agriculture news in marathi Selection of suitable wheat varieties for late sowing | Agrowon

उशिरा पेरणीसाठी योग्य गहू जातींची निवड

डॉ. हनुमान गरुड, बालाजी बोबडे 
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

परतीचा पाऊस दीर्घकाळ रेंगाळल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांसाठी पूर्वमशागत व अन्य कामे रखडलेली आहेत. गहू पेरणीलाही उशीर होत आहे. वेळेवर पेरणी (१५ नोव्हेंबर) शक्य न झाल्यास उशिरा पेरणीसाठी योग्य जातींची निवड करावी

राज्यामध्ये परतीचा पाऊस दीर्घकाळ रेंगाळल्यामुळे अनेक ठिकाणी रब्बी हंगामातील पिकांसाठी पूर्वमशागत व अन्य कामे रखडलेली आहेत. गहू पेरणीलाही उशीर होत आहे. वेळेवर पेरणी (१५ नोव्हेंबर) शक्य न झाल्यास उशिरा पेरणीसाठी योग्य जातींची निवड करावी. यांचे चांगले व्यवस्थापन केल्यास उत्पादनातील घट रोखता येईल.  
 
राज्यामध्ये रब्बी हंगामात हरभरा, रब्बी ज्वारीनंतर सर्वाधिक क्षेत्रावर गहू पिकाची लागवड केली जाते. देशात भातानंतर गहू हे दुसऱ्या क्रमांकाचे अन्नधान्य पीक आहे. गहू हे पीक जिरायत व बागायत या दोन्ही प्रकारांत घेतले जाते. 

सर्वसाधारण: ८० ते ८५ टक्के गहू चपातीच्या स्वरूपात खाल्ला जातो. त्यानंतर उर्वरित गव्हापासून पाव, बिस्कीट, केक व इतर खाद्य पदार्थ बनवले जातात. गहू पिकाचा भुसा जनावरांना खाद्य म्हणून उपयोगी ठरतो.

महाराष्ट्रात गव्हाच्या कमी उत्पादकतेची कारणे

 • लहरी व बदलते हवामान
 • हलक्या जमिनीची निवड 
 • कोरडवाहू क्षेत्रात मोठ्या प्रमाणात लागवड 
 • आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव 
 • अवेळी पेरणी 
 • सुधारित वाणाचा कमी वापर 
 • अयोग्य खत आणि पाणी व्यवस्थापन 

पूर्वमशागत 
खरीप हंगामातील पिकाची काढणी झाल्यानंतर जमीन १५ ते २० सें.मी. खोलीपर्यंत नांगरून घ्यावे.  कुळवाच्या साह्याने ३-४ पाळ्या देवून जमीन भुसभुशीत करावी. त्यानंतर पूर्वीच्या पिकांची धसकटे, अवशेष व इतर काडी कचरा वेचून घ्यावा. शेवटच्या कुळवणीपूर्वी हेक्टरी २० ते २५ गाड्या शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतात पसरून टाकावे.

जमीन
बागायती गहू पिकासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, भारी आणि खोल जमिनीची आवश्यकता असते. जिरायत गहू लागवडीसाठी मध्यम ते भारी जमीन निवडावी. मध्यम जमिनीत भरखते व रासायनिक खतांचा संतुलित वापर केल्यास अपेक्षित उत्पादन घेता येईल. सहसा हलक्या जमिनीत गहू पीक घेणे टाळावे.

हवामान
गहू पिकास थंड, कोरडे व स्वच्छ सूर्यप्रकाश असणारे हवामान मानवते. हे पीक किमान ४ ते ५ अंश सेल्सिअस, साधारणत: २५ अंश सेल्सिअस व कमाल ३० ते ३२ अंश सेल्सिअस तापमानात तग धरू शकते. ७ ते २१ अंश सेल्सिअस तापमानात पिकाची चांगली वाढ होते. पिकाच्या सर्वोत्कृष्ट वाढ व विकासासाठी दिवसाचे सरासरी तापमान हे १५ ते २० अंश सेल्सिअस दरम्यान असणे गरजेचे असते. थंडीचा कालावधी वाढल्यास उत्पादनात भर पडते. थंडीचा कालावधी कमी झाल्यास उत्पादनात घट येते.

सुधारित जाती
बागायत वेळेवर लागवड 

गोदावरी (एनआयएडब्ल्यू-२९५), त्र्यंबक(एनआयएडब्ल्यू-३०१), तपोवन (एनआयएडब्ल्यू-९१७), एचडी-२१८९, राज-४०३७, राज-४०८३, एमएसीएस-६२२२ 

बागायत उशिरा लागवड 
फुले समाधान (एनआयएडब्ल्यू-१९९४),  एचडी-२१८९, निफाड-३४, पीबीएन-१४२ (कैलास),  एचडी -२५०१, एचडी -२८३३ 

जिरायती लागवड : 
पंचवटी (एनआयडीडब्ल्यू -१५), नेत्रावती (एनआयएडब्ल्यू -१४१५) शरद (एकेडीडब्ल्यू -२९९७-१६), राज-१५५५ या वाणांची निवड करावी.

