Agriculture news in marathi Self-respecting against inflation Soon agitation: Raju Shetty | Agrowon

महागाई विरोधात स्वाभिमानीचे लवकरच आंदोलन : राजू शेट्टी 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 मार्च 2021

दरवाढीने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य माणसांचे कंबरडे मोडले आहे. वाढीव वीजबिल वसुली या मुद्द्यांवरून राज्य आणि केंद्र सरकार विरोधात राज्यव्यापी मोठे आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा राजू शेट्टी यांनी बुधवारी(ता. ३) दिला.

कोल्हापूर : पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य माणसांचे कंबरडे मोडले आहे. यातच शिक्षण संस्थांकडून सक्तीने वसूल होणारी फी, वाढीव वीजबिल वसुली या मुद्द्यांवरून राज्य आणि केंद्र सरकार विरोधात राज्यव्यापी मोठे आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी(ता. ३) दिला. आंदोलनाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले. विविध कार्यकर्त्यांनी शेट्टी यांच्या उपस्थितीत स्वाभिमानीत प्रवेश केला या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

शेट्टी म्हणाले, ‘‘सध्या देशात पेट्रोलच्या दरवाढीमुळे महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल दर शंभर रुपये लिटरने विकत घ्यावे लागत असेल तर दुधाची किंमत शंभर रुपये लिटर का होऊ शकत नाही. केंद्राने तीन कृषी कायदे लादले आहेत. केंद्राबरोबर आता राज्य सरकारकडूनही फारशी अपेक्षा पूर्ती झाली नाही. अनेक कारखान्यांनी एफआरपीचे तुकडे करून दिले. यातच खत दरवाढीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या विरोधात अनेक गोष्टी घडल्या आहेत. त्यामुळे आम्ही आता गप्प बसणार नाही. दोन्ही सरकारविरोधात आंदोलनाचा नक्कीच भडका उडेल.’’ 

संदीप कारंडे, भाजप प्रवक्ते रामदास कोळी (इचलकरंजी) यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. शेट्टी यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले. या वेळी स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंधर पाटील, वैभव कांबळे, महिला बालकल्याण समिती सभापती डॉ. पद्माराणी पाटील, राजेंद्र गड्यानवार, सागर संभुशेट्टे उपस्थित होते. 


इतर बातम्या
खापणेवाडी-गुरववाडी बंधाऱ्यास गळतीबाजारभोगाव, जि. कोल्हापूर : जांभळी नदीवरील...
शेतकऱ्यांचा शेतीमाल विक्रीला प्रतिसाद...नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
बुलडाण्यात दूध संकलन, वितरणाच्या वेळेत...बुलडाणा ः कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी...
पुणे विद्यापीठात उभारणार ‘बांबू पार्क’ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाच...
सातबारासह कागदपत्रे घेऊन तलाठी...पातुर्डा, जि. बुलडाणा : पीककर्ज मिळवण्यासाठी...
तेजीमुळे सोयाबीन बियाण्यांची टंचाई शक्य पुणे : सोयाबीन दरात आलेली प्रचंड तेजी पाहून...
‘सौदे बंद’मुळे बेदाणा उत्पादक अडचणीत सांगली ः व्यापाऱ्यांनी बेदाणा सौदे बंद केले आहेत...
कृषी विभागात कोरोनामुळे आत्तापर्यंत २८...पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने गेल्या काही...
मराठवाडा, विदर्भात तुरळक सरींची शक्यता पुणे : विदर्भ व मराठवाडा परिसरात काही प्रमाणात...
‘पंदेकृवि’ने दीक्षान्त सोहळा पुढे...अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने...
कुर्जा खरेदी केंद्रावर धान मोजणीविना...भंडारा : पवनी तालुक्यातील कुर्जा येथे अनेक...
कापूस पिकासाठी यंत्रमानव ठरणार वरदान ः...अकोला ः देशांतर्गत कापूस लागवडीचे क्षेत्र १२९ लाख...
कृषी विभागातील पाच पुरस्कार्थींचे कौतुक पुणे : राज्याच्या कृषी खात्यात उल्लेखनीय कामे...
विमा उतरवा, अन्यथा बाजार समित्या बंद...पुणे/नाशिक ः शेतकरी, कामगार, राज्य सरकारचे सर्व...
पाच दिवसांत तब्बल ५० टन काजू बी खरेदी सिंधुदुर्गनगरी ः फळपीक बागायतदार संघाने गेल्या...
नगर : पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग...नगर : नैसर्गिक संकटाने तसेच अन्य कारणाने...
`दहिगाव उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर...सोलापूर ः करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन...
पुणे बाजार समिती चक्राकार पद्धतीने सुरू...पुणे : कोरोना विषाणू बाधित रुग्णाच्या झपाट्याने...
देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरीसोलापूर ः देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरी...
पाण्याच्या उपलब्धतेमुळे उन्हाळी...पुणे : गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे...