Agriculture News in Marathi Self-respecting-industrial conflict inevitable; Who will solve the 'FRP' dilemma? | Agrowon

स्वाभिमानी-कारखानदार संघर्ष अटळ;  ‘एफआरपी’ची कोंडी कोण फोडणार? 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 ऑक्टोबर 2021

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू, गुरुदत्त, कुंभी-कासारी, दत्त सहकारीसह दहा कारखान्यांनी व शेजारच्या कर्नाटक राज्यातील शिरगुप्पीसह काही कारखान्यांनी एकरकमी एफआरपी जाहीर केली आहे.

सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू, गुरुदत्त, कुंभी-कासारी, दत्त सहकारीसह दहा कारखान्यांनी व शेजारच्या कर्नाटक राज्यातील शिरगुप्पीसह काही कारखान्यांनी एकरकमी एफआरपी जाहीर केली आहे. मात्र जिल्ह्यातील एकाही कारखान्याने एकरकमी एफआरपी जाहीर केलेली नाही. जे एकरकमी एफआरपी जाहीर करतील ते कारखाने सुरू राहतील, मात्र जे दर जाहीर करणार नाहीत ते कारखाने बंद पाडू, तोडी बंद पाडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. एफआरपीसाठी कारखानदार, स्वाभिमानीत संघर्ष अटळ असल्याची चिन्हे आहेत. 

जयसिंगपूर येथे ऊस परिषद नुकतीच झाली. माजी खासदार राजू शेट्टी यांनी एकरकमी एफआरपी आणि वाढीव साखरेचा दर गृहीत धरून ३०० रुपये जानेवारीत द्यावेत, अशी मागणी केली आहे. तसाच ठराव परिषदेत झाला आहे. यानुसार कोल्हापुरातील दहा कारखान्यांनी एफआरपी जाहीर केली. त्यांच्या ऊसतोडी सुरूचा निर्णय झाला. मात्र त्यांनी वाढीव ३०० रुपये जानेवारी महिन्यात द्यावेत, अन्यथा ते कारखाने जानेवारीत बंद पाडले जातील. 

मात्र एफआरपी जाहीर न केलेल्या कारखान्यांच्या तोंडी बंद पाडल्या जातील, असा इशाराही देण्यात आला आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांनी ऊस तोडणीसाठी घाई करू नये, कारण साखरेचे भाव सध्या ३५ रुपये आहेत. ब्राझीलमध्ये दुष्काळ असल्याने जगभर साखरेचा तुटवडा आहे. त्यामुळे भारतीय साखरेला मागणी राहणार आहे. साखरेचा दर ४० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकरकमी एफआरपी देणे शक्य होणार आहे.

गेल्या वर्षी सोनहिरा कारखान्याचे अध्यक्ष मोहनराव कदम यांनी ऊसदराची कोंडी फोडली होती. पालकमंत्र्यांनी सुद्धा त्यांची भूमिका जाहीर करावी. शेतकरीच आम्हाला तीन टप्प्यांमध्ये बिल द्या, असे लिहून देत आहे व तसे ठरावसुद्धा जनरल बॉडीमध्ये झाले आहेत, असे रेटून सांगण्याचे धाडस कारखाना अध्यक्ष करत आहेत.’’ 

प्रतिक्रिया 

एकरकमी एफआरपी दिली तर कारखान्यांनी काढलेल्या कर्जाचा व्याजाचा भुर्दंड कारखानदारांना सोसावा लागतो, परिणामी साखर कारखाने तोट्यात जातात. दुसरीकडे शेतकऱ्यांनी काढलेले पीककर्ज जर मुदतीत भरले नाही तर शून्य टक्के व्याजदराचा फायदा शेतकऱ्याला होणार नाही. त्याच्याकडून १० ते १२ टक्के व्याजदराने वसुली केली जाते. यातून मार्ग काढला पाहिजे. 
-संदीप राजोबा, ‘स्वाभिमानी’ जिल्हा कार्याध्यक्ष


इतर बातम्या
जळगाव जिल्ह्यात बोंडअळीचा उद्रेकजळगाव ः जिल्ह्यात यंदा शेतकऱ्यांना अतिवृष्टीने...
राज्यात पावसाला पोषक हवामान पुणे : राज्याच्या किमान तापमानात आणखी घट झाल्याने...
पावसाला पोषक हवामानामुळे किमान तापमानात...पुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्याच्या किमान...
वीजप्रश्नी संतप्त शेतकरी  महावितरण...नाशिक : महावितरण कंपनीकडून सटाणा तालुक्यात थकीत...
कापूस खेडा खरेदी करणाऱ्या ...बुलडाणा ः खेडा खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना...
कडुलिंबाची झाडे वाळू लागली पुणे नगर ः नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील...
राज्यातील १२१ आदिवासी  आश्रमशाळा होणार...पुणे ः शिक्षण व्यवस्थेमधील बदलांना सामोरे जात...
लाल कांद्याला उन्हाळच्या  तुलनेत मिळतोय...नाशिक : दिवाळीनंतर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार...
नगर पंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी...पुणे नगर ः राज्यातील मुदत संपलेल्या परंतु,...
सत्तावीस हजार सहकारी संस्थांच्या ...पुणे ः राज्यातील कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय...
‘बेरीज् एक्सलन्स सेंटर’ उभारणीसाठी ...सातारा ः स्ट्रॅाबेरी मातृ रोपांवरील आयात शुल्क...
शेतकरी उत्पन्न दुपटीच्या बैठकीला २३... नवी दिल्ली ः संसदेच्या कृषी विषयक स्थायी...
दिवाळी सुटीनंतरच्या बेदाणा  सौद्यात...सांगली ः दिवाळीच्या सुटीनंतर सांगली कृषी उत्पन्न...
स्टॉक लिमिटला नकार;  सोयाबीन बाजाराला...पुणे ः राज्य सरकारने सोयाबीनवर स्टॉक लिमिट लावणार...
भात खरेदीच्या जाचक अटीतून शेतकऱ्यांना...सिंधुदुर्गनगरीः ज्या शेतकऱ्यांच्या सात-बारामध्ये...
बीज प्रक्रियेसाठी यंत्राचा वापर वाढलावाशीम : शेतकऱ्यांमध्ये बीजप्रक्रियेचे महत्त्व...
सांगलीत कृषिपंपांची वीजजोड तोडणी सुरुसांगली ः कृषिपंपांच्या वीज बिल वसुलीसाठी...
सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे तीन...पुणे ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या...
फेरफार नोंदीत पुणे जिल्हा आघाडीवरपुणे ः शेत जमिनी खरेदी विक्री दरम्यान अंत्यत...
सोलापूर जिल्ह्यात खरिपातील पीक ...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या खरीप...