Agriculture news in marathi Self-respect for insurance Morcha on Agriculture Commissionerate | Page 2 ||| Agrowon

पीकविम्यासाठी स्वाभिमानीचा कृषी आयुक्तालयावर मोर्चा 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 जुलै 2021

पीकविमा योजनेतील गेल्या खरिपाची नुकसान भरपाई द्या, तसेच विम्याच्या नावाखाली हजारो कोटी रुपये हडपणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा, या मागण्यांसाठी  स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी मोर्चा काढला.

पुणे : पीकविमा योजनेतील गेल्या खरिपाची नुकसान भरपाई द्या, तसेच विम्याच्या नावाखाली हजारो कोटी रुपये हडपणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा, अशा मागण्या करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी (ता.२६) कृषी आयुक्तालयावर भरपावसात धडक मोर्चा काढला. ‘विमा आमच्या हक्काचा; नाही कुणाच्या बापाचा’ अशा घोषणा देत शेकडो शेतकऱ्यांनी आयुक्तालयाचा परिसर दणाणून सोडला होता. 

‘स्वाभिमानी’चे मार्गदर्शन विदर्भ युवा आघाडी अध्यक्ष प्रशांत डिक्कर तसेच युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे यांच्या नेतृत्वाखाली पुण्याच्या सेंट्रल बिल्डिंग चौकात शेकडो शेतकरी सकाळी जमा झाले. त्यांनी सरकार तसेच कंपन्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत मोर्चाला सुरूवात केली. कृषी आयुक्तालयाच्या प्रवेशद्वाराजवळ मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

‘‘हजारो कोटी रुपये गोळा करणाऱ्या विमा कंपन्यांनी गेल्या हंगामातील एक छदामही दिलेला नाही. कंपन्या व सरकारने साटेलोटे करून शेतकऱ्यांच्या पाच हजार कोटींवर आतापर्यंत डल्ला मारलेला आहे. त्यामुळे आमदार देखील या समस्यांवर बोलत नाही. सरकार दखल घेत नसल्याने आमचे बेमुदत आंदोलन आयुक्तालयासमोर सुरू राहील,’’ अशी घोषणा डिक्कर यांनी या वेळी केली. 

मोर्चाची माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांना समजताच भ्रमणध्वनीवरून त्यांनी मोर्चेकऱ्यांशी संपर्क करीत समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. भरपावसात शेतकरी ताटकळत असतानाही कोणताही अधिकारी मोर्चाकऱ्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी आलेला नाही, अशी तक्रार कृषिमंत्र्यांकडे करण्यात आली.

दरम्यान, आयुक्तांना दिलेल्या निवेदनात डिक्कर यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विमा कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. ‘‘विमा कंपन्या नफेखोरीचे धोरण ठेवत हजारो कोटी रुपये कमावत आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील विमा भरपाई कंपन्यांनी अडवून ठेवली आहे. भरपाईबाबत शासनाच्या आदेशालाही या कंपन्या केराची टोपली दाखवतात,’’ असा आरोप रोशन देशमुख, गजानन भंगाळे पाटील, उज्ज्वल चोपडे यांनी केला. 

दुपारनंतर आयुक्तालयाच्या प्रशासनाने आंदोलनकर्त्यांना चर्चेसाठी कार्यालयात बोलावले होते. तर, मोर्चेकऱ्यांमध्ये येऊन आयुक्तांनी चर्चा करावी, असा आग्रह आग्रह डिक्कर यांनी धरला. तसेच, बेमुदत धरणे आंदोलनही सुरू केले. आयुक्त धीरज कुमार दोन दिवसांच्या रजेवर असल्याने कृषी संचालक विकास पाटील (विस्तार व प्रशिक्षण विभाग) व मुख्य सांख्यिक उदय देशमुख यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली. चर्चा अद्याप सुरूच असून, तोडगा निघालेला नाही. 


इतर बातम्या
एकरूख सिंचन योजनेसाठी ५० कोटी रुपये...सोलापूर ः ‘‘अक्कलकोट, दक्षिण सोलापूरसाठी...
‘नांदगावात अतिवृष्टीनं सारं नेलं’नाशिक : नांदगाव तालुका अवर्षणप्रवण असल्याने इथली...
नाशिक जिल्ह्यात नऊ केंद्रावर मका,...येवला : हमीभावाने मका,ज्वारी, बाजरी खरेदीसाठी...
प्रशासक मंडळ हटविल्यास दूध संकलन बंद...सोलापूर ः सोलापूर जिल्हा दूध संघाचे विद्यमान...
‘मामा’ तलाव रुतले गाळात साकोली, जि. भंडारा : भंडारा, गोंदिया जिल्ह्यांतील...
राज्यात उद्यापासून पावसाची उघडीप शक्यपुणे : राज्यात सुरू असलेला पाऊस उद्यापासून (ता....
कीडनाशके साठ्यांच्या होणार संगणकीय नोंदीपुणे ः देशातील कीडनाशके विक्री करणाऱ्या दुकानात...
ई-पीक पाहणी ॲपमध्ये आंतरपीक नोंदणीला ‘...पथ्रोट, जि. अमरावती : शासनाच्या ई-पीक पाहणी...
मानवाधिकार आयोगाची शेतकरी आंदोलनावरून...नवी दिल्ली ः राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (...
ई-पीक पाहणीबाबत काही भागांतून तक्रारीपुणे ः आपल्या शेतातील पिकाची नोंद स्वतः...
पालघर, नाशिकमध्ये मुसळधारपुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात अनेक...
काजू, आंबा उत्पादक शेतकऱ्यांकडून...सिंधुदुर्गनगरी : आंबा, काजू बागायतदारांना...
कोयना धरण क्षेत्रात  पावसाचा जोर कायम सातारा : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा...
परभणीत ‘रोहयो’तून ८८.१५ हेक्टरवर फळबाग...परभणी ः ‘‘जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय...
परभणी जिल्ह्यात सोयाबीन, कपाशी, तुरीचे...परभणी ः जिल्ह्यात यंदा मंगळवार (ता.१४) पर्यंत ९००...
रत्नागिरीत पावसाचा जोर कायम रत्नागिरी : ऐन गणेशोत्सवात पावसाचा जोर कायम आहे....
सांगलीत पशुधनाचे लसीकरण रखडले सांगली : जिल्ह्यात पशुधनाची संख्या ११ लाख ०३ हजार...
जळगाव जिल्ह्यात दीड लाख शेतकरीच पीकविमा...जळगाव ः दर वर्षी ऑगस्ट, सप्टेंबरअखेर शेतकरी...
पशुधनाच्या आरोग्यविषयक  सुविधा तत्काळ...नागपूर : पशू वैद्यकीय चिकित्सालयीन संकुलामुळे...
वीजबील थकबाकीची वसुली  न झाल्यास राज्य...मुंबई : ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी वीजबिलाची...