Agriculture news in marathi Sell ​​Homemade Vegetables from WhatsApp Group | Agrowon

वसमतमध्ये व्हाॅट्सअॅप ग्रुपवरून घरपोच भाजीपाला विक्री

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 2 एप्रिल 2020

हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील सेंद्रिय शेतमाल उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन उत्पादनांच्या मार्केटींग तसेच विक्रीसाठी सेंद्रिय ग्राहक मंडळ या नावाने व्हॅाटसअॅप ग्रुप स्थापन केला आहे. या ग्रुपव्दारे सेंद्रिय भाजीपाला, डाळी, हळद पावडर, कच्ची हळद, गूळ पाक, खपली गहू, घाण्याचे तेल आदी उत्पादनांची आठवड्यातील तीन दिवस घरपोच विक्री केली जाते. परंतु सध्या ‘कोरोना’ विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आठवड्यातून एक दिवस घरपोच भाजीपाला विक्री केली जात असून ग्राहकांपर्यंत भाजीपाला पोचवितांना योग्य ती दक्षता घेतली जात आहे.

हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील सेंद्रिय शेतमाल उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन उत्पादनांच्या मार्केटींग तसेच विक्रीसाठी सेंद्रिय ग्राहक मंडळ या नावाने व्हॅाटसअॅप ग्रुप स्थापन केला आहे. या ग्रुपव्दारे सेंद्रिय भाजीपाला, डाळी, हळद पावडर, कच्ची हळद, गूळ पाक, खपली गहू, घाण्याचे तेल आदी उत्पादनांची आठवड्यातील तीन दिवस घरपोच विक्री केली जाते. परंतु सध्या ‘कोरोना’ विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आठवड्यातून एक दिवस घरपोच भाजीपाला विक्री केली जात असून ग्राहकांपर्यंत भाजीपाला पोचवितांना योग्य ती दक्षता घेतली जात आहे.

वसमत तालुक्यातील पांगरा सती येथील संजय शिंदे, ममदपूरवाडी येथील डॅा. हरिदास जटाळे, लिंगी येथील बालाजी यशवंते, हयातनगर येथील गंगाधर साखरे या शेतकऱ्यांच्या संकल्पनेतून सुमारे पाच वर्षापूर्वी सेंद्रिय ग्राहक मंडळ या नावाने व्हॅाटसअॅप ग्रुपची स्थापना करण्यात आली. त्यात धानोरा (ता. वसमत) येथील शेतकरी दादाराव राऊत यांच्यासह पाच शेतकरी ग्रुपमध्ये दोन अडीच वर्षापूर्वी सहभागी झाले. या ग्रुपमध्ये वसमत शहरातील नियमित सेंद्रिय शेतमाल व प्रक्रिया उत्पादने खरेदी करणाऱ्या 80 ते 85 ग्राहकांचा समावेश आहे.

या ग्रुपवर दररोज शेतातील उत्पादनाची माहिती टाकली जाते. त्यानंतर ग्राहक मागणी करतात. त्यानुसार दादाराव राऊत आणि त्याचा मुलगा योगेश राऊत हे आठवड्यातील तीन दिवस भाजीपाला तसेच अन्य प्रक्रिया उत्पादने घरपोच पोचवतात. या ग्रुपवर अन्य कुठल्याही पोस्ट टाकल्या जात नाहीत. दर्जेदार सेंद्रिय शेतमाल उत्पादने, भाजीपाला घरपोच मिळत असल्यामुळे अनेक ग्राहक सेंद्रिय ग्राहक मंडळ गटाल जोडले गेले आहेत.

ग्राहकांना वर्षातील बारा महिने 365 दिवस भाजीपाल्याचा पुरवठा करण्याचा करार केलेला असतो. त्यामुळे बाजारभावातील घसरणीमुळे नुकसान होत नाही. भाजीपाल्यास बारमाही 60 रुपये प्रतिकिलो याप्रमाणे दर मिळतो. शेतकरी भेंडी, गवार, चवळी, शेपू, पालक, वांगी, वाल, मेथी, कोथिंबिर, कारले, दोडके असे भाजीपाल्यामध्ये वैविध्य ठेवून वर्षभर उत्पादन घेतात. सेंद्रिय हळद पावडर, कच्ची हळद, खपली गहू, बन्सी गहू, मूग, तूर, हरभरा आदी डाळी तसेच बेसण, गूळ, पाक, तांदूळ, जिरे, घाण्याचे करडई, शेंगदाणा तेल आदी शेतमाल तसेच प्रक्रिया उत्पादनांची वसमत शहरात ग्राहकांना घरपोच विक्री केली जाते.

‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी दक्षता
सध्या ‘कोरोना’चा संर्सग रोखण्यासाठी संचार बंदी लागू आहे. त्यामुळे वसमत शहरातील ग्राहकांना आठवड्यातून एक दिवस भाजीपाला तसेच अन्य उत्पादने पिशव्यामध्ये भरुन पोच केली जातात. तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधलेला असतो. सोबत सॅनीटायझर असते. एक दोन घरे झाले की सॅनिटायझरचे हात निर्जंतूक केले जातात. घरी आल्यानंतर परत हात निर्जंतुक केले जातात. ग्राहकांच्या घरी भाजीपाला देतांना योग्य अंतर राखले जाते. एका टोपलीमध्ये मागणी केलेला संपूर्ण भाजीपाला टाकला जातो. सध्या चलनी नोटाचा कमीकमीत वापर केला जात आहे. फोन पे, गूगल पे आदीव्दारे आॅनलाईन पेमेटवर भर आहे, असे दादाराव राऊत यांनी सांगितले.

संपर्क क्रमांक - दादाराव राऊत ः 9960686171
 


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...