उशिरा पेरणीयोग्य जाती 
 

जाती    कालावधी (दिवस)   उत्पादन (क्विंटल) प्रमुख वैशिष्ट्ये
एच डी-२१८९  ११५-१२०   ४०-४५  बुटका वाण, जाड व तजेलदार वेळेवर तसेच उशिरा पेरणीसाठी योग्य 
कैलास (पीबीएन-१४२)  ११५-१२० ३२-३५  उशिरा पेरणीसाठी योग्य 
निफाड ३४ (एनआयएडब्ल्यू-३४)    १०५-११० ३५-४० बागायती उशिरा  पेरणीस योग्य, तांबेरा रोगास प्रतिकारक, चपातीसाठी उत्तम 
फुले समाधान- (एनआयएडब्लू-१९९४) (एनआयएडब्ल्यू-१९९४)  १०५-११०   ४५-५०   तांबेरा रोगास तसेच मावा किडीस प्रतिकारक, चपातीसाठी उत्तम, लवकर तयार होणारा, वेळेवर तसेच उशिरा पेरणीसाठी योग्य  

पेरणीची वेळ 

 • जिरायती लागवडीची वेळ (१५ ते ३० ऑक्टोबर) आता संपलेली आहे. 
 • बागायती (वेळेवर) लागवड : १ ते १५ नोव्हेंबर 
 • बागायती (उशिरा) गहू : १५ नोव्हेबर ते १५ डिसेंबर 
 • १५ डिसेंबरनंतर पेरणी करू नये, अन्यथा पीक उत्पादनावर परिणाम होतो.

बियाणाचे प्रमाण

 • जिरायत गहू पिकासाठी : ७५ ते १०० किलो प्रति हेक्टरी
 • बागायती वेळेवर पेरणीसाठी : १०० ते १२५ किलो प्रति हेक्टरी 
 • बागायती उशिरा पेरणीसाठी : १२५ ते १५० किलो प्रति हेक्टरी 

बीजप्रकिया

 • पेरणीच्या अगोदर बियाणांस थायरम या बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात प्रक्रिया करावी. त्यानंतर ॲझोटोबॅक्टर व स्फुरद विरघळणारे जिवाणू प्रत्येकी २५ ग्रॅम प्रति १० किलो बियाणे या प्रमाणे प्रक्रिया करावी. 
 • गहू पिकावरील मावा, तुडतुडे आणि खोडमाशी या किडींच्या नियंत्रणासाठी गहू बियाण्याला थायामिथोक्झाम (३०  टक्के एफएस ) ०.७५ मिलि प्रति किलो बियाणे या प्रमाणे प्रक्रिया प्रतिबंधात्मक उपाय म्हणून करावी.

पेरणीतील अंतर 
पेरणीसाठी पाभरीच्या साह्याने दोन ओळींतील अंतर २२.५ सें.मी. ठेवून ५ ते ६  सें.मी. पेक्षा खोल पडणार नाही, याची काळजी घ्यावी. 

खत व्यवस्थापन

 • जिरायती पेरणीसाठी : ४० : २० : ००  किलो प्रति हेक्टर पूर्ण नत्र व स्फुरद (युरिया-८७ किलो, एसएसपी-१२५ किलो)  पेरणीच्या वेळी द्यावे . 
 • बागायती वेळेवर पेरणी :  १२० : ६० : ४० किलो प्रति हेक्टर नत्र, स्फुरद व पालाश (युरिया-२६० किलो, एसएसपी-३७५ किलो, एमओपी-६६ किलो) यापैकी अर्धे नत्र, पूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी तर राहिलेले अर्धे नत्र पेरणीनंतर २१-३० दिवसांनी खुरपणी केल्यानंतर पहिले पाणी देतेवेळी द्यावे.  
 •  पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना २ टक्के युरिया खताची (२० ग्रॅम प्रति लिटर पाणी) फवारणी  केल्यास उत्पादनात चांगली वाढ होते. 
 •  बागायती उशिरा पेरणी :  ८० : ४० : ४० किलो प्रति हेक्टर नत्र, स्फुरद व पालाश (युरिया-१७३ किलो, एसएसपी-२५० किलो, एमओपी-६६ किलो) यापैकी अर्धे नत्र, पूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी तर राहिलेले अर्धे नत्र पेरणीनंतर २१-३० दिवसांनी द्यावे. 

