agriculture news in marathi, seminar on milk production, pune, maharashtra | Agrowon

`पशुपालन, दुग्धव्यवसायातून होईल उत्पन्न दुपटीचे उद्दिष्ट साध्य` 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

पुणे  ः केवळ शेतीवर अवलंबून राहून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पटीचे उद्दिष्ट साध्य होणार नाही. पशुपालन आणि दूध व्यवसायातून उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट शेतकरी साध्य करू शकतो. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याची गरज असल्याचे मत मान्यवर तज्ज्ञांनी व्यक्त केले. 

पुणे  ः केवळ शेतीवर अवलंबून राहून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पटीचे उद्दिष्ट साध्य होणार नाही. पशुपालन आणि दूध व्यवसायातून उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट शेतकरी साध्य करू शकतो. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याची गरज असल्याचे मत मान्यवर तज्ज्ञांनी व्यक्त केले. 

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने कात्रज डेअरी येथे इंडियन सोसायटीज फॉर स्टडिज इन को-ऑपरेशन, वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थेच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यात सहकारी दूध संघांचा सहभाग या विषयावरील चर्चासत्रात दूध संघांचे प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी मते मांडली. चर्चासत्राचे उद्‌घाटन ‘इंडियन सोसायटीज’चे चेअरमन जी. एच. अमीन आणि पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे यांच्या हस्ते झाले.

दूध उत्पादनासाठी उच्च दर्जाच्या पशुधन पैदाशीबरोबरच दुधाचा आहारात प्रतिमाणशी वापर वाढविण्यासाठी जनजागृती करणे आवश्‍यक आहे. यासाठी एकात्मिक धोरणा ठरविणेदेखील गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. सहकार विभागाचे माजी निवडणूक सहआयुक्‍त संजीव खडके, माजी अतिरिक्‍त सचिव एस. बी. पाटील, दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी महासंघाचे उपाध्यक्ष गोपाळराव म्हस्के, गोकुळ दूध संघाचे डेअरी अधिकारी डॉ. उदयकुमार मोगल, सागर किल्लेदार, सुरेखा खोत आदींनी यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संयोजन कार्यकारी संचालक डॉ. विवेक क्षीरसागर यांनी केले. 


इतर ताज्या घडामोडी
पोषण आहारात ‘महानंद’ टेट्रापॅक दुधाचा...मुंबई : महानंद दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा...
बुलडाण्यात जिल्हाधिकारी चंद्रा यांनी...बुलडाणा  ः कृषी विभागामार्फत जिल्ह्यात...
आंबा, काजू क्लस्टरसाठी रत्नागिरी,...रत्नागिरी : विविध देशांमधील आंबा, काजूची निर्यात...
बदलत्या हवामानाचा गव्हाला फटकाअमळनेर, जि. जळगाव  : तालुक्‍यात गहू पिकाची...
भंडारा जिल्ह्यात धान विक्रीचे १११...भंडारा  ः शासनाने हमीभावात बोनसच्या...
लाल कंधारी, देवणी गोवंश संवर्धनासाठी...परभणी  ः मराठवाडा विभागातील लाल कंधारी आणि...
गोंदिया जिल्ह्यात भरडाईच्या...गोंदिया  ः भरडाईसाठी धानाची उचल होण्याची गती...
आटपाडी तालुक्यात बंद साखर कारखान्यांचा...खरसुंडी, जि. सांगली : टेंभू योजनेच्या खात्रीशीर...
सेवा हमी कायदा नागरिकांपर्यंत पोचवून...नाशिक  : सेवा हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार...
ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावीमुंबई  ः ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावी ही...
नांदेड जिल्ह्यात उन्हाळी भुईमुगाची...नांदेड : यंदा उन्हाळी हंगामात जिल्ह्यात गुरुवार (...
केंद्राच्या योजनांची अंमलबजावणी करा :...हिंगोली : ‘‘केंद्र शासन पुरस्कृत योजनांचा लाभ...
पुणे जिल्ह्यात एक लाख ४० हजार...पुणे ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्‍ती...
कांदा व्यापारातील सरकारी हस्तक्षेप...नगर  : ‘‘केंद्रीय अन्न व नागरी...
नगर जिल्ह्यात जनावरांचा उपचार चार...नगर ः नगर जिल्ह्यातील पशुवैद्यकीय रुग्णालयात आता...
अकोला कृषी विदयापीठाने नियम डावलून...नागपूर : अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
रेशन दुकानातून अंडी, चिकन देण्याला...पुणे ः मांसाहारातूनच विषाणूजन्य रोगांचा फैलाव होत...
अफार्मतर्फे ‘ग्रामीण विकासात स्वयंसेवी...पुणे  : अॅक्शन फॉर अॅग्रीकल्चर रिन्युअल इन...
सोलापूर जिल्हा दूध संघाची ‘नोटीस रद्द...सोलापूर  : जिल्हा सहकारी दूध उत्पादक व...
कृषी उद्योजकांच्या अनुभवांनी भारावले...बोंडले, जि. सोलापूर : उद्योजक होताना आलेल्या...