यांना धुवून घ्यावे व नंतर पौष्टिक खुराक द्यावा.
   
 • विजेवर चालणाऱ्या मशीनने कातरणी केल्यामुळे, कमी वेळात चांगल्या प्रतीची लोकर उपलब्ध होते

जातिवंत बालिंगा 

 • कळपामध्ये चांगल्या गुणधर्माचा जातिवंत, निरोगी, सुदृढ बालिंगा (नरमेंढा) असावा.
   
 • नराचे वजन २५ ते ३० किलो पेक्षा जास्त आणि वय दीड ते दोन वर्षांपेक्षा जास्त असावे.
   
 • कळपामधील नर दर २ वर्षांनी बदलावा. एकच नर दोन वर्षांपेक्षा जास्त काळ वापरल्यास अनुवंशिक दोष निर्माण होतात.

कळपातील मेंढ्यांची वैशिष्ट्ये 

कळपामध्ये निरोपयोगी, कमी उत्पादन देणाऱ्या आणि सतत आजारी पडणाऱ्या मेंढ्या ठेवू नयेत. कळपातील सर्व मेंढ्या उत्तम प्रजातीच्या व चांगले गुण असणाऱ्या असाव्यात. यामुळे उत्पन्नात भर पडते.

संपर्कः डॉ. सचिन टेकाडे, ८८८८८९०२७०
(सहाय्यक संचालक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, पुणे)


इतर कृषिपूरक
असे करा जनावरांतील पोटफुगीला प्रतिबंधसर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी...
व्यवस्थापनाला मार्केटिंगची जोड देत...पॅालिहाउसमधील फूलशेतीसाठी एकेकाळी प्रसिद्ध असलेले...
आरोग्यदायी शेळीचे दूधशेळीच्या दुधाचे नियमित सेवन केल्याने आतड्यांवरील...
बहुगुणी कडुनिंबविविध प्रकारचे त्वचारोग जसे की, त्वचेवर खाज, पुरळ...
..अशी ओळखा दुधातील भेसळवाढत्या महागाईमुळे अनेकदा अन्नपदार्थांमध्ये भेसळ...
संगोपनगृहातील रेशीम कीटकांची काळजीसध्या थंडीमध्ये वाढ होत असून, विविध अवस्थेतील...
मत्स्यपालन : तंत्र बायोफ्लॉक उत्पादनाचे...फ्लॉकची इष्टतम पातळी ही संवर्धनयोग्य माश्यांच्या...
थंडीमध्ये जपा जनावरांचे आरोग्य वातावरणातील अनपेक्षित बदल जनावरांच्या आरोग्यास...
मत्स्यशेतीमध्ये बायोफ्लाक तंत्रज्ञानाचे...टायगर कोळंबी, सफेद कोळंबी आणि व्हनामी कोळंबी...
संगोपनगृहातील रेशीम कीटकांचे थंडीपासून...सध्या थंडीमध्ये वाढ होत असून, विविध अवस्थेतील...
कोंबड्यांच्या योग्य व्यवस्थापनाकडे द्या... कुक्कुटपालन प्रक्षेत्राची जागा उंचावर असावी....
मत्स्यशेतीमधील बायोफ्लाक तंत्रज्ञानजैवपूंज (बायोफ्लाक) तंत्रज्ञानामध्ये जास्तीत...
जनावरांच्या आहारात करा योग्य वेळी बदलजनावरांच्या आहारात अचानक बदल केल्यामुळे पोटफुगी,...
शेळ्या-मेंढ्यांतील पीपीआर आजाराकडे...पीपीआर हा शेळ्या-मेंढ्यांतील अतिसंसर्गजन्य आजार...
जातीवंत मेंढ्याची निवड महत्त्वाचीमेंढीपासून मिळणाऱ्या मांस, दूध, लोकर आणि लेंडीखत...
लसीकरणाबाबत जागरूक राहा...आजारी जनावरे रोगवाहक म्हणूनही काम करू शकतात,...
जनावरांतील लसीकरणाचे महत्त्वजनावरांना आजार झाल्यास, अपुऱ्या पशुवैद्यकीय...
बैलातील आतडे बंद होण्याची समस्याउन्हाळ्यात तसेच इतर शेतीकामाच्या दिवसात जनावरांना...
पीक अवशेषातून अन्नद्रव्यांची उपलब्धता पीक अवशेषांमध्ये नत्राचे १.२५ ते ०.४० टक्के,...
लाळ्या-खुरकुत रोगावर प्रतिबंधात्मक...‘लाळ्या-खुरकुत’ हा रोग विषाणूजन्य असल्याने यावर...