जळगाव ः खानदेशात चांगल्या दर्जाच्या केळीला रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर चांगला उठाव
ताज्या घडामोडी
महागाई विरोधात स्वाभिमानीचे लवकरच आंदोलन : राजू शेट्टी
दरवाढीने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य माणसांचे कंबरडे मोडले आहे. वाढीव वीजबिल वसुली या मुद्द्यांवरून राज्य आणि केंद्र सरकार विरोधात राज्यव्यापी मोठे आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा राजू शेट्टी यांनी बुधवारी(ता. ३) दिला.
कोल्हापूर : पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य माणसांचे कंबरडे मोडले आहे. यातच शिक्षण संस्थांकडून सक्तीने वसूल होणारी फी, वाढीव वीजबिल वसुली या मुद्द्यांवरून राज्य आणि केंद्र सरकार विरोधात राज्यव्यापी मोठे आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी(ता. ३) दिला. आंदोलनाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले. विविध कार्यकर्त्यांनी शेट्टी यांच्या उपस्थितीत स्वाभिमानीत प्रवेश केला या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शेट्टी म्हणाले, ‘‘सध्या देशात पेट्रोलच्या दरवाढीमुळे महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल दर शंभर रुपये लिटरने विकत घ्यावे लागत असेल तर दुधाची किंमत शंभर रुपये लिटर का होऊ शकत नाही. केंद्राने तीन कृषी कायदे लादले आहेत. केंद्राबरोबर आता राज्य सरकारकडूनही फारशी अपेक्षा पूर्ती झाली नाही. अनेक कारखान्यांनी एफआरपीचे तुकडे करून दिले. यातच खत दरवाढीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या विरोधात अनेक गोष्टी घडल्या आहेत. त्यामुळे आम्ही आता गप्प बसणार नाही. दोन्ही सरकारविरोधात आंदोलनाचा नक्कीच भडका उडेल.’’
संदीप कारंडे, भाजप प्रवक्ते रामदास कोळी (इचलकरंजी) यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. शेट्टी यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले. या वेळी स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंधर पाटील, वैभव कांबळे, महिला बालकल्याण समिती सभापती डॉ. पद्माराणी पाटील, राजेंद्र गड्यानवार, सागर संभुशेट्टे उपस्थित होते.
- 1 of 1090
- ››