Agriculture news in marathi self help women group in Dahikute, Manke village distributes food to the needy | Agrowon

मानके, दहीकुटे गावात महिला बचत गटातर्फे गरजूंना अन्नवाटप

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 एप्रिल 2020

मालेगाव तालुक्यातील मानके व दहीकुटे गावातील महिला बचत गटातील सदस्यांनी आर्थिक मदत गोळा केली. या रकमेतून किरणामाल, धान्याची खरेदी करून त्याचे गावात गरजूंना वाटप केले. 

नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन सुरू आले. मात्र, ग्रामीण भागात रोजीरोटीसाठी मजुरीने जाणाऱ्या नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे खाण्यापिण्याची सोय व्हावी, यासाठी मालेगाव तालुक्यातील मानके व दहीकुटे गावातील महिला बचत गटातील सदस्यांनी आर्थिक मदत गोळा केली. या रकमेतून किरणामाल, धान्याची खरेदी करून त्याचे गावात गरजूंना वाटप केले. 

लॉकडाउन झाल्यामुळे मजूरांची उपासमार होऊ लागली आहे. हाताला काम नाही. केलेल्या कामाचा पैसाही नाही. यामुळे कुटुंबातील सदस्य उपाशी पोटी दिवस काढत होते. उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला. अशावेळी बचत गटातील महिला त्यांच्या मदतीला धावून आल्या. स्वतः कष्ट करून दोन पैसे मिळवणाऱ्या महिलांनी मदत केल्याचे चित्र पाहायला मिळाले. 

श्री.साईनाथ बचत गट, ओम साई, धनदाई बचत गट, रामराव बाबा बचत गट यांच्या मदतीने गरजू कुटुंबांना अन्नधान्य वाटप करण्यात आले. किरणामध्ये साखर, चहा पावडर, मीठ, डाळी, तेल, मसाले, शेंगदाणे यांसह तांदूळ, गहू या धान्याचे वाटप करण्यात आले. 

मदत जमा करून वितरण करण्याच्या उपक्रमात कोमल देवरे, सुवर्णा देवरे, शोभा वाघ, भारती सोनवणे, ज्योती देवरे, रेखा देवरे, मिनाबाई हिरे, सविता देवरे आदींनी पुढाकार घेतला. 
 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...