पाणी व्यवस्थापन 
गव्हाची पेरणी करताना जमीन ओलावून वाफसा आल्यानंतरच करावी. या पिकाला संपूर्ण पीक वाढीच्या कालावधी दरम्यान ४ ते ५ पाण्याच्या पाळ्या देण्याची आवश्यकता असते. पेरणीनंतर साधारणत: १८ ते २० दिवसाच्या अंतराने पिकाला पाणी द्यावे. शक्यतो पीक वाढीच्या संवेदनशील अवस्थेमध्ये पिकाला पाण्याचा ताण बसणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी. 

सिंचनाची सुविधा अपुरी असल्यास आणि एकच पाणी देण्याची सुविधा असल्यास शक्यतो पेरणीनंतर ४० ते ४२ दिवसांनी पाणी द्यावे. 
 

पीकवाढीची संवेदनशील अवस्था    पेरणीनंतर दिवस 
मुकुट मुळे फुटण्याची    १८-२१
फुटवे जास्तीत जास्त  फुटण्याची अवस्था ३०-३५
कांडी धरण्याची अवस्था ४०-४५
पीक फुलावर असतानाची अवस्था ६५-७०
दाण्यात दुधाळ चीक अवस्था    ८०-८५
दाणे भरतानाची अवस्था  ९०-९५

आंतरमशागत 
आंतरमशागत केल्यामुळे तण नियंत्रणासोबतच जमिनीमध्ये ओलावा टिकून राहतो. त्यासाठी आवश्यकतेनुसार एक किंवा दोन वेळा खुरपणी करून घ्यावी. 

संपर्क ः डॉ. हनुमान गरुड, ७५८८६७७५८३
(विषय विशेषज्ञ-कृषी विद्या, कृषी विज्ञान केंद्र, खामगाव,  ता. गेवराई जि. बीड.)


इतर तृणधान्ये
कृषी शिक्षणाचा उठलेला बाजारम हाराष्ट्रातील कृषी महाविद्यालयांमध्ये शिक्षण...
बाजरी लागवडीचे तंत्रबाजरीची पेरणी १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावी....
ज्वारी पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापनज्वारी पिकांच्या कमी उत्पादकतेमध्ये कीड, रोगामुळे...
कापसाचा शिल्लक साठा बाहेर पाठवा कोरोना संक्रमण काळातील सुरुवातीचे तीन-चार महिने...
हिवाळ्यात आरोग्य, पोषणासाठी बाजरीअलीकडे अगदी ग्रामीण भागातही गहू खाण्याचे प्रमाण...
उशिरा पेरणीसाठी योग्य गहू जातींची निवडराज्यामध्ये परतीचा पाऊस दीर्घकाळ रेंगाळल्यामुळे...
अधिक उत्पादनासाठी गहू लागवड तंत्रज्ञानमहाराष्ट्रातील गव्हाचे सरासरी उत्पादन १७६१ किलो...
खपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रखपली गव्हाच्या सुधारित रोग प्रतिकारक जाती, योग्य...
नियंत्रण भातावरील दाणे रंगहीनता रोगाचे...सध्या पाऊस कमी झाला असून अति दमट व उष्ण हवामान...
बागायती गहू लागवडीची सूत्रेगव्हाची पेरणी जमिनीत पुरेशी ओल असताना दक्षिणोत्तर...
रब्बी हंगामातील लागवडीचे नियोजनरब्बी हंगामात कोरडवाहू परिस्थितीमध्ये नैसर्गिक...
भातसल्ला (कोकण विभाग)पुढील पाच दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता...
जमिनीच्या प्रकारानुसार वापरा ज्वारी वाणराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...
रब्बी ज्वारी लागवडीचे सुधारित तंत्रमहाराष्ट्रातील शेती ही प्रामुख्याने कोरडवाहू...
रब्बी ज्वारीसाठी करा मुलस्थानी जलसंधारणरब्बी हंगामात ज्वारीची पेरणी वेळेवर करण्यासाठी...
भातावरील करपा, आभासमय काजळी रोगांचे...खरीप भात पिकांमध्ये सातत्याचे ढगाळ व दमट वातावरण...
भातावरील तुडतुडे, गादमाशी, खोडकीडींचे...उष्ण - दमट हवामान, जास्त आर्द्रता, भात खाचरातील...
चाऱ्यासाठी ज्वारीचा नवा वाण ‘सीएसव्ही...चारा पीक म्हणून ज्वारी अत्यंत उपयुक्त आहे....
रहू, चटई पद्धतीने भात लागवडीचे नियोजनचटई पद्धतीने नवीन भात रोपवाटिका तयार करावी. या...
ज्वारी उत्पादनवाढीची सूत्रेज्वारी हे कमी पावसात धान्य व कडब्याचे हमखास...