शाश्वत विकासाशिवाय प्रगत भारत अशक्य ः डॉ. विजय भटकर

शाश्वस्त ग्राम- ज्ञान ग्राम या विषयावरील कृती चर्चासत्राचे उदघाटन करताना डॉ. विजय भटकर.
शाश्वस्त ग्राम- ज्ञान ग्राम या विषयावरील कृती चर्चासत्राचे उदघाटन करताना डॉ. विजय भटकर.

पुणे ः खेड्यांच्या शाश्वत विकासाशिवाय प्रगत भारत शक्य नाही. उन्नत भारत अभियान हा केंद्र सरकारचा उपक्रम गावापर्यंत नेण्यासाठी नॉलेज, कॉलेज व्हिलेज सहयोगी प्रकल्पातून पुढे येत असलेली ज्ञान ग्राम चळवळ ही महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. त्यादृष्टीने डॉ. धनंजयराव गाडगीळ शाश्वत ग्रामविकास केंद्राचे समन्वयक डॉ. कैलास बवले यांचा ‘शाश्वत ग्राम- ज्ञान ग्राम’ हा उपक्रम महाविद्यालयांना व खेडेगावांना मार्गदर्शक व दिशा देणारा ठरेल, असा विश्‍वास डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केला. 

‘शाश्वस्त ग्राम- ज्ञान ग्राम’ या विषयावर गोखले अर्थशास्त्र संस्था संचालित डॉ. धनंजयराव गाडगीळ शाश्वत ग्रामविकास केंद्र आणि जीवन प्रबोधिनी ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृती चर्चासत्राचे उद्‍घाटन डॉ. भटकर यांच्या हस्ते झाले, या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत सहित्याचे अभ्यासक उल्हास पवार होते.

या कृती चर्चासत्रात महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य नंदकुमार निकम, प्राचार्य डॉ. संजय खरात, यशदाचे डॉ. राजेंद्र पवार, रूरल रिलेशन्सचे प्रदीप लोखंडे, शांतिदूत परिवारचे संस्थापक डॉ. विठ्ठलराव जाधव, राज्याच्या स्मार्ट प्रकल्पाचे डॉ. संजय पांढरे, पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या विभागप्रमुख डॉ. उज्ज्वला बर्वे, विद्यापीठाच्या आजीवन शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. धनंजय लोखंडे यांनी सहभाग घेऊन मार्गदर्शन केले.

या वेळी पहाटदर्शन वाहिनीचे दीपक एन., ग्लोबल ऑरगॅनिक शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक एकनाथ कराळे. ‘सरपंचनामा’चे विवेक बच्चे, स्वागत कृषी पर्यटन संस्थेचे शंकरराव बहिरट यांचा शाश्वत ग्रामविकासात योगदान दिल्याबद्दल सन्मान करण्यात आला. प्राचार्य डॉ. कैलास बवले यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन डॉ. अपर्णा साबणे यांनी केले. आभार एकनाथ कराळे यांनी मानले. याप्रसंगी डॉ. कैलास बवलेलिखित ‘तुमच्या ऐक्यासाठी’ या गणेशोत्सवावरील काव्याचे प्रकाशन झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com