Agriculture news in Marathi Sell ​​soybeans based on market forecasts | Agrowon

बाजाराचा अंदाज घेऊनच सोयाबीन विक्री करा

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 15 ऑक्टोबर 2021

सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात कपात केल्यानंतर गुरुवारी (ता. १४) देशभरातील बाजार समित्यांत सोयाबीन दरात २०० ते ३०० रुपयांपर्यंत तूट आली. मात्र, बाजारातील चित्र पुढील तीन दिवसांनंतर स्पष्ट होईल.

पुणे : सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात कपात केल्यानंतर गुरुवारी (ता. १४) देशभरातील बाजार समित्यांत सोयाबीन दरात २०० ते ३०० रुपयांपर्यंत तूट आली. मात्र, बाजारातील चित्र पुढील तीन दिवसांनंतर स्पष्ट होईल. तर पुढील काळात सरकारने हस्तक्षेप न केल्यास देशातील सोयाबीन मागणी आणि पुरवठ्याचा पॅटर्न बघता शेतकऱ्यांनी विचारपूर्वक विक्रीचा निर्णय घेऊन एफएक्यू सोयाबीनला किमान ४८०० ते ५५०० रुपयांचे टार्गेट ठेवले तरी चालेल. मार्चपर्यंत थांबल्यास दर सहा हजारांचाही टप्पा गाठू शकतात, अशी शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. 

केंद्र सरकारने खाद्यतेलाचे दर कमी करण्यासाठी शेतकऱ्यांचा विचार न करता मागील तीन महिन्यांत तब्बल पाच वेळा धोरणांत बदल केले. तर एकाच महिन्यात दोनदा आयातशुल्क कपात आणि साठा मर्यादा लादली. मात्र देशातील मागणी पुरवठ्याचे गणित बघता दर मोठ्या प्रमाणात कोसळतील अशी शक्यता नाही. भारत हा पाम तेलाचा मोठा आयातदार देश असल्याने आयात शुल्कातील कपात मलेशिया आणि इंडोनेशियाला फायदेशीर ठरते. 

बुधवारी (ता. १३) नोंदवलेल्या वाढीनंतर गुरुवारी (ता. १४) मलेशियातील पाम तेलाच्या वायद्यांनी पूर्व पातळी गाठली आहे. केंद्राच्या निर्णयावर मलेशियातील तेल बाजार कशी प्रतिक्रिया देतात यावर भारतातील तेल दराची दिशा ठरेल. सामान्यपणे, भारताकडून आयात शुल्कात कपात होते. त्यानंतर मलेशिया बाजारात पामतेलाचे दर वाढतात. म्हणून शुल्क कपातीचा पूर्ण फायदा भारतातील ग्राहकांना होत नाही, हा आजवरचा अनुभव आहे. 

केंद्र सरकारच्या निर्णयानंतर बुधवारी (ता. १३) एनसीडीईएक्सवरील सोयाबीनचे वायदे सुमारे अडीच टक्क्यांनी घटले होते. तसेच रिफाइंड सोयाबीन तेलाच्या वायद्यात मोठी घसरण झाली होती. मात्र गुरुवारी (ता. १४) सोयाबीन आणि रिफाइंड सोयाबीन तेलाचे वायदे स्थिरावले आहेत. सध्या एनसीडीईएक्सवरील सोयाबीनचे वायदे ५,२०० ते ५,३०० रुपयांच्या दरम्यान आहेत.

इंदूर येथील सोयाबीन प्रोसेसरने सांगितले, की केंद्राने आयातशुल्क कमी केले मात्र रुपयाचे डॉलरच्या तुलनेत अवमूल्यन होत आहे. बाजारात आवक होत असलेल्या मालात आर्द्रता जास्त आहे. एफएक्यू दर्जाच्या सोयाबीनला ४८०० ते ५२०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. सरकारने आणखी कोणता निर्णय घेतला किंवा आवकेचा दबाव वाढला तर दर काहीसे दबावात येऊन कमीत कमी ४५०० ते ४८०० रुपयांवर स्थिरावतील. अस्थिर झालेल्या बाजारात काही झाले तरी मिलर्स आणि स्टॉकिस्ट ४५०० रुपयांवर मोठी खरेदी करतील.

बाजारातील जाणकारांच्या सरकारने आता हस्तक्षेप केला, तर सोयाबीन ४५०० रुपयांवर स्थिरावेल. तसेच सरकारने शेतकरीविरोधी आणखी कोणतेही पाऊले उचलली नाही तर ४८०० ते ५५०० रुपये आणि फेब्रुवारीनंतर ६ हजारांचा टप्पा गाठू शकतात.

अनपेक्षितपणे सरकार निर्णय घेत असून, यामुळे व्यापारी आणि उद्योगही द्विधा मनःस्थितीत आहेत. सरकार कधीही कोणताही निर्णय घेऊ शकते त्यामुळे बाजाराची दिशा निश्‍चित होत नाही. मात्र खाद्यतेलाचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातच ठरतील. देशातील सोयाबीन बाजाराचा पॅटर्न बघता शेतकऱ्यांनी एफएक्यू दर्जाच्या सोयाबीनचे टार्गेट किमान ४८०० रुपये ठेवण्यास हरकत नाही. सरकारने आयातशुल्क शून्यावर नेले तर आणखी थोडी घसरण होऊ शकते. मात्र पॅनिक सेलिंग न करता बाजाराचा अभ्यास करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचा दर मिळावा अशी इच्छा आहे, त्यांनी फेब्रुवारीनंतर सोयाबीनची विक्री करावी. 
- दिनेश सोमाणी, शेतीमाल बाजार विश्‍लेषण
 
सोयापेंड आयात पडतळ कमी झाली असून, नवीन सौदे होताना दिसत नाही. त्यामुळे सौदे होऊन आयात होणाऱ्या ७ लाख टन सोयापेंडेतून पोल्ट्री उद्योगाकडे साधारण दोन महिन्यांचा साठा असेल. या काळात ते कमी खरेदी करतील. तसेच पैशांची नड असणारे शेतकरी दोन महिन्यांत विक्री करतील. सरकारने पॅनिक निर्माण होईल असा कोणताही निर्णय घेतला नाही घेतला तर पुढील एक ते दोन महिने बाजारात ५३०० ते ५५०० रुपयांदरम्यान दर राहू शकतो. आयात सोयापेंड संपल्यानंतर उद्योगाला स्थानिक बाजारातूनच खरेदी करावी लागेल. त्यामुळे मार्चमध्ये सोयाबीन विक्री केल्यास सहा हजारांचा टप्पाही गाठला जाऊ शकतो. 
- राजेंद्र जाधव, शेतीमाल बाजार विश्‍लेषक


इतर अॅग्रो विशेष
२४० एकरांसाठी सामुहिक स्वयंचलित ठिबक...ऊस व द्राक्षे या पिकांसाठी प्रसिद्ध अहिरवाडी (जि...
‘तहसील’चा वीजपुरवठा खंडित;  थकबाकी न...नंदुरबार ः वेळोवेळी तगादा लावून व अखेर थकबाकी...
हळदीचे दर स्थिर सांगली ः सध्या देशभरात देशात हळदीची ३७ लाख पोती...
ऊस पाचट वजावटीपोटी  २२५ कोटींवर डल्ला पुणे ः यंत्राने होणाऱ्या ऊसतोडीत पाचटाच्या...
उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात जोरदार...पुणे : अरबी समुद्रात तयार होत असलेल्या कमी दाब...
देशातील ७२ गावे होणार ‘व्हिलेज ऑफ एक्‍...नागपूर ः केंद्र सरकार, राज्य सरकार आणि इस्राईल...
राज्य, परराज्यातील मजुरांचा  कडवंची...जालना : जिल्ह्यातील द्राक्षाचे आगार म्हणून...
निसर्गाच्या साक्षीने रंगली गोष्ट एका...अकोला ः सातपुड्याच्या डोंगरदऱ्यांमध्ये वसलेल्या...
शिरूरमध्ये दोन हजार रोहित्रे बंद पुणे : वीजबिल थकल्याने महावितरण शिरूर उपविभागातील...
जालन्यात विम्यासाठी ‘स्वाभिमानी’चे...जालना : मोसंबीचा विमा संरक्षण कालावधी १५ सप्टेंबर...
सरकारी अनुदान नसतानाही  यंदा साखर...पुणे ः भारतात उपलब्ध असलेला जादा ऊस लक्षात घेता...
कृषिपंपांचा वीजपुरवठा तोडू नये, अन्यथा...कोल्हापूर : कृषिपंपाचे रात्रीचे १० तास...
कृषिपंपाचे तोडलेले वीजकनेक्शन पूर्ववतबुलडाणा ः शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचे तोडलेले...
निविष्ठा परवान्यांमधील ‘दुरूस्ती’ आता...पुणे ः गुणनियंत्रण विभागातील गैरव्यवहाराला आळा...
ऊसतोड वजावट रद्द करावी पुणे : राज्यात यंत्राच्या साहाय्याने होणारी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची...पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने गारठा वाढला...
गोदावरी-वैनगंगा नदीजोड प्रकल्प अद्याप...नागपूर : महागाई आणि भूखंडाच्या दरापेक्षाही वेगाने...
आंदोलनातील मृत शेतकऱ्यांच्या...नवी दिल्ली : कृषी कायदे रद्द झाल्यानंतर आता मोदी...
कृषी कायदे मागे घेण्यावर संसदेचे...नवी दिल्ली ः संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
राजस्थानमधील शेतकऱ्यांची  मोहरी आणि...पुणे ः रब्बी हंगाम २०२०-२१ मधील मोहरी आणि गव्हाला...