मुंबई : पंतप्रधान पीकविमा योजना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राबविण्यात येत असू
बातम्या
स्वाभिमानीचा विजयासाठी संघर्ष
कोण म्हणतंय येत नाही, आल्याशिवाय राहत नाय, असा जल्लोष करीत जिल्ह्यातील ३८६ गावांत निकालाचा जल्लोष टिपेला गेला. बहुतांश ठिकाणी स्थानिक आघाड्यांचेच वर्चस्व राहिले.
कोल्हापूर : कोण म्हणतंय येत नाही, आल्याशिवाय राहत नाय, असा जल्लोष करीत जिल्ह्यातील ३८६ गावांत निकालाचा जल्लोष टिपेला गेला. बहुतांश ठिकाणी स्थानिक आघाड्यांचेच वर्चस्व राहिले. दुपारी तीनपर्यंत आलेल्या कलानुसार स्वाभिमानी शेतकरी संघटनेला बालेकिल्ल्यात ही विजयासाठी झगडावे लागले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावातच त्यांच्या गटाला पराभव पत्करावा लागला. अनेक ठिकाणी अनपेक्षितपणे सत्तांतर झाल्याने धक्कादायक निकालाची नोंद झाली. तर नवख्या उमेदवारानाही या निवडणुकीने आपले कर्तृत्व दाखवण्याची संधी दिली.
सकाळी आठ वाजता तालुक्याच्या प्रमुख ठिकाणी मतमोजणीस प्रारंभ झाला. एक तासाच्या कालावधीतच गतीने कल आणि निकाल येण्यास प्रारंभ झाला. शिरोळ तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला यंदा निवडणुकीत संघर्ष करावा लागला. प्राबल्य असणाऱ्या अनेक गावांत त्यांचा पराभव झाला, तर अनेक ठिकाणी विजयासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावात त्यांच्या गटाला शिवसेनेने हादरा देत सत्ता काबीज केली. राधानगरीत नवख्या आघाड्यांनी चंचू प्रवेश करीत प्रस्थापितांना हादरे दिले.
करवीरमध्येही स्थानिक आघाड्याची सत्ता राहिली. आजऱ्यात २१ पैकी १० ठिकाणी सत्ता कायम राहिली, तर १० ठिकाणी सत्तातर झाले. एका गावात त्रिशंकू स्थिती निर्माण झाली. आजऱ्यात स्थानिक आघाड्यांचे वर्चस्व असल्याचे प्राथमिक कलावरून स्पष्ट झाले.
- 1 of 1545
- ››