सोयाबीनच्या स्व-उत्पादित बियाण्यांचा वापर करा : सोलापूर कृषी विभाग

सोलापूर ः सोयाबीनच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्व-उत्पादित बियाण्यांचा वापर करावा, असे आवाहन कृषी विभगाने केले. सोयाबीन हे स्वयंपराग सिंचित आणि सरळ वाणाचे पीक आहे. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलण्याची आवश्यकता नाही, असेही कृषि विभागाने एका पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
Self-produced soybeans Use seeds Department of Agriculture appeals to farmers in Solapur

गेल्या दोन वर्षांत पेरणी केलेल्या प्रमाणित बियाण्यांपासून उत्पादित होणारे सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी वापरल्यास उत्पादन खर्च कमी होऊ शकतो. शास्त्रीयदृष्ट्या असे बियाणे पेरणीसाठी वापरता येते. प्रमाणित बियाण्यांपासून उत्पादित बियाण्यांची चाळणी करुन चांगल्या प्रतीच्या बियाण्यांची पेरणीसाठी निवड करावी. सोयाबीन बियाण्यांचे बाह्यावरण नाजूक व पातळ असल्याने त्याची हाताळणी काळजीपूर्वक करावी. पेरणीपूर्वी घरगुती पद्धतीने बियाणे उगवण क्षमता तपासणी घरच्या घरी करता येते, ही पद्धत अतिशय सोपी व सुलभ आहे. 

संबधित तालुक्यातील कृषी सहायकांशी त्यासंबंधी संपर्क करावा. शिफारस केलेल्या मात्रेनुसार पेरणीसाठी हेक्टरी ७५ किलो बियाणे वापरावे. तत्पूर्वी बियाण्यास राय़झोबियम व पीएसबी संवर्धकाची २५ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. अधिक माहितीसाठी त्या त्या गावातील कृषी सहायकांशी अथवा तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहनही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने केले